Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Different Type Of Kisses And Their Meaning

किस डे स्पेशल : कोठे किस करण्याचा काय होतो अर्थ, जाणुन घ्‍या

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 13, 2018, 10:58 AM IST

किस करणे ही प्रेम दर्शवण्याची खुप प्रसिध्द आणि सुलभ पध्दत आहे. समोरच्या व्यक्ती विषयीचे प्रेम दर्शवण्यासाठी लोक नेहमी कि

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  किस करणे ही प्रेम दर्शवण्याची खुप प्रसिध्द आणि सुलभ पध्दत आहे. समोरच्या व्यक्ती विषयीचे प्रेम दर्शवण्यासाठी लोक नेहमी किस करतात. सध्या तर व्हेलेंटाइन वीक सुरु आहे आणि सर्वांना प्रेमाचे वेध लागले आहेत. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आठवडा उत्तम आहे. किस करुन आपण आपल्या भावना चांगल्या पध्दतीने व्यक्त करु शकतो. आपल्या मनातील गोष्ट आपल्या पार्टनरला समजावण्यासाठी किस ही बेस्ट पध्दत आहे. परंतु प्रत्येक किसचा अर्थ हा वेगळा असतो. तुम्हाला किस विषयी सगळे माहिती असेल परंतु कोणत्या किसचा काय अर्थ होतो हे तुम्हाला माहिती नसेल. चला तर मग जाणुन घेऊया कोणत्या किसचा अर्थ काय असतो. यासोबतच जाणुन घ्या 11 प्रकारच्या किसविषयी सविस्तर...

  कोणत्या ठिकाणी किस करण्याचा काय अर्थ असतो जाणुन घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईडवर ...

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  1. गालावर किस करण्याचा अर्थ
  गालावर किस केल्याने स्नेह दिसतो. गालावरील किस सहयोग आणि पूर्णतेला प्रदर्शित करते. याव्यतिरिक्त हे आकर्षणाचेसुध्दा प्रतीक असते.

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  2. ओठावर किस करण्याचा अर्थ
  ओठांवर किस करणे हे हे उत्कटता दर्शवते. आपले प्रेम व्यक्त करण्याची ही सर्वात चांगली आणि बेस्ट पध्दत आहे.

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  3. कॉलरबोनवर किस करण्याचा अर्थ
  कॉलरबोनवर किस करणे हे आत्मियता आणि जवळीक दर्शवते. शारीरिक आकर्षण व्यक्त करण्याची ही सर्वात चांगली पध्दत आहे.

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  4. कानांवर किस करण्याचा अर्थ
  सेक्सुअल इंटेशन व्यक्त करण्यासाठी कानावर किस केले जाते. खरेतर याचा प्रभाव पूर्णपणे किस करणा-याच्या हेतूवर अबलंबून असतो.

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  5. हातांवर किस करण्याचा अर्थ
  एखाद्या विषयी आपली आवड व्यक्त करण्यासाठी हातांवर किस केले जाते. याव्यतिरिक्त हे विश्वासाचेसुध्दा प्रतिक असते.

 • Different Type Of Kisses And Their Meaning
 • Different Type Of Kisses And Their Meaning

  वॅम्पायर किस
  मोठय़ा त्वेषाने एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीच्या मानेवर किस करणे म्हणजे वॅम्पायर किस. हा एक मनोरंजनात्मक किसिंग प्रकार म्हणूनही ओळखला जातो. परंतु, अनेकांना तो आवडतही नाही.

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  लिंजरिंग लिप
  एकमेकांप्रति तीव्र प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी लिंजरिंग लिप किस केला जातो. अतिप्रेम व्यक्त करताना असा किस केला जातो. यात केवळ ओठांद्वारे 20 सेकंदांचा किस केला जातो.

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  टीझर किस
  बर्‍याच दिवसांनी भेटणार्‍या व्यक्तीविषयी प्रेम दर्शविण्यासाठी कपाळावर, ओठ, हातांवर चुंबन घेण्याला ‘टीझर किस’ म्हणून ओळखले जाते. हे दर्शविण्यासाठी टीझर किस केला जातो.

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  सिंगल लिप किस
  प्रियकर आणि प्रेयसीमध्ये प्रेमभावना व्यक्त करताना तीव्र ओढीने केला जाणारा किस हा ‘सिंगल लिप किस’ म्हणून ओळखला जातो. अमेरिका, आफ्रिका, इंग्लंड अशा काही देशांत हा प्रकार लोकप्रिय आहे.
   
 • Different Type Of Kisses And Their Meaning

  बटरफ्लाय किस
  आनंद किंवा मौज दर्शविताना ‘बटरफ्लाय किस’ केला जातो. यात डोळ्यांच्या पापण्या फुलपाखराप्रमाणे जलदगतीने उघड-बंद करून आनंद व्यक्त केला जातो. ‘जिनी और जूजू’ मालिकेतील जिनी या किसमुळे तरुणींमध्ये प्रसिद्ध आहे.
   
 • Different Type Of Kisses And Their Meaning

  हॅण्ड किस  
  एकमेकांप्रति आदर, उपकार, कृपा दर्शविण्यासाठी हातांवर किंवा हातांच्या बोटांवर मागील बाजूस किस केला जातो. त्याला ‘हॅण्ड किस’ म्हणून ओळखतात.
   
 • Different Type Of Kisses And Their Meaning

  लिझार्ड किस
  निख्खळ मनोरंजन किंवा एखाद्याला चिडवण्यासाठी लिझार्ड किस केला जातो. यात केवळ समोरच्या व्यक्तीला सापाप्रमाणे दाखवत इशारा केला जातो. लहान मुले किंवा मुली मोठय़ा प्रमाणावर हा किस करतात.
   
 • Different Type Of Kisses And Their Meaning

  स्पायडर मॅन किस
  स्पायडर मॅन चित्रपटात दाखविण्यात आलेल्या अपसाइड डाउन किसला तरुणांची चांगलीच पसंती मिळाली. एका व्यक्तीने उलट्या दिशेने चेहरा असताना दुसर्‍या व्यक्तीच्या ओठांवर किस करणे, हा स्पायडर मॅन किस. केवळ काहीतरी हटके म्हणून हा किस केला जातो.

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  चिक किस
  मैत्री दर्शविण्यासाठी किंवा फ्लर्ट करण्यासाठी गालांवर केला जाणारा किस म्हणजे चिक किस. एखाद्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीला निरोप देताना या किसचा वापर केला जातो.

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  एस्किमो किस
  एस्किमो किसद्वारे पालक वात्सल्याची भावना व्यक्त करत असतात. पालक पाल्याच्या नाकाला नाक स्पर्श करतात. टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक असे किस करतात, म्हणून त्याला ‘एस्किमो किस’ असे म्हटले जाते.
  (संदर्भ : टाइप्स ऑफ किसेस डॉट नेट)

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  फ्लाइंग किस  
  आपली प्रिय व्यक्ती दूरवर असली तर तिच्यापर्यंत उडत जाणारा किस म्हणजे फ्लाइंग किस.

 • Different Type Of Kisses And Their Meaning

  पापा  
  किस म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक विचार येतात. पण, बाळाचा पापा हादेखील एक किसचाच प्रकार आहे. मोठे छोट्यांचा पापा घेतात किंवा काही आनंददायी घडले तरी पापा घेतला जातो. हादेखील किसचाच प्रकार आहे.
   
Trending