परीक्षेची भीती वाटू / परीक्षेची भीती वाटू नये यासाठी विद्यार्थ्यांनी अवश्य ट्राय करावेत हे उपाय

Mar 05,2018 10:38:00 AM IST

बोर्डाच्या परीक्षेपूर्वी भीती वाटणे स्वाभाविक अाहे. परंतु ही भीती खूप वाढली असेल ज्यामुळे अभ्यास करणे, लक्षात ठेवणे व अापली सामान्य कामे करताना अडचण हाेत असेल, तर याला ‘एग्जाम फोबिया‘ म्हणतात.


ही अाहेत लक्षणे
- नेहमी पेपर चांगला जाणार नाही, असे वाटणे, झाेप चांगली न येणे, रडण्यासारखे वाटणे.
- खाणे-पिणे कमी हाेणे, पाेट खराब हाेणे, खूप घाम येणे, ताप येणे, वाचलेले विसरून जाणे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यापासून बचावाचे उपाय...

बचाव कसा करावा - अापल्याबाबत सकारात्मक लिहून ते अभ्यासाच्या खाेलीत चिकटवा. जसे, मी अभ्यासात चांगला अाहे. - अापली सरासरी झाेपण्याची वेळ समजून घ्या. परीक्षेच्या दिवसातही त्यात माेठा बदल हाेईल, असे काही करू नका. - मागील वर्षांचे पेपर साेडवा. तसेच अापल्या शिक्षकांकडून ते तपासून घ्या.- विषयाचे वाचन झाल्यावर शाॅर्ट नाेट तयार करा. ज्यामुळे दुसऱ्यांदा वाचताना शाॅर्टनाेटमुळे बेसिक गाेष्टींची उजळणी हाेईल. नोट्स बनवण्यासाठी कलर पेन व मार्करचा वापर करा. - सलग अभ्यास करण्यापेक्षा प्रत्येक तासानंतर १५ मिनिटांचा ब्रेक घ्या. - ग्रुप स्टडी करा. यामुळे ज्या भागाचा अभ्यास करायचा अाहे, ताे चांगला लक्षात राहताे. तसेच अापल्या मनात असलेली भीती दूर हाेते.- टाइम मॅनेजमेंट गरजेचे अाहे. यासाठी अापल्या अभ्यासाची वेळ राेज लिहून काढा. त्याप्रमाणे अभ्यास करा. - खाण्या-पिण्यात पाणी व ज्यूसचे प्रमाण वाढवा. - ब्रेन गेम जसेे सुडोकू व क्रॉसवर्ड खेळा. - मेंदूस रिलॅक्स करण्यासाठी व एकाग्रता वाढवण्यासाठी याेगा व प्राणायाम करा.
X