Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | 5 Tips For Propose Day

प्रपोज डे : या 5 पध्दतींनी करा आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज...

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 08, 2018, 12:00 AM IST

आज व्हॅलेंटाइन वीकचा दुसरा दिवस. आज प्रपोज डे आहे. आपल्या क्रशला प्रपोज करण्याचा आजचा दिवस आहे.

 • 5 Tips For Propose Day

  आज व्हॅलेंटाइन वीकचा दुसरा दिवस. आज प्रपोज डे आहे. आपल्या क्रशला प्रपोज करण्याचा आजचा दिवस आहे. प्रेम करणे सोपे वाटत असेल परंतु प्रपोज करणे खुप अवघड काम आहे. गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड असेल तर तुम्ही तिला लग्नासाठी प्रपोज करु शकता. या दिवसाची खासियत म्‍हणजे तुम्ही एकट्यात प्रपोज करण्‍याची खुप तयारी करता मात्र समोर गेल्यावर भीती वाटते. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही रोमॅंटिक टिप्स घेऊन आलो आहोत, जेणेकरुन प्रपोज करणे तुम्‍हाला सोपे जाईल. चला तर मग वाचूया या खास टिप्स...


  पुढील स्लाईडवर वाचा, प्रपोज करण्याच्या काही खास टिप्स...

 • 5 Tips For Propose Day

  लाँग ड्राइव्ह
  गार वातावरणात आपल्या फ्रेंडला लाँग ड्राइव्हवर घेऊन जा आणि कूल रोमँटिक वातावणात तिचा हात पकडून तिला प्रपोज करा. ती तुमचे प्रपोजल नक्की स्वीकारेल.
   

 • 5 Tips For Propose Day

  व्हिडीओ पाठवा
  तुम्ही तुमच्या फिलिंग्स व्यक्त करण्यासाठी विविध पध्दतींचा वापर करु शकता. तुम्ही प्रपोज करण्याच्या वेगवेगळ्या पध्दतींचा एक व्हिडीयो तयार करा आणि आपल्या गर्लफ्रेंडला पाठवा. हा व्हिडीयो पाहून तिच्या चेह-यावर स्माइल आले तर मग काळजी करण्याचे कारणच नाही.

 • 5 Tips For Propose Day

  थिएटरमध्ये
  जर तुम्ही खुप जास्त हिम्मतवान असाल आणि काही तरी हटके करायचे असे असे ठरवले असेल तर गर्लफ्रेंडला फिल्म दाखवायला घेऊन जा आणि फिल्मच्या ब्रेकमध्ये तुमचा व्हिडीयो प्ले करण्याची व्यवस्था करा. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला आयुष्यभराच्या सोबतीची मागणी करत असाल.

 • 5 Tips For Propose Day

  हटके पध्दतीने
  जर तुमच्या गर्लफ्रेंडला रोमांच आवडत असेल जसे की, रॉक क्लाइंबिंग, अंडर वॉटर डायविंग, रॉक क्लाइंबिंग. तर तुम्ही सर्वात उंच शिखरावर आपले प्रेम व्यक्त करु शकता. किंवा समुद्रामध्येही तुम्ही लग्नासाठी विचारु शकता.

 • 5 Tips For Propose Day

  कार्ड द्या
  जर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीवर प्रेम झाले असेल तर तुम्ही तिला तुमच्या हातांनी एक कार्ड बनवून द्या. जामध्ये तुमच्या फिलिंग्ससोबतच घालवलेल्या क्षणांच्या काही आठवणी आणि फोटो लावलेले असतील. येवढ्या प्रेमाणे मांडलेल्या आठवणी पाहून तिला तुमच्यावर नक्की प्रेम होईल.

   

Trending