Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | fathers day special story on gandhi and ambedkar

Father's Day Spl: यामुळे गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ व आंबेडकरांना म्‍हणतात ‘फादर ऑफ कॉन्स्टिट्युशन’

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jun 17, 2018, 10:03 AM IST

वडील कुटुंबात सर्वोच्च शिस्त ठेवतात, तर समाजात सर्वोच्च ओळख. जेव्हा सर्वोच्चतेचा मुद्दा येतो तेव्हा तो वडिलांशी जोडला जा

 • fathers day special story on gandhi and ambedkar

  वडील कुटुंबात सर्वोच्च शिस्त ठेवतात, तर समाजात सर्वोच्च ओळख. जेव्हा सर्वोच्चतेचा मुद्दा येतो तेव्हा तो वडिलांशी जोडला जातो. ते कुठे फादर ऑफ नेशन आहेत, तर कुठे पितामह. ते फादर-पोप-पीर-बाबा-गॉडफादरही आहेत. आपण ईश्वरालाही परमपिता म्हणतो. म्हणजे तो, जो सर्वांच्या वर आहे तो पिता आहे.

  राष्ट्रपिता | बापू

  स्वातंत्र्यलढ्याचा नवा मार्ग बनवणाऱ्या गांधीजींना देशाने औपचारिकरीत्या ‘राष्ट्रपिता’, प्रेमाने ‘बापू’ म्हटले. घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांना ‘फादर ऑफ कॉन्स्टिट्युशन’ आणि प्रेमाने ‘बाबासाहेब’ म्हटले. या संबोधनात पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आहे. सर्वोच्च जबाबदारी घेणाऱ्याला हे संबोधन वापरतात.
  - जगातील ७० देशांनी राष्ट्रनिर्मितीत सर्वात मोठी जबाबदारी बजावणाऱ्या व्यक्तीला ‘फादर ऑफ नेशन’ या नावाने संबोधित केले आहे.

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, फादर-पोप-गॉडफादर यांविषयी व कसा वाढवावा त्‍यांचा मान...

 • fathers day special story on gandhi and ambedkar

  गॉडफादर | पितृपुरुष
  जीवन घडवणाऱ्या आणि बदलवणाऱ्या गॉडफादरचा शोध सर्वांना असतो. गॉडफादर म्हणजे पालनपोषण किंवा प्रगतीत पित्याची भूमिका बजावणारा. योग्य-अयोग्य यातील फरक सांगणारा आणि आपल्या क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली, व्यक्ती. संस्थांचेही पितृपुरुष असतात, जे त्या उभारतात आणि विकसित करतात. इंग्रजीत त्यांना फाउंडिंग फादर म्हणतात.  
  - ऑक्सफर्ड आणि कॉलिन्स डिक्शनरीनुसार जी व्यक्ती निर्मिती सुरू करते. व्यक्ती, संस्था किंवा आंदोलनाची प्रेरणा ठरतो तो गॉडफादर आहे.

 • fathers day special story on gandhi and ambedkar

  पोप | फादर
  वडिलांच्या सर्वोच्च नात्याचे आणखी एफ उदाहरण आहे- धर्मगुरू ‘पोप’ आणि चर्चमध्ये फादर. सर्वात जास्त प्रेम आणि शिकवण देणारे. जगात सर्वाधिक अनुयायी असणाऱ्या धर्मातील सर्वात मोठे गुरू आहेत रोमन कॅथॉलिक चर्चचे प्रमुख ‘पोप’. चर्चच्या फादरसाठी फारशी-उर्दू-हिंदीत पाद्री हा शब्द प्रचलित आहे. त्याचा अर्थ आहे प्रभू, मालिक किंवा पिता.  
  - सर्वोच्च शिकवण देणाऱ्या धर्मगुरूंनाही बापू म्हटले आहे. ज्याला सर्वाधिक सन्मान द्यायचा आहे त्याला पितृतुल्य किंवा फादर फिगर म्हटले जाते. 

 • fathers day special story on gandhi and ambedkar

  परमपिता परमेश्वर
  जेव्हा ईश्वराला सर्वोच्च सन्मान देण्याचा मुद्दा आला तेव्हा आपण त्याला पित्याशी जोडले आणि त्याला परमपिता मानले. पित्याला परम तपस्येशी जोडले. म्हणजे सर्वोच्च, सन्मानित, जन्म देणारा, महान, सर्वात जबाबदार, सर्वात मोठा, सर्वोच्च. प्रत्येक व्यक्ती आपल्या वडिलांत पाहतो ती ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. कारण वडीलच आपली जडणघडण करतात. त्यामुळेच वडिलांचे नाते सर्वोच्च आहे.   
  - महाभारतात यक्ष प्रश्नाच्या उत्तरात युधिष्ठिराने म्हटले होते-आकाशापेक्षा उंच पिता. पद्म पुराणात उल्लेख आहे-सर्वदेव मय: पिता. म्हणजे सर्व देवता पित्यात आहेत. 

 • fathers day special story on gandhi and ambedkar

  कसा वाढवावा त्यांचा मान
  - जो पित्याला त्याच्या वर्तमान स्थितीपासून थोडेसेही उंच नेतो त्यालाच पुत्र म्हणतात.

  - आपल्या पुत्राला आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ बनवून पित्याला अभिमान वाटतो.  
  - अपत्य पित्यासाठी एक क्षणभरही अभिमानाचे कारण ठरू शकल्यानंतर अपत्याचे कर्तव्य पूर्ण होते.

Trending