Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | fathers day special story: dipika, amitabh,tata, ambani express feelings

अमिताभ, दीपिका, टाटा, अंबानी; वाचा काय म्‍हणतात त्‍यांच्‍या वडीलांबद्दल

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jun 17, 2018, 11:41 AM IST

वडिलांची शिकवण आयुष्यभर सोबत राहते. मुलांसाठी मित्र, प्रशिक्षक, आदर्श व्यक्तिमत्त्व, मार्गदर्शकासहित अनेक भूमिका वडील पा

 • fathers day special story: dipika, amitabh,tata, ambani express feelings
  ‘आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत ते सतत अशक्त होत चालले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संघर्ष आहे.’- अमिताभ बच्‍चन

  वडिलांची शिकवण आयुष्यभर सोबत राहते. मुलांसाठी मित्र, प्रशिक्षक, आदर्श व्यक्तिमत्त्व, मार्गदर्शकासहित अनेक भूमिका वडील पार पाडतात. आज फादर्स डेनिमित्त देशातील प्रख्यात व्यक्तिमत्त्वे वडिलांच्या रूपात कशी आहेत हे आम्ही सांगत आहोत. त्यांची मुले आणि ज्यांनी त्यांना पितृतुल्य मानले अशा व्यक्तींनी त्यांच्या व्यक्तित्वाचे हे पैलू समोर आणले आहेत.

  अमिताभ | हरिवंशराय बच्चन

  ‘मला असे वाटते की मी त्यांच्यासोबत जेवढा काळ व्यतीत करू शकलो तो खूप कमी होता, कारण ते खूप व्यग्र असत. मी त्यांच्यासोबत आणखी काही काळ व्यतीत करू शकलो असतो, त्यांचे विचार समजू शकलो असतो तर बरे झाले असते. ते खूप कठोर होते. आमची जास्त चर्चा होत नसे, पण काळासोबत नाते आणखी मजबूत होत गेले. पण अभिषेकशी मी नेहमी मित्रत्वाचे नाते ठेवले आहे, ते पुढेही कायम राहील. त्यांच्या वडिलांचा पुनर्जन्म माझ्या रूपात झाला, असे बाबूजींना का वाटत होते हे सांगता येत नाही.’
  एकदा मी रागात विचारले की, तुम्ही मला जन्म का दिलात? त्याच्या उत्तरात बाबूजींनी एक कविता लिहिली होती.
  जिंदगी और जमाने की कश्मकश से घबराकर, मेरे बेटे मुझसे पूछते हैं कि हमें पैदा क्यों किया था?
  और मेरे पास इसके सिवाय कोई जवाब नहीं है कि, मेरे बाप ने मुझसे बिना पूछे मुझे क्यों पैदा किया था?
  और मेरे बाप को उनके बाप ने बिना पूछे उन्हें और उनके बाबा को बिना पूछे, उनके बाप ने उन्हें क्यों पैदा किया था?
  जिंदगी और जमाने की कश्मकश पहले भी थी, आज भी है शायद ज्यादा कल भी होगी, शायद और ज्यादा…
  तुम ही नई लीक रखना, अपने बेटों से पूछकर उन्हें पैदा करना।

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर सेलिब्रिटी काय म्‍हणतात त्‍यांच्‍या वडीलांबद्दल...

 • fathers day special story: dipika, amitabh,tata, ambani express feelings

  मेघना | गुलजार

  मी लहानपणापासून दोन घरांत राहिले. एक वडील गुलजार व दुसरे आई राखीचे घर. मला वडिलांचा साधेपणा खूप आवडतो. त्यांनी मला कायम स्वातंत्र्य दिले. लहानपणी खोड्या केल्या तरी ते रागावले नाहीत. कविता व लेखनामुळे त्यांच्या होणाऱ्या कौतुकाचे मला नेहमी आश्चर्य वाटायचे. लोक मला विचारायचे, वडिलांचा एखादा गुण जोडीदारामध्ये पाहतेस का? त्यावर मी म्हणते, दोघे भिन्न प्रकारची व्यक्तिमत्त्वे आहेत याबाबत मी आनंदी आहे. वडिलांचा साधेपणाचा वारसा मला मिळाला आहे. मी त्यांना नेहमी खरा व प्रामाणिक व्यक्ती म्हणून पाहिले. कितीही विपरीत परिस्थिती असली तरी ते देण्या-घेण्याच्या व्यवहारात कायम प्रामाणिक राहिले आणि मी तसाच बनण्याचा प्रयत्न करते. वडील प्रसिद्ध व्यक्ती नसले असते तर त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवता अाला असता, असे लोक मला विचारत. मात्र, मला असा रितेपणा जाणवला नाही. त्यांनी आपले कामाचे जीवन माझ्या आसपास गुंफले होते. ते मला शाळेतून न्यावयास येत. काही खास कार्यक्रमावेळी ते माझ्यासोबत असत. आमचे नातेसंबंध विशिष्ट बाप-लेकीच्या नात्यासारखे आहेत. आम्ही मित्र नाहीत, कारण आमच्यात आदराची रेषा कायम राहिलेली आहे, ती पार करण्याचा मी प्रयत्न कधी केला नाही.

