Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Do Not Want To Be Poor Then Leave This Works Today.

गरीब व्‍हायचे नसेल तर आजच सोडा या 5 गोष्‍टी

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Mar 11, 2018, 03:46 PM IST

गरूड पुराण अनूसार 5 अशी कामे आहेत जी केल्‍याने देवी लक्ष्‍मीच नव्‍हे तर विष्‍णूही त्‍या व्‍यक्‍तीचा त्‍याग करतात.

 • Do Not Want To Be Poor Then Leave This Works Today.

  गरूड पुराण अनूसार 5 अशी कामे आहेत जी केल्‍याने देवी लक्ष्‍मीच नव्‍हे तर विष्‍णूही त्‍या व्‍यक्‍तीचा त्‍याग करतात. लाइफ मॅनेजमेंटच्‍या दृष्‍टीकोणातून पाहिले तर हे 5 काम करणारे लोक आळशी आणि बेजबाबदार असतात. यामुळे ते कोणत्‍या पदावरही पोहोचू शकत नाही व धनही कमवू शकत नाही. त्‍यांच्‍या अशा सवयींमुळे लक्ष्‍मीही त्‍यांना सोडून जाते.

  श्‍लोक
  कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्।
  सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्।।

  अर्थ: 1. मळकटलेले कपडे घालणे 2. दात स्‍वच्‍छ न ठेवणे 3. जास्‍त खाणे 4. कठोर बोलणारे 5. सूर्योदय व सुर्यास्‍तावेळी झोपणारे

  गरूड पुराणानूसार या 5 सवयी ज्‍यांना असतात देवी लक्ष्‍मी आणि विष्‍णू त्‍यांचा त्‍याग करतात...


  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, याविषयी सविस्‍तर...

 • Do Not Want To Be Poor Then Leave This Works Today.

  1. मळकटलेले कपडे घालणे
  तुम्‍ही चांगले राहिलात तर तुमच्‍याशी भेटण्‍यास इतरांना संकोच वाटत नाही. यामुळे व्‍यवसाय असो की नोकरी तुम्‍हाला यश मिळण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. याऊलट अस्‍वच्‍छ कपडे घातल्‍याने लोक तुम्‍हाला टाळतात. याचा वाईट परिणाम कामाच्‍या ठिकाणी होतो. यामुळे शक्‍यतो मळकटलेले कपडे परिधान करू नये.

   

 • Do Not Want To Be Poor Then Leave This Works Today.

  2. दात स्‍वच्‍छ न ठेवणे
  या गोष्‍टीचा सरळ संबंध तुमच्‍या आरोग्‍याशी आणि स्‍वभावाशी असतो. याने तुम्‍ही आळशी आहात हे समजते. यामुळे तुम्‍हांवर सोपवलेली जबाबदारी तुम्‍ही योग्‍यरीत्‍या पार पाडू शकत नाही.
  तसेच दात स्‍वच्‍छ न राहिल्‍यास तुम्‍हाला पोटाचे आजार होण्‍याचीही शक्‍यता असते. यामुळे दात स्‍वच्‍छ न ठेवणारे लोक आळशी आणि रोगी असण्‍याची शक्‍यता अधिक असते.

   

 • Do Not Want To Be Poor Then Leave This Works Today.

  3. प्रमाणाहून अधिक खाणारे
  प्रमाणाहून अधिक खाणारे लठ्ठ बनतात. असे शरीर त्‍यांना अधिक मेहनत करण्‍यापासून रोखते. यामुळे ते आळशी बनतात. देवी लक्ष्‍मी अशाच लोकांजवळ राहते ज्‍यांच्‍याकडे स्‍वत:च्‍या मेहनतीने पुढे जाण्‍याची क्षमता असते. यामुळे प्रमाणापेक्षा अधिक खाणा-या लोकांचाही लक्ष्‍मी त्‍याग करते.

 • Do Not Want To Be Poor Then Leave This Works Today.

  4. कठोर बोलणारे
  जे लोक छोट्छोट्या गोष्‍टींवरून दुस-यांवर ओरडतात, त्‍यांना अपशब्‍द म्‍हणतात, देवी लक्ष्‍मी अशा लोकांचा त्‍याग करते. आपल्‍या नातेवाईकांवर किंवा नोकरावर अशा पद्धतीने ओरडणारे लोक क्रूर असतात. त्‍यांच्‍या मनात प्रेम आणि दयाभाव नसतो. यामुळे ते दुस-यांचीही मदत करत नाही. या गोष्‍टीमुळे देवी लक्ष्‍मीलाही असे लोक आवडत नाही. व ती त्‍यांची साथ सोडते.

   

 • Do Not Want To Be Poor Then Leave This Works Today.

  5. सुर्योदय किंवा सुर्यास्‍तावेळी झोपणारे
  सुर्योदयाची वेळ व्‍यायामासाठी व योगसाठी तस सुर्यास्‍ताची वेळ कामासाठी असते. अशा वेळी एखादी व्‍यक्‍ती झोपत असेल तर ती बेजबाबदार असल्‍याचे संकेत आहेत. असे लोक जीवनात काहीही करत नाही व मेहनतीशिवाय सगळे मिळून जावे अशी त्‍यांची इच्‍छा असते. देवी लक्ष्‍मी त्‍यांच्‍यावरच प्रसन्‍न असते जे मेहनत करतात. यामुळे सुर्योदय किंवा सुर्यास्‍तावेळी झोपणा-या लोकांचा देवी लक्ष्‍मी त्‍याग करते.

Trending