Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Chanakya niti about marriage in marathi

चाणक्य नीती : अवश्य वाचा, कोणत्या सुंदर मुलीशी का करु नये लग्न

रिलिजन डेस्क | Update - Jun 01, 2018, 02:57 PM IST

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर केवळ वर-वधुचे नव्हे तर त्यांच्या कुटूंबीयांचे देखील आ

 • Chanakya niti about marriage in marathi

  लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर केवळ वर-वधुचे नव्हे तर त्यांच्या कुटूंबीयांचे देखील आयुष्य बदलते. लग्नाचा एक निर्णय आयुष्य बदलून टाकू शकतो. जोडीदाराची निवड काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. आजकाल पुरूष सुंदर मुलीशी लग्न करण्यास प्रधान्य देतात परंतु काही सुंदर मुलीही लग्नासाठी अयोग्य असतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कोणत्या मुलीशी लग्न करावे आणि कोणत्या मुलीशी करू नये या संदर्भात आचार्य चाणक्यांनी काही अचुक नीती सांगितल्या आहेत.


  वरयेत् कुलजां प्राज्ञो विरूपामपि कन्यकाम्।
  रूपशीलां न नीचस्य विवाह: सदृशे कुले।।


  आचार्य चाणक्यांनी या श्लोकात लग्नासाठी योग्य आणि अयोग्य स्त्रीयांचे गुण सांगितले आहेत. असा पुरूष हुशार असतो, जो संस्कारी घरातील सुस्कांरी मुलीसोबत लग्न करतो.


  पुढे जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ...

 • Chanakya niti about marriage in marathi

  आचार्य चाणक्यांनुसार लग्न करताना स्त्रीचे बाहेरील सौंदर्य न पाहता मनातील सौंदर्य पाहावे. जर एखाद्या उच्च कुळातील किंवा मोठ्या कुटुंबातील मुलगी दिसण्यास सुंदर नसेल परंतु सुसंस्कारी असेल तर त्या मुलीशी लग्न करावे. याउलट एखादी सुंदर मुलगी संस्कारी नसेल, अधार्मिक असेल, नीच कुळातील, जिचे चारित्र्य ठीक नसेल अशा मुलीशी कोणत्याही परिस्थितीमध्ये लग्न करू नये. लग्न नेहमी समान कुळामध्ये करणे शुभ राहते.

 • Chanakya niti about marriage in marathi

  आचार्य चाणक्यांनुसार समजदार आणि श्रेष्ठ मनुष्य तोच आहे, जो उच्च कुळामध्ये जन्म घेणाऱ्या सुसंस्कारी मुलीशी लग्न करतो. लग्नानंतर मुलीचे गुणच कुटुंबाला पुढे नेण्यात मदत करतात. याउलट सुंदर असलेली परंतु नीच कुळामध्ये जन्म घेणारी मुलगी लग्नानंतर कुटुंब तोडते. अशा मुलींचा स्वभाव आणि आचरण खालच्या दर्जाचे असते. धार्मिक आणि देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या मुलीचे आचार-विचार शुद्ध असतात, जी एका श्रेष्ठ कुटुंबाचे निर्माण करू शकते. महिलांनीही असे अवगुण असण-या पुरूषासोबत लग्न करू नये.

Trending