Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | fathers day special story, things to tak care for good father-son relation

Fathers Day Spl: झपाट्याने बदलत्‍या काळात वडीलांनी घ्‍यावी या 6 गोष्‍टींची काळजी

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jun 17, 2018, 11:08 AM IST

झपाट्याने बदलत्या या काळात वडील आणि मुलांचे नातेही बदलत आहे. हल्ली वडील निर्णय घेण्यात मदत करतात, सॉफ्ट असतात.

 • fathers day special story, things to tak care for good father-son relation

  झपाट्याने बदलत्या या काळात वडील आणि मुलांचे नातेही बदलत आहे. हल्ली वडील निर्णय घेण्यात मदत करतात, सॉफ्ट असतात. तरीही नात्यात बऱ्याचदा तणाव, दुरावा दिसून येतो. यामागे खर्च करण्याच्या मुलांच्या सवयी, वडिलांच्या इच्छेविरुद्ध आईने मुलांची पाठराखण करणे, पालकांमधील तणावपूर्ण संबंध, अभ्यासाकडे मुलांचे दुर्लक्ष, फॅशन व मोबाइल यासारखी कारणे असू शकतात. त्यामुळे येथे काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे...

  काय केले पाहिजे?
  1) संवाद वाढवा : मुलांशी संवाद वाढवा व त्यासाठी मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकून, समजून घ्या. त्याला सल्ला देण्यापेक्षा त्याचे मत विचारा. त्याला मनमोकळे बोलण्याची संधी द्या.


  2) छंद जोपासा : शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह राहणे. अर्थात, मुलांसोबत राहण्यासाठी एखादा खेळ, कुकिंग क्लास, बागकाम करणे किंवा एखादे नवीन कौशल्य शिकणे.

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, वडीलांनी आणखी कोणत्‍या गोष्‍टींची काळजी घ्‍यावी...

 • fathers day special story, things to tak care for good father-son relation

  3) सोशल इंटेलिजंट बना, मुलांवरही संस्कार करा : आपले आप्तस्वकीय, शेजाऱ्यांशी मुलांची ओळख करून द्या. लोकांना मदत करा. तसेच मदत कशी मागावी हेसुद्धा शिकवा. शाळेतील कार्यक्रमांना हजर राहून मुलांना प्रोत्साहित करा.


   


   


   

 • fathers day special story, things to tak care for good father-son relation

  4) अपडेट रहा : बदलत्या जगाशी जुळवून घ्या. मुले नवनव्या गॅझेट्सचा वापर करीत असतात. लेटेस्ट मोबाइल, इंटरनेटचा वापर करून अपडेट रहा.

 • fathers day special story, things to tak care for good father-son relation

  5) रोल मॉडेल बना : मुलांसमोर चिडचिड, संताप करू नका. तसेच अपशब्दांचा वापर करू नये. मुलांसमोर घरामध्ये सिगारेट, मद्यपान करूच नका. वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. सतत कामात व्यस्तदेखील राहू नये. आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवा व मुलांसोबतही त्यावर चर्चा करा.

 • fathers day special story, things to tak care for good father-son relation

  6) क्वाॅलिटी टाइम : सुटीच्या दिवशी ऑफिसची कामे घरी करू नका. आपला अधिकाधिक वेळ मुलांसोबत घालवा.

Trending