Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | garud puraan tips for happy life

शास्त्र : अशा पत्नी आणि मित्रावर विश्वास ठेवल्यास निश्चित आहे तुमचा घात

रिलिजन डेस्क | Update - Jun 08, 2018, 12:02 AM IST

वर्तमान काळाचा विचार केल्यास पत्नी, मित्र आणि नोकर आपले परम सहयोगी असतात तसेच स्वतःचे घर असल्यास

 • garud puraan tips for happy life

  वर्तमान काळाचा विचार केल्यास पत्नी, मित्र आणि नोकर आपले परम सहयोगी असतात तसेच स्वतःचे घर असल्यास आपण शांतीचा अनुभव करतो. गरुड पुराणामध्ये या सर्वांबद्दल लिहिण्यात आले आहे की, मनमानी करणारी पत्नी, दुष्ट मित्र, वाद घालणारा नोकर तसेच ज्या घरामध्ये साप निघतात तेथे निवास करणे साक्षात मृत्युसामान आहे. येथे जाणून घ्या, हे सर्वजण कशाप्रकारे आपल्यासाठी घातक ठरू शकतात.


  मनमानी करणारी पत्नी-
  हिंदू धर्मामध्ये पत्नीला खूप सन्माननीय मानले गेले आहे. पत्नीला त्रासदायक वागणूक देण्याचा विचार करणेही चुकीचे आहे. पत्नीला अर्धांगिनी मानले जाते म्हणजेच शरीराचा अर्धा भाग. परंतु पत्नीचा स्वभाव मनमानी करण्याचा असेल तर ती कोणत्याही रुपात तुमचे नुकसान करू शकते.


  मनमानी करणारी म्हणजे अशी पत्नी जी पतीच्या मनाविरुद्ध सर्व कार्य करणारी तसेच परपुरुषाचा विचार करते. अशी पत्नी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. यामुळे दुष्ट पत्नीसोबत राहणे साक्षात मृत्युसमान मानले जाते.


  दुष्ट मित्र आणि वाद घालणारा नोकर तसेच सर्पयुक्त घर कशाप्रकारे आपल्यासाठी घातक आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • garud puraan tips for happy life

  दुष्ट मित्र -
  जगामध्ये जर कोणी आपला खरा हितचिंतक असेल तर तो मित्र असतो. संकटकाळी सर्वात पाहिले मित्रच आपल्यासोबत असतो. हिंदू धर्म ग्रंथामध्येसुद्धा खर्‍या मित्रांचे विविध उदाहरणे सांगण्यात आली आहेत. आपण द्विधा मनस्थितीमध्ये असल्यास मित्रच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात.


  गरुड पुराणानुसार, जर तुमचा मित्र दुष्ट प्रवृत्तीचा असेल तर तो तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. दुष्ट मित्र स्वतःचा स्वार्थ पूर्ण करून घेण्यासाठी चुकीचा मार्ग दाखवतो किंवा तुमच्या शारीरिक नुकसान पोहोचवू शकतो. एक चुकीचा सल्ला आणि शारीरिक नुकसान या दोन्ही गोष्टी दुष्ट मित्र स्वरुपात साक्षात मृत्युसामान आहेत. यामुळे अशा मित्रांपासून दूर राहावे.

 • garud puraan tips for happy life

  वाद घालणारा नोकर -
  घरामध्ये भृत्य (दास, नोकर) ठेवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. सध्याच्या काळातही अनेक घरांमध्ये नोकर असतात. नोकर आपल्या मालकाची पूर्ण काळजी घेतात तसेच त्यांना घरातील गुप्त गोष्टीही माहिती असतात. परंतु जर नोकर वाद घालणारा असेल तर त्याला लगेच कामावरून काढून टाकावे.


  वाद घालणारा नोकर कोणत्याही क्षणी तुमच्यासाठी मोठे संकट निर्माण करू शकतो. जर अशा नोकराला तुमची एखादी गुप्त गोष्ट माहिती असेल तर तो वाद झाल्यानंतर ते भेद उघड करू शकतो. वाद वाढल्यानंतर तो तुम्हाला शारीरिक नुकसान पोहोचवू शकतो. यामुळे वाद घालणार्‍या नोकरासोबत राहणे मृत्युसमान मानले जाते.

 • garud puraan tips for happy life

  गरुड पुराणानुसार, ज्या घरात साप असतील तेथे निवास करणे धोकादायक ठरते. तसं पाहायला गेले तर साप विनाकारण कोणावरही हल्ला करत नाही परंतु नकळतपणे तुमचा पाय त्याच्यावर पडला तर तो तुम्हाला चावल्याशिवाय राहत नाही. यामुळे ज्या घरात सापाचे वास्तव्य असते ते घर लवकर रिकामे करण्याचा सल्ला दिला जातो.

Trending