Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | How To Be Happy In Daily Life

ज्या घरांमध्ये होतात हे 4 काम, तेथे प्रवेश करू शकत नाही दरिद्रता

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 03, 2018, 10:40 AM IST

प्राचीन प्रथा आणि परंपरेनुसार काही अशी कामे सांगण्यात आली आहेत, जी नियमितपणे केल्यास आपल्या

 • How To Be Happy In Daily Life

  प्राचीन प्रथा आणि परंपरेनुसार काही अशी कामे सांगण्यात आली आहेत, जी नियमितपणे केल्यास आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते. नकारात्मकतेमुळे आपले विचारही नकारात्मक होतात. यामुळे कामामध्ये बाधा निर्माण होतात. येथे जाणून घ्या गीता गोरखपूरच्या संक्षिप्त गरुड पुराण अंकातील आचार कांडनुसार घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरामध्ये कोणकोणते काम करत राहावेत. गरुड पुराणातील आचार कांडमध्ये दैनंदिन जीवनातील शुभ-अशुभ कामे सांगण्यात आली आहेत.


  1. घरात रोज गौमुत्र शिंपडावे, जर हे रोज शक्य नसेल तर सण, उत्सवांच्या वेळी, सर्व शुभ मुहूर्तांवर, पोर्णिमेला घरात गौमुत्र अवश्य शिंपडावे. असे केल्याने घरातील वातावरण पवित्र होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा संपुन जाते. घरातील वास्तु दोष दूर होतात. ज्या घरांमध्ये गौमुत्र शिंपडले जाते तेथे सर्व देवांची कृपा राहते.


  पुढील स्लाईडवर वाचा... आणखी कोणती कामे केल्याने घरातील गरिबी नष्ट होते आणि घरात सुख समृध्दी येते...

 • How To Be Happy In Daily Life

  महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी नियमित घरात आणि मुख्य दरावर दिवा लावा. आपण लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवा लावत अहोत अशी आपली दिवा लावताना भावना असावी. संध्याकाळच्या वेळी महालक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करते आणि ज्या घराच्या दारांमध्ये लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवे लावलेले आहे तेथे लक्ष्मी निवास करते. अशी जुनी मान्यता आहे.

 • How To Be Happy In Daily Life

  रोज मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढली पाहिजे. रांगोळीमुळे घरात सकारात्म ऊर्जा प्रवेश करते. देवी-देवतांच्या स्वागतासाठी रांगोळी काढली जाते. ज्या घरांसमोर रोज रांगोळी काढली जाते तेथे सर्व देवांची कृपा असते. हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात.

 • How To Be Happy In Daily Life

  घर नेहमी स्वच्छ ठेवा. घरात कचरा, जाळे नसावे. जेथे अस्वