Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Bhavishya Puran And Tips In marathi For Happy Life

चुकूनही या स्त्रियांचा करू नये अपमान, अन्यथा पुण्य नष्ट होऊन वाढेल दुर्भाग्य

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 05, 2018, 02:09 PM IST

भविष्य पुराणानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांचा अपमान करू नये. महिलांचा अपमान केल्याने आपले

 • Bhavishya Puran And Tips In marathi For Happy Life

  भविष्य पुराणानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांचा अपमान करू नये. महिलांचा अपमान केल्याने आपले सर्व पुण्य नष्ट होते आणि व्यक्तीला दुर्भाग्याला सामोरे जावे लागू शकते. शास्त्रामध्ये लिहिले आहे की..


  नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता।यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया।


  या श्लोकानुसार, जेथे स्त्रियांची पूजा होते, तेथे देवी-देवता निवास करतात. जेथे स्त्रियांचा अपमान होतो तेथे नेहमी अडचणी आणि गरिबी राहते. श्रीरामचरितमानसनुसार रावणाने देवी सीतेचा अपमान केला आणि या पापामुळे त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला. यामुळे आपणही येथे सांगण्यात आलेल्या महिलांचा नेहमी मान-सन्मान करणे आवश्यक आहे.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, आपण कोणत्या स्त्रियांचा नेहमी मान ठेवावा...

 • Bhavishya Puran And Tips In marathi For Happy Life

  गीताप्रेस गोरखपूरद्वारे प्रकाशित संक्षिप्त भविष्य पुराणातील ब्राह्म पर्वानुसार, ji स्त्री आपल्याला नमस्कार करत असेल त्यांना योग्य मान देऊन अशा स्त्रीचा नेहमी सन्मान करावा. या व्यतिरिक्त आपली आई, मावशी, मामी, सासू, आत्या, गुरूंची पत्नी, भावाची पत्नी यांचा नेहमी मान ठेवावा. कोणत्या परिस्थितीमध्ये यांच्याशी वाईट वागू नये.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, यांचा अपमान केल्याने काय होते...

 • Bhavishya Puran And Tips In marathi For Happy Life

  भविष्य पुराणानुसार, जो व्यक्ती या सर्व महिलांचा अपमान करतो त्याला भाग्याची साथ मिळत नाही. असा व्यक्ती नेहमी अडचणींमध्ये राहतो. तुमच्याकडून कळत-नकळतपणे एखाद्या स्त्रीचा अपमान झाला असेल तर त्या स्त्रीची अवश्य क्षमा मागावी. महिलेने माफ केल्यास तुम्ही विविध अडचणींमधून मुक्त होऊ शकता.

Trending