आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहम्मद पैगंबरांच्या या 12 गोष्टी लक्षात ठेवल्यास, दूर होतील जीवनातील सर्व अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 16 जून रोजी ईद आहे. हे मुस्लिम धर्माचा सर्वात खास आणि महत्त्वाचा सण आहे . कुराण या धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. कुराण अल्लाहने मोहम्मद पैगंबर यांच्याद्वारे मनुष्यापर्यंत पोहोचवले आहे. हजरत मोहम्मद यांना अल्लाहचा संदेशवाहक किंवा पैगंबर मानले गेले आहे. मुस्लिम समाजात एक कलमा वारंवार म्हटला जातो -  ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर्रसूलुल्लाह। याचा अर्थ - अल्लाह एक आहे, याव्यतिरिक्त दुसरा परमात्मा नाही आणि मोहम्मद त्याचे रसूल म्हणजे पैगंबर आहेत. उज्जैनचे कवी शबनम अली ‘शबनम’ यांच्यानुसार जाणून घ्या, मोहम्मद पैगंबर यांची सांगितलेल्या 12 अशा गोष्टी, ज्यांचे पालन केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात...


1. सर्वात उत्तम व्यक्ती तोच असतो, ज्याचे आचरण चांगले राहते.

2. वृद्ध, वडीलधारी मंडळींचा आदर करावा. विनम्र राहावे. हाच मोक्ष मार्ग आहे.

3. त्रास देणाऱ्याबद्दलही कधीची बदल्याची भावना ठेवू नका. तुमची बदल घेण्याची ताकद असेल तरीही इतरांना माफ करावे.

4. महिला आणि सेवकांवर कधीही हात उचलू नये. 

5. कामगाराचा घाम सुकण्यापूर्वी त्याची मजुरी देऊन टाकावी.

6. पाण्याचा अपव्यय करू नये. तुम्ही नदीच्या काठावर असाल तरीही पाणी वाया घालू नका.

7. कोणत्याही पक्षी, प्राणी आणि जीवावर अत्याचार करू नये.

8. सर्वात बुद्धिमान व्यक्ती तोच आहे, जो मृत्यूचे अटळ सत्य मानतो आणि पाप करण्यापासून दूर राहतो.

9. प्रत्येक ठिकाणी आणि कामामध्ये प्रामाणिक राहा. कोणाशीही वाद घालू नका. 

10. मुलांसाठी आई-वडिलांची सर्वात मोठी भेट म्हणजे उत्तम शिक्षण आहे.

11. आपल्या भावंडांशी नेहमी मोकळया आणि आनंदी मनाने भेटावे.

12. असंतुष्ट आणि अशांत मन काम अशाप्रकारे खराब करते, ज्याप्रकारे आंबट पाणी मधाला खराब करते.

बातम्या आणखी आहेत...