Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Tips To Get Success, Garun Puran Tips In Marathi

जवळ असतील हे 5 लोक, तर तुम्‍ही कधीही होऊ शकणार नाहीत यशस्‍वी आणि धनवान

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 07, 2018, 05:35 PM IST

यशस्‍वी होण्‍यासाठी जेवढी मेहनत महत्‍त्‍वाची, तेवढीच महत्‍त्‍वाची आपली संगतही असते. संगत चांगली असेल तर आपल्‍याला महत्‍त

 • Tips To Get Success, Garun Puran Tips In Marathi

  यशस्‍वी होण्‍यासाठी जेवढी मेहनत महत्‍त्‍वाची, तेवढीच महत्‍त्‍वाची आपली संगतही असते. संगत चांगली असेल तर आपल्‍याला महत्‍त्‍वाच्‍या कामामध्‍ये यश मिळते आणि आपला उत्‍साहदेखील टिकून राहतो. मात्र अयोग्‍य व्‍यक्‍तीची संगत असेल तर आपल्‍याला कधीही यश मिळत नाही आणि आपल्‍याला धनलाभही होत नाही. गुरुड पुराणानूसार जाणुन घ्‍या, यशस्‍वी आणि धनवान होण्‍यासाठी कोणत्‍या व्‍यक्‍तींची संगत अजिबात करु नये.

  आळशी लोक
  आळशी लोकांकडून कोणत्‍याही कामाची अपेक्षा करणे हेच मुळात अपयशाकडे टाकलेले पहिले पाऊल असते. आपल्‍या आसपास एखादा आळशी व्‍यक्‍ती असेल तर तोही योग्‍यरित्‍या काम करत नाही आणि आपल्‍यालाही करु देत नाही. उलट त्‍याच्‍यामुळे आपला बहुमुल्‍य वेळ वाया जातो आणि आपल्‍या लक्ष्‍यापासून आपण आणखी दूर जातो.

  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, जवळ असतील हे लोक, तर तुम्‍ही कधीही होऊ शकणार नाहीत यशस्‍वी आणि धनवान...

 • Tips To Get Success, Garun Puran Tips In Marathi

  व्‍यर्थ बडबड करणारे लोक
  अनेकांना बिन महत्‍त्‍वाची आणि व्‍यर्थ बडबड करण्‍याची सवय असते. असे लोक आपल्‍या कामामध्‍ये अडथळा बनतात आणि आपला वेळ वाया घालवतात. असे लोक आसपास असेल तर वेळेत काम होण्‍याची फार कमी शक्‍यता असते. त्‍यामुळे अशा लोकांपासून दूर रहावे.

   

 • Tips To Get Success, Garun Puran Tips In Marathi

  नकारात्‍मक विचारांचे लोक
  भित्रे लोक कोणत्‍याही कामाला सुरुवात करण्‍यापूर्वीच त्‍याविषयी नकारात्‍मक विचार करतात. असे लोक स्‍वत:ही पुढे जात नाही आणि दुस-यांनाही मदत करत नाही. अशा लोकांच्‍या आजुबाजूला राहिल्‍याने आपलेही विचार नकारात्‍मक बनण्‍याची शक्‍यता असते. यामुळे आपलाही आपल्‍या कामातील विश्‍वास उडण्‍याचा धोका असतो. त्‍यामुळे अशा लोकांपासून जेवढे अंतर ठेवता येईल तेवढे चांगले.

   

 • Tips To Get Success, Garun Puran Tips In Marathi

  दिखावा करणारे लोक
  असे बहुतांश लोक असतात जे दिखावा फार करतात, मात्र काम कमी करतात. अशा व्‍यक्‍तींचे एकमेव उद्देश असेत ते म्‍हणजे दुस-यांचे लक्ष वेधून घेणे. यासाठी नेहमी दुस-यांना कमी दाखवण्‍याचा प्रयत्‍न करतात. अशा व्‍यक्‍तीपासून आपण नेहमी दूर राहिले पाहिजे.

 • Tips To Get Success, Garun Puran Tips In Marathi

  नेहमी नशिबाच्‍या नावाने बोटे मोडणारे लोक

  जे लोक स्‍वत: काही करु शकत नाही, असे लोक नेहमी देवाला आणि भाग्‍याला याबाबत दोष देतात. मात्र देवही त्‍यांचीच मदत करतो जे स्‍वत:ची मदत करतात. असे लोक नेहमी आपले दुर्भाग्‍यपूर्ण कथन ऐकवून ऐकवून आपला वेळ वाया घालवतात. यामुळे त्‍यांच्‍यापासूनही दूर रहावे.

Trending