Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Career option after 10th

दहावीनंतर काय निवडायचे Confuse आहात? वाचा हे

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jun 10, 2018, 11:31 AM IST

बारावीनंतरच करिअरच्या वाटा सापडतात, असे म्हटले जाते मात्र सध्या असे काही अभ्यासक्रम आहेत दहावीनंतरही आयुष्याला दिशा देता

 • Career option after 10th

  बारावीनंतरच करिअरच्या वाटा सापडतात, असे म्हटले जाते मात्र सध्या असे काही अभ्यासक्रम आहेत दहावीनंतरही आयुष्याला दिशा देतात. दहावीचा निकाल नुकताच लागला. करिअर निवडीबाबत पालक आणि पाल्य या दिवसात काहीसे गोंधळलेले असतात. आज शैक्षणिक क्षेत्रात असंख्य रोजगार, नोकरीभिमुख शिक्षणाची दारे खुली झालेली आहेत...


  करिअर निवडताना घ्या काळजी
  दहावीनंतर अनेक शाखा उपलब्ध असतात. त्यातच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्यानंतर पालक, विद्यार्थी गोंधळून जातात. त्यासाठी पहिल्यांदा विद्यार्थ्याचा कल जाणून घ्या. विद्यार्थ्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे ते जाणून समजून घ्या. त्यावर विचार करा. त्या क्षेत्रात किती नोकरीच्या संधी आहेत ते पहा. करिअर क्षेत्राची निवड करताना विद्यार्थ्याची क्षमता, त्याची अभिरुची योग्यता पाहायला हवी. याबरोबरच समुपदेशकाचा सल्लाही घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. महाविद्यालये निवडताना त्याचा दर्जाही पाहावा.

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, दहावीनंतर कोणत्‍या क्षेत्रांत तुम्‍हाला करिअरच्‍या संधी उपलब्‍ध आहेत...

 • Career option after 10th

  सरंक्षण क्षेत्र
  संरक्षण क्षेत्रातही दहावीनंतर अनेक संधी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, डिफेन्स विभागातही प्रवेश घेता येतो. दहावीनंतर थेट अधिकारी होता येत नाही. सीआरपीएफ, बीएसएफ, आयआयबीपी, सीआयएसएफ किंवा पॅरामिलिटरी फोर्स येथे दहावीनंतर संधी आहेत.

 • Career option after 10th

  वैद्यकीय क्षेत्र
  बारावी सायन्स आणि नीट स्पर्धा परीक्षा देऊन डॉक्टर होता येते. त्यासाठी प्रचंड फी लागते. वैद्यकीय क्षेत्रात दहावीनंतरही जाता येते. हॉस्पिलिटीमध्ये काम करण्यासाठी संधी मिळते. डेंटल हायजीन, मेडिकल लॅबोरेटरी, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, नर्सिंग, हेल्थ अंॅड मेडिकल सायन्स याचाही विचार करता येऊ शकतो.

 • Career option after 10th

  फाइन, परफार्मिंग
  आर्ट अँड क्राफ्ट, सिरॅमिक अॅंड पॉटरी, डान्स, ड्राॅइंग, फर्निचर अंॅड इंटेरिअर डिझाइन, म्युझिक यासंबंधीत क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. तसेच ग्राफिक्स डिझाइन, अॅनिमेशन, व्हिडिओ कम्युनिकेशन, सिरॅमिक ग्लास डिझाइन या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. तेथे कल्पनाशक्तीची गरज असते.

 • Career option after 10th

  बॅकिंग अँड फायनान्स
  सीएची गरज सध्या मोठ्या प्रमाणात आहे. सीए आणि आयसीडब्ल्यूएकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. बॅकिंग क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी आहे. सरकारी नोकरी मर्यादित असल्यातरी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात मोठा वाव आहे. दहावीनंतर कॉमर्स क्षेत्र निवडून पुढे बारावीनंतर सीए किंवा सीएसच्या फाउंडेशनची परीक्षा देऊ शकतो.

 • Career option after 10th

  पर्यटन आणि हॉटेल मॅनेजमेंट
  दहावीनंतर या क्षेत्रातही करिअर करता येते. सध्या या दोन्ही क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही स्वत:चा व्यवसायही थाटू शकता.

   

 • Career option after 10th

  आयटीआय
  दहावीनंतर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विशिष्ट कलागुणानुसार एटीडी म्हणजेच कला शिक्षक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. स्वत:चा व्यवसायसुद्धा करू शकतो. हा एक वर्षाचा डिप्लोमा आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊन स्क्रीन पेंटिंग, कारपेंटरी, फिटर, टर्नर, सुतारकाम असा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमही निवडता येतो.

 • Career option after 10th

  पाॅलिटेक्निक
  दहावीमध्ये टेक्निकल विषय घेतलेले असल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी राखीव जागा असतात. तीन वर्षांसाठी असलेल्या हा अभ्यासक्रम दहावीवर आधारित आहे. यात मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर या चार शाखेतून शिक्षण घेऊ शकतो. यासाठी गुणवत्तानुसार प्रवेश दिला जातात आणि प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागतात.

 • Career option after 10th

  इंडो जर्मन टूल्स
  अकरावीला एमसीव्हीसी शाखेत प्रवेश घेऊन इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. तसेच केंद्रशासन मान्यताप्राप्त इंडो जर्मन टूल्स हा तीन वर्षांचा डिप्लोमाही करिअरला दिशा देणारा आहे. यानंतर थेट अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत प्रवेश मिळतो.स्वत:चा व्यवसाय किंवा कपंन्यामध्ये नोकरी मिळण्याची त्यातून संधी आहे.

 • Career option after 10th

  सर्टिफिकेट कोर्स
  पुढे शिक्षण घेऊ न शकणारे विद्यार्थी सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करून आपला व्यवसाय सुरू करू शकतात. हे कोर्स सहा महिने ते एक वर्षासाठी असतात. त्यात फोटोग्राफी, ज्वेलरी डिझायनिंग, टेलरिंग, ब्युटिशियन हे अभ्यासक्रम चालतात. खासगी संस्थामध्येही हे अभ्यासक्रम शिकवले जातात.

Trending