 • fathers day special story: dipika, amitabh,tata, ambani express feelings

  मुकेश | धीरूभाई अंबानी

  जेव्हा मी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून परतलो होतो, तेव्हा २५ वर्षांचा होतो. एक दिवस व्यवसायाची शिकवणी घेण्यासाठी वडिलांजवळ बसलो होती. मी त्यांना विचारले-मी कोणते काम करावे? तेव्हा माझे वडील म्हणाले-जर तू नोकरी केली तर मॅनेजर असशील, जर आंत्रप्रेन्योर होशील, तर काय करायचे आहे हे तुला समजेल. मला असे वाटते की, माझे वडील आणि रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी आजही आमच्यासोबत आहेत. गीतेत म्हटल्याप्रमाणे-‘आत्म्याचा ना जन्म होतो, ना मृत्यू होतो.’ त्याप्रमाणे धीरूभाई आमच्या मनात जिवंत आहेत. आम्हाला आजही त्यांची उपस्थिती जाणवते. ते येथेच कुठे तरी बसले आहेत आणि आम्हाला पाहून स्मितहास्य करत आहेत, असे मला आजही वाटते. माझे वडील कालजयी इतिहासपुरुष आहेत आणि ते प्रत्येक पिढीच्या भारतीयांसाठी आदर्श व प्रेरणास्रोत आहेत. आम्ही त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी समर्पित राहू. रिलायन्स इंडस्ट्रीज एका कर्मचाऱ्यापासून वाढून आज अडीच लाखांवर कर्मचाऱ्यांची आहे, एक हजारावरून सहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची आणि एका शहरापासून वाढून २८ हजार शहरांची आणि चार लाखांपेक्षा जास्त गावांची होऊ शकली, याचे श्रेय धीरूभाई यांनाच आहे.  

