Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | chanakya niti about money

पैसे कमवत असाल तर लक्षात ठेवा ही एक गोष्ट, अन्यथा असा पैसा काही कामाचा नाही

रिलिजन डेस्क | Update - Apr 25, 2018, 03:03 PM IST

पैसे कमावणे एक कला आहे परंतु याचा उपयोग करणे त्यापेक्षाही मोठी कला आहे. जर तुम्ही पैसे कमवत असाल तर चाणक्यांची एक नीती न

 • chanakya niti about money

  पैसे कमावणे एक कला आहे परंतु याचा उपयोग करणे त्यापेक्षाही मोठी कला आहे. जर तुम्ही पैसे कमवत असाल तर चाणक्यांची एक नीती नेहमी लक्षात ठेवा. पैसा कमावण्यासोबतच त्यासंदर्भात कोणतीही योजना नसेल किंवा त्याचा उपयोग कसा करावा याचे काहीही कारण नसेल तर तो पैसा कोणत्याच कामाचा नाही.


  धन म्हणजेच पैशांचे महत्त्व लक्षात घेऊन शास्त्रामध्ये विविध नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास व्यक्तीला आयुष्यात सुख आणि शांती प्राप्त होते. चाणक्य यांनी मगधमध्ये धनानंदचे साम्राज्य नष्ट करून चंद्रगुप्त मौर्यला सम्राट बनवले होते. अनेक वर्ष भारताच्या महामंत्री पदावर राहिलेल्या आचार्य चाणक्यांनी अर्थशास्त्रची रचना केली होती. त्यांचे वडील आचार्य चणक अर्थशास्त्रचे शिक्षक होते. आचार्य चाणक्य यांनी पैशाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण नीती सांगितली आहे.


  उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणाम्।
  तडागोदरसंस्थानां परीस्रव इवाम्भसाम्।। (चाणक्य नीती)


  पुढील स्लाईडवर वाचा, या नीतीचा संपूर्ण अर्थ...

 • chanakya niti about money

  अर्थ : आपण कमावलेल्या धनाचा उपभोग घेणे किंवा योग्य व्यय करणे हेच धनाचे रक्षण करण्यासमान आहे. ज्याप्रमाणे एखाद्या तलाव किंवा भांड्यातील पाण्याचा उपयोग न केल्यास ते खराब होते.


  आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने कमावलेल्या पैशांचा सदुपयोग करावा. काही लोक पैसा साठवून ठेवतात त्याचा उपयोग करत नाहीत. आवश्यकतेपेक्षा जास्त धनाची बचत करणे अनुचित आहे. यामुळे जास्त झालेल्या धनाचे दान करावे. योग्य कार्यामध्ये धनाची गुंतवणूक करावी. हेच धनाचे रक्षण आहे. एखादा व्यक्ती दिवस-रात्र कष्ट करून पैसा कमवत असेल परंतु त्याचा उपभोग घेत नसेल तर अशा पैशांचा काय लाभ आहे. ठीक अशाच प्रकारे एखाद्या तलावात भरपूर पाणी असूनही त्याचा योग्य वापर केला नाही तर ते खराब होऊन जाते. अशा पाण्याचा योग्य कामासाठी उपयोग केला तरच ते कामी येईल. हीच गोष्ट पैशांच्या बाबतीत लागू होते.

Trending