Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Valentine Week 2018: speciality of each day

आजपासून व्‍हेंलेटाइन वीक सुरु, जाणुन घ्या प्रत्‍येक दिवसाचा अर्थ

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 07, 2018, 12:24 PM IST

प्रेमी ज्‍या आठवड्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो व्‍हेंलेटाइन वीक आज पासून सुरु होत आहे. 14 फेब्रुवारीला व्‍हेंलेटाईन म

 • Valentine Week 2018: speciality of each day

  प्रेमी ज्‍या आठवड्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो व्‍हेंलेटाइन वीक आज पासून सुरु होत आहे. 14 फेब्रुवारीला व्‍हेंलेटाईन म्‍हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्‍याच्‍या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्‍हणजे खास क्षणच असतात. प्रत्‍येक दिवसाची एक खासियत असते.


  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंतचा प्रत्‍येक दिवस काय म्‍हणून साजरा केला जातो....

 • Valentine Week 2018: speciality of each day

  रोझ डे

  व्‍हेंलेटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीला 'रोड डे'ने होते. या दिवशी प्रेमी एकमेकांना लाल गुलाब देऊन आपले प्रेम व्‍यक्‍त करतात. हे फक्‍त प्रेमींपूरतेच मर्यादित आहे. असे नव्‍हे तर तुम्‍ही मित्र, मैत्रीण, पालक, नातेवाईक, एखादी स्‍पेशल व्‍यक्ती यांनाही पिवळे गुलाब देऊन त्‍यांच्‍याबद्दलच्‍या आपल्‍या भावना व्‍यक्‍त करु शकतात.

 • Valentine Week 2018: speciality of each day

  प्रपोज डे

  व्‍हेंलेटाइनमधील सर्वात खास आणि धाकधुकीचा दिवस म्‍हणजे 8 फेब्रुवारीचा प्रपोज डे. यादिवशी तुम्‍हाला तुमच्‍या प्रिय व्‍यक्‍तीला मनातील भावना सांगायच्‍या असतात. विशेष 3 लोकांसाठी हा दिवस खास असतो. जे सिंगल असतात ते या दिवशी आपले प्रेम व्‍यक्‍त करुन मिंगल होऊ शकतात किंवा त्‍यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्‍यास त्‍याचे दु:खही होते. मात्र काहीही झाले तरी हा दिवस त्‍यांच्‍यासाठी सर्वाधिक खास असतो. दुसरे असतात जोडपे. ते या खास दिवशी आपले प्रेम व्‍यक्‍त करुन नाते आणखी घट्ट बनवतात. तर काही जण यादिवशी आपल्‍या जोडीदाराला लग्‍नासाठीही प्रपोज करतात. अर्थात मागणी घालण्‍यासाठी यापेक्षा विशेष दिवस कोणता असेल?

 • Valentine Week 2018: speciality of each day

  चॉकलेट डे

  गोड चॉकलेट एकमेकांशी शेअर करुन नात्‍यातही गोडवा आणणारा चॉकलेट डे. 9 फेब्रुवारीला याला साजरा केला जातो. काही रुसवा, फुगवा असेल तर चॉकलेट देऊन तो दूर करण्‍यासाठी हा दिवस उत्‍तम.

 • Valentine Week 2018: speciality of each day

  टेडी डे

  तुमच्‍या प्रिय व्‍यक्‍तीला टेडी गिफ्ट करायचा असेल तर यापेक्षा चांगला दिवस नाही. 10 फेब्रुवारीचा हा दिवस त्‍यांच्‍यासाठी आहे ज्‍यांना हे सॉफ्ट टॉइज प्रचंड आवडतात.

   

 • Valentine Week 2018: speciality of each day

  प्रॉमिस डे

  11 फेब्रुवारीचा हा दिवस थोडासा प्रॅक्‍टीकल बनण्‍याचा दिवस आहे. ऐकमेकांबद्दल विश्‍वास, भविष्‍याच्‍या योजना आणि कधीही साथ न सोडण्‍याचे प्रॉमिस यादिवशी केले जाते. 

 • Valentine Week 2018: speciality of each day

  हग डे

  प्रेमात एकमेकांना मिठी मारण्‍यापेक्षा चांगले काय असू शकेल? 12 फेब्रुवारी हा दिवस तुम्‍हाला अशी संधी देतो ज्‍यादिवशी तुम्‍ही एकमेकांना मिठीत घेऊन आपल्‍याच नात्‍याविषयी नविन काही जाणुन घेऊ शकता. तुम्‍हाला तिची किती काळजी आहे आणि तुम्‍ही किती प्रेम करता? हे सांगायचे असेल तर हग डे शिवाय चांगला दिवस नाही.

   

 • Valentine Week 2018: speciality of each day

  किस डे

  प्रेमात असणा-यांसाठी हा अतिशय सुंदर दिवस आहे. व्‍हेंलेटाईनच्‍या केवळ 1 दिवस पूर्वी 13 फेब्रुवारीला किस डे साजरा करतात. किसला प्रेमाचे सर्वात चांगले एक्‍सप्रेशन म्‍हटले जाते. जगभरातील प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो.

 • Valentine Week 2018: speciality of each day

  व्‍हेलेंटाइन डे

  या विकचा समारोप 14 फेब्रुवारीला व्‍हेलेंटाइन डेने होतो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात.

Trending