 • fathers day special story: dipika, amitabh,tata, ambani express feelings

  कुमारमंगलम | आदित्य बिर्ला

  मी भाग्यवान आहे की मला असे आई-वडील मिळाले. वास्तवात माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा फादर्स डे आहे.  ते सर्वाेत्कृष्ट, सर्वात प्रेमळ आणि सर्वात जास्त काळजी घेणारे पिता होते. मी कायम त्यांच्याकडे श्रद्धा, सन्मान व प्रेमाने पाहतो. ते माझ्याशी संबंधित लहानातल्या लहान गोष्टीत रस घेत असत. ते मग माझे शिक्षण असो की खेळ वा एखादी आवड असो.
  वडील व्यवसायाशी संबंधित कामात कायम व्यग्र असत. असे असतानात ते माझ्यासाठी वेळ काढत असत. मला आठवतेय, त्यांनी माझ्या शाळेतल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. त्यांनी एकही कार्यक्रम चुकवला नाही. माझे मित्र कोण आहेत, कोणासोबत असतो याची त्यांना माहिती असे. एवढेच नव्हे, तर मी काय करतोय हेही त्यांना माहीत होते. मात्र, मी त्यांना भीतही होतो. महाविद्यालयाच्या दिवसांत एकदा असा प्रसंग घडला होता. मी वाणिज्य शाखेचे पदवी शिक्षण घेत होतो. एकदा वडिलांनी मला फोन करून विचारले होते की, कुमार, मला वाटते तू यासोबत सीएचा कोर्सही करायला पाहिजे. यात हैराण होण्याची बाब म्हणजे तेव्हा परीक्षेसाठी केवळ दोन महिन्यांचा अवधी राहिला होता आणि वडिलांनी सीए  कोर्सची इच्छा व्यक्त केली होती. तसे पाहता सीए करण्याची माझी इच्छा नव्हती. मात्र, वडिलांना ते सांगण्याएवढे धाडस एकवटू शकलो नाही. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला कधी नकार दिला नाही. हे काम योग्य आहे, असे सांगितल्यावर मी ते निमूटपणे केले. माझ्या आत दडलेले सर्वाेत्कृष्ट गुण कसे बाहेर काढायचे याची त्यांना चांगली जाण होती. असे असले तरी जिथे व्यवसायाचा विषय असेल तिथे स्वत:च स्वत:चा निर्णय घेण्याची शिकवण त्यांना आजोबांनी दिली होती. तीच शिकवण व मला त्यांनी दिली. यासोबत घेतलेल्या  निर्णयाची जबाबदारीही स्वत:च उचलण्याची जबाबदारी त्यात अपेक्षित होती. हीच शिकवण वडिलांच्या निधनानंतरही कामी येत आहे. १५ वर्षांचा असल्यापासून हा धडा मिळाला. मी कंपनीच्या बैठकीत वडिलांसोबत जात होतो व बैठकीनंतर त्यांच्याशी बऱ्याचदा प्रश्नोत्तरे होत.  
  तुम्ही आपल्या नैतिक मूल्यांसोबत तडजोड न करता यश प्राप्त करू शकता यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. याचा आपल्या आचरणात समावेश व्हावयास हवा. ते अनेकदा म्हणत, जिद्द, उत्साह व झोकून देण्याच्या वृत्तीला पर्याय नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे दर्शवते. त्यांच्या या ओळी माझ्यासाठी मार्गदर्शक आहेत. आयुष्यात कामाशिवाय बरेच काही असते. त्यांच्या या विचारांची माझ्यावर खूप छाप आहे. आयुष्य मोकळेपणाने जगावे, असे त्यांचे म्हणणे होते. खूप कष्ट करा, स्वप्नांचा पिच्छा करा. तुम्ही मन व मेंदूने जुंपला असाल तर ही स्वप्ने पूर्ण करू शकता. ते जेव्हा अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत होते तेव्हा त्यांनी माझ्या आजी-आजोबांना पत्र लिहिले होते. त्यात नमूद केले होते की, मी खूप काही मोठे करू इच्छितो, खूप मोठे. त्यांनी ते करूनही दाखवले. पदवी प्राप्त केल्यानंतर ते इन्स्पेक्टर राजच्या जाळ्यात अडकले होते. अशा स्थितीत त्यांनी दक्षिण-पूर्व आशियाकडे मोर्चा वळवला व पुढील दोन दशकांत मोठा व्यवसाय उभा केला. त्यांनी या निमित्ताने दक्षिण-पूर्व आशियात भारताचा नकाशा साकारला. आज आमचे सहा खंडांतील ३५ देशांमध्ये अस्तित्व आहे. आमची निम्मी उलाढाल विदेशातील व्यवसायातून होते. हा त्यांच्या दूरदर्शीपणाचा परिणाम आहे. यामुळे बिर्ला ग्रुपला जगात यशस्वी व्यवसाय चालवण्याचा विश्वास दिला.
  राष्ट्र उभारणीच्या कामात सदैव तत्पर असणारे व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो. ते खूप कठोर परंतु संवेदनशील व्यक्ती होते. एखाद्या सहकाऱ्याच्या कुटुंबात कुणी आजारी असेल तर ते स्वत: डॉक्टरांना बोलून उपचाराची व्यवस्था लावत. ते माझे सर्वात मोठे गुरू होते. त्यांच्याकडून प्रत्येक जण शिकू शकतो. बोलचालीच्या पद्धतीत ते जीनियस होते. ते गहन विचार करत. त्यांचे विचार आजही सुसंगत आहेत. ते एक थोर व्यक्ती होते व थोर लोक अमर असतात.

