Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | eating tips according mahabharata anushasan parva

अशा पद्धतीने जेवण केल्यास देवी-देवतांची प्राप्त होते कृपा

रिलिजन डेस्क | Update - May 23, 2018, 04:31 PM IST

शरीरला शक्ती आणि उर्जा मिळत राहण्यासाठी शुद्ध आणि ताजा आहार घेणे आवश्यक आहे. परंतु आपण कोणत्या प्रकरच्या अन्नाचे सेवन कर

 • eating tips according mahabharata anushasan parva

  शरीरला शक्ती आणि उर्जा मिळत राहण्यासाठी शुद्ध आणि ताजा आहार घेणे आवश्यक आहे. परंतु आपण कोणत्या प्रकरच्या अन्नाचे सेवन करू नये हे फार कमी लोकांना माहिती असावे. काहीवेळेस अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे ताजे अन्न खाण्यायोग्य राहत नाही. अशा परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.


  महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये अन्नासंबंधी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास शरीराचे पावित्र्य चांगले राहते तसेच आरोग्यही उत्तम राहते.


  - महाभारतातील अनुशासन पर्वानुसार एखाद्या व्यक्तीने अन्न ओलांडले तर ते अन्न खाऊ नये. असे जेवण अपवित्र आणि राक्षसांचा आहार बनते.
  - जे अन्न भांडण, वाद-विवाद करून मिळवलेले असेल, असे अन्न खाऊ नये.
  - अन्नावर एखाद्या रजस्वला स्त्रीची सावली पडली असेल तर ते अन्न दुषित होते. असे अन्न खाऊ नये.
  - जर अन्नाला कुत्र्याने स्पर्श केला असेल किंवा त्याकडे त्याची नजर गेली असेल तर असे अन्न अपवित्र होते.
  - जेवणामध्ये केस निघाल्यास असे जेवणही अपवित्र होते. असे अन्न खाऊ नये.

Trending