Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | How To Celebrate Rose Day

रोज डे स्पेशल : असा सेलिब्रेट करा 'रोज डे', खुश होईल पार्टनर

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 07, 2018, 12:10 PM IST

तरुणाई ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते तो दिवस जवळ आला आहे. वैलेंटाइन डेची तारीख जवळ येत आहे.

 • How To Celebrate Rose Day

  तरुणाई ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते तो दिवस जवळ आला आहे. वैलेंटाइन डेची तारीख जवळ येत आहे. प्रत्येक वर्षी संपुर्ण जगात 7 फेब्रुवारीला रोज डे साजरा केला जातो. या दिवसापासून व्हॅलेंटटाइन डेची सुरुवात केली जाते. तुम्ही दरवर्षी आपल्या पार्टनरला रोज देऊन रोज डे साजरा करत असाल परंतु यावर्षी जरा वेगळ्या पध्दतीने रोड डे साजरा करा... चला तर मग वाचूया टिप्स...
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा रोज डे साजरा करण्याच्या काही हटके टिप्स...

 • How To Celebrate Rose Day

  रोजचे महत्त्व सांगा
  आज लाखो लोक आपल्या पार्टनरला रोज देतात. काही लोक नाते टिकवून ठेवण्यासाठी रोज देतात तर काही लोक आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी रोज देतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की प्रत्येक गुलाबाचे आपले एक वेगळे महत्त्व असते. 
  लाल गुलाब हे प्रमाचे प्रतिक असते. यामधून प्रेम व्यक्त केले जाते. पिवळे गुलाब मित्रांना रोज डे विश करण्यासाठी दिले जाते. केसरी गुलाब आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी दिले जाते. गुलाबी गुलाब आभार आणि सहानुभूती व्यक्त करण्यासाठी दिले जाते. पांढरे गुलाब सॉरी बोलण्यासाठी आणि रिस्पेक्ट दाखवण्यासाठी दिले जाते. तुम्ही यावेळी आपल्या पार्टनरला गुलाब देताना किंवा प्रपोज करताना या गुलाबाचे महत्त्व सांगा...
   

 • How To Celebrate Rose Day

  घरी सरप्राइज बुके पाठवा
  तुम्ही नेहमी तुमच्या हाताने पार्टनरला रोज देत असाल तर यावेळी असे करु नका. रोज डे इविनिंगला एक असा बुके तयार करा ज्यामध्ये महत्त्वाच्या रंगांचे रोज असतील. हा बुके तुम्ही तुमच्या हाताने तयार करा. यामधून तुमच्या भावना व्यक्त झाल्या पाहिजे. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला आपल्या भावना सांगू इच्छिता तर लाल गुलाबांचा जास्त वापर करा. मैत्रीच्या भावनेने द्यायचे असेल तर पिवळ्या गुलाबांचा वापर करा. तुमच्या पार्टनरचे जेवढे वय आहे. तेवढ्याच गुलाबांचा वापर तुम्ही करु शकता. 

 • How To Celebrate Rose Day

  रोज डे सोबत रोज डे मॅसेज देणे विसरु नका
  पार्टनरला बुके देण्यासोबच प्रेमाचा संदेश देणे विसरु नका. असे केल्याने तुम्ही तुमच्या भावना सहज व्यक्त करु शकता. जर तुम्ही सुंदर कोटेशन कार्डवर मॅसेज दिला तर पार्टनर खुप आनंदी होईल.

 • How To Celebrate Rose Day

  पार्टनरची आवड जाणुन घ्या
  तुमच्या पार्टनरला कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडेल हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ती गोष्ट रोज सोबत पार्टनरला देऊ शकता. तुम्हाला ज्या भावना व्यक्त करायच्या आहे त्याच रंगाची वस्तू द्या.

 • How To Celebrate Rose Day

  रोज देऊन दिवसाची सुरुवात करा
  तुम्ही रोज देऊन तुमच्या पार्टनरच्या दिवसाची सुरुवात करु शकता. मग तुम्ही ऑनलाइन रोज पाठवा किंवा एखादा मॅसेज पाढवा. यानंतर पुर्ण दिवस आपल्या पार्टनर सोबत राहा. येवढेच नाही जेव्हा तुम्ही दिवस संपवून घरी जाल तेव्हा एक सुंदर बुके आपल्या पार्टनरला द्या. 
   

  पुढील स्लाईडवर जाणुन घ्या प्रत्येक रंगाच्या गुलाबाचे महत्त्व...
   
 • How To Celebrate Rose Day

  फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागल्यानंतर बाजरात गुलाबाच्या फुलांची आवक वाढत असते. गुलाबाचा प्रत्येक रंग एक विशिष्ट प्रकारचा संदेश देत असते. आपल्या आवडत्या व्यक्ती‍ला गुलाबाचे फुल देण्यामागचा अर्थ काय? कोणत्या रंगाचे फुल दिल्याने कोणता संदेश मिळतो? 


  लाल गुलाब  (Red Rose)
  लाल गुलाब प्रेमाचे प्रतिक आहे. 'माझं  तुझ्यावर प्रेम आहे ' असा संदेश लाल गुलाब देतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाबाला खूप महत्त्व असते. लाल गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात.
   

 • How To Celebrate Rose Day

  पिवळा गुलाब (Yellow Rose)
  माझ्याशी मैत्री करशील काय? हेच जणू पिवळा  गुलाब विचारत असतो. पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतिक मानले जाते. यात आनंद सामावलेला असतो. पिवळ्या रंगाच्या गुलाबाचे गुच्छ देणे सांगते की तू माझा जीवलग मित्र/मैत्रीण आहेस.  एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करण्यासाठी  पिवळा गुलाब दिला जातो.
   

 • How To Celebrate Rose Day

  गुलाबी गुलाब (Pink Rose)
  गुलाबी गुलाब प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्त्व करत असतो. एखादी व्यक्ती आणि त्याचा स्वभाव आवडत असेल तर त्याला Pink गुलाब भेट देऊ शकता. तुझा स्वभाव मला आवडतोस, असा  संकेत गुलाबी गुलाब देत असतो. गुलाब आपला वेगळा भाव आणि प्रेम प्रदर्शित करतो.

 • How To Celebrate Rose Day

  पांढरा गुलाब (White Rose)
  लवकरच तुमच्या आयुष्यात कोणीतरी येणार असा संदेश पांढरा गुलाब देत असतो. या रंगाचे गुलाबाचे फूल वडील आपल्या मुलीस आणि मुले आपल्या आईला देतात. पांढरा गुलाब निर्मळ प्रेमाचे प्रतिक मानला जातो.

Trending