 • fathers day special story: dipika, amitabh,tata, ambani express feelings

  रतन टाटा | जेआरडी टाटा

  टाटा ग्रुप  मी १९६२ मध्ये जॉइन केला होता. ऑस्ट्रेलियात शॉप फ्लोर, टेक्सटाइल्स, स्टील, टाटा मोटर्ससहित अनेक ठिकाणी मी काम केले. जेआरडी टाटांच्या रूपात मला चांगला मार्गदर्शक मिळाला होता. मला आठवते, १९९१ च्या बैठकीत माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर मी त्यांच्यासोबत ऑफिसपर्यंत गेलो. तेथे त्यांनी त्यांच्या सचिवाला म्हटले होते की, ‘आता आपण येथून जायला हवे. पण मी त्यांना म्हटले होते, नाही, तुम्हाला कुठेही जायचे नाही. हे तुमचेच ऑफिस आहे. तुमची इच्छा असेपर्यंत. ते म्हणाले होते, खरंच? मग विचारले होते- तुम्ही कुठे बसणार? मी म्हटले होते- जिथे मी आज बसतो तिथे. पण आपण पायउतार झालो आहोत हे जेआरडी विसरून जातील, अशी भीती मला वाटत होती. तेव्हा ते टाटा स्टील आणि टेल्को बोर्डावर होते. मला वाटले होते की, ते पडद्यामागून कंपनी चालवतील आणि आपला दृष्टिकोन लागू करतील, पण त्यांनी असे केले नाही. आमचे संबंध एवढे चांगले होते की, मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणत होतो- जे, हे १० वर्षांपूर्वीच झाले असते तर. ते म्हणत असत-मलाही तसेच वाटते. ते माझे मार्गदर्शक होते. मी नशीबवान होतो की ते तेथे होते. त्यांच्या सहकार्याविना मी हे कधीही करू शकलो नसतो. ते वडिलांप्रमाणे होते, भावाप्रमाणे होते.  

 • fathers day special story: dipika, amitabh,tata, ambani express feelings

  रणबीर | ऋषी कपूर

  मी जेव्हा मोठा होऊ लागलो तेव्हा त्यांच्याप्रमाणेच अभिनेता होण्याची इच्छा होती. अभिनय हे त्यांचे वेड आहे. आम्हा दोघांत अगदी जुन्या काळातील वडील-मुलगा असे संबंध आहेत. मी तर आजही त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवून बोलू शकत नाही. माझ्या आजोबांचे त्यांच्याशी जसे नाते होते अगदी तसेच नाते माझ्याशी ठेवण्याची त्यांची इच्छा असायची. लहानपणी मी त्यांच्यासोबत जेवायलाही घाबरत असे. तेव्हा मला भाजी आवडत नसे. चिकन खात असे. त्या वेळी त्यांनी आवाजातही भाजी खाण्यास सांगितल्यावर मला रडू फुटत असे. ते निश्चित भूमिका घेणाऱ्यांपैकी एक आहेत. टीकेची पर्वा करत नाहीत. स्वत:चे म्हणणे मांडतातच. ते सहजपणे माझी स्तुती करत नाहीत. मम्मीमार्फत बोलून दाखवतात. मी जेव्हा काही चांगले करतो, तेव्हा ते मोजक्या शब्दांत सांगून निघून जातात. त्यांची ही पद्धतही मला खूप चांगली वाटते. त्यामुळे मी जास्त उत्साही राहतो. ते खूप जिद्दी आहेत. जी गोष्ट त्यांना चांगली वाटली ती ते करतातच. या वयातही वेगवेगळ्या भूमिका करण्याची त्यांची इच्छा आहे. नात्यांबाबत ते कमिटेड आहेत. जी व्यक्ती त्यांना आवडली, तिच्यासोबत अखेरपर्यंत नाते टिकवणाऱ्यांपैकी ते एक आहेत.  

 • fathers day special story: dipika, amitabh,tata, ambani express feelings

  दीपिका । प्रकाश पदुकोण

  मी माझ्या डॅडीची लिटल गर्ल व सपोर्ट सिस्टिम आहे. आम्ही कधी हास्य-विनोद करताे, तर कधी एकमेकांची खेचतो. लहानपणी मी कधी खोड्या केल्या तर ते कठोर होत. कधी कधी तर स्टोअर रूममध्ये बंद करायचे. अॅथलीट असल्यामुळे ते वेगळ्या डीएनएने तयार झाले आहेत. त्यांनी मला व बहिणीला मार्गदर्शन केले. मात्र, आपला सल्ला लादला नाही. त्यांनी एकदा सांगितले होते, तुम्ही प्रत्येक प्रकारचे स्टार बनू शकता. मात्र, तुम्ही चांगले व्यक्ती नसाल तर तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवले जाणार नाही. मी निवांत असल्याचे पाहिल्यावर त्यांना आनंद होईल. मी जेव्हा बंगळुरूला असते तेव्हा ते सर्व असाइनमेंट बाजूला ठेवून माझ्यासोबत राहतात. ते खूप छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देतात. मला विमानतळावर सोडायला येतात. घरापासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी ४५ मिनिटे आमच्यासाठी बहुमोल असतात. ते माझे सर्व चित्रपट पाहतात आणि मी जे काही करेल ते त्यांना आवडते. ते माझ्या चित्रपटातून नेहमी काही ना काही चांगले काढतात. माझ्या टीकाकारांमध्ये माझी आई व बहीण आहेत. ज्या गोष्टी नियंत्रणात नाहीत त्याबाबत कधी असंतुष्ट राहायचे नाही. एखादी बाब नियंत्रणात नसेल तर त्यावर घाम गाळू नकोस, असे त्या सांगतात.

 • fathers day special story: dipika, amitabh,tata, ambani express feelings

  सज्जन | ओ. पी. जिंदल

  मी मागे वळून पाहतो तेव्हा वडिलांसोबत घालवलेले क्षण आठवतात. आम्ही त्यांना बाऊजी म्हणत असू. ते नेहमी म्हणत असत, ‘जेव्हा इतर भिंत पाहतात, तेव्हा मी दार पाहतो.’ अगदी तसेच त्यांनी आम्हाला वाढवले. त्यांनी मला जी अमूल्य शिकवण दिली ती सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांचा उत्साह, परिश्रम सर्वांना माहीत आहे, पण त्यांचे आभामंडल साधे होते. त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी आंत्रप्रेन्योरशिप सुरू केली होती. या प्रवासात त्यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली. त्यात समाज आणि व्यवसायाशी संबंधित लोकांचा समान सहभाग आहे. ते म्हणत असत, ‘ओमला पाय नाहीत, चाकं आहेत.’ त्यांनी खऱ्या अर्थाने एका पिढीला जगण्यास शिकवले. मी लहान होतो तेव्हा ते म्हणत असत, स्वप्नं पाहा. त्यांनी मला कधीही रोखले नाही. त्यांनी आम्हा भावांना मुक्तहस्त दिला. त्यांचे मेहनती व्यक्तित्व फक्त शिकण्याचीच प्रेरणा देत नव्हते, तर मला कठोर परिश्रम आणि दररोज चांगले काम करण्यासाठी प्रेरित करत असे. मी तसेच केले. माझे लक्ष्य स्वत:ला त्यांच्यासमोर सिद्ध करणे हे नव्हते, तर त्यांच्या व्हिजननुसार स्वत:ला योग्य बनवणे हे होते. त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या प्रेमळ आणि इतरांची काळी करण्याच्या व्यवहारातून दिसत होता. 

 • fathers day special story: dipika, amitabh,tata, ambani express feelings

  संजीव | आर. पी. गोयंका 

  माझे वडील असामान्य व्यावसायिक होते. त्यांनी प्रतिभा, दूरदृष्टी व ईश्वराने दिलेल्या शक्तीच्या बळावर सामान्य व्यवसायाचे व कुटुंबाच्या संपत्तीचे साम्राज्यात रूपांतर केले. आपली दोन्ही मुले कार्यक्षमतेच्या हिमालयाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचावीत, असे त्यांना वाटे. आजोबा, वडील व मुले ३ पिढ्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून शिक्षण घेतले , पण त्यांनी मुलांना पार्क स्ट्रीटच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पाठवले. त्यांनी दिलेला शब्द कधी फिरवला नाही. ते म्हणत असत - या मानसिकतेमुळे माझे कुठलेही नुकसान झाले नाही. मी फक्त शब्दांवर संपत्ती आणि कंपन्या खरेदी केल्या. एवढेच नाही, तर अनुभवी वडिलांच्या सांगण्यावरून मोठी कंपनी सोडलीही आहे. आपल्या मुलांसाठी ते खूप कठोर होते. त्यांना आपल्या मुलांची काळजी वाटत असे. काही वेळ उलटून गेल्यानंतर मुलांची बातमी कळली नाही तर ते व्याकुळ होत असत. ते म्हणत असत-आधी विश्वास ठेवला नाही तर मग विश्वास मिळत नाही. लोक तुमच्या पाठीमागे काय म्हणतात, तेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणी प्रश्न विचारला तर मी म्हणतो, आम्ही सामान्य लोक आहोत, पण असामान्य लोकांत राहून व्यवसाय करणे पसंत करतो.

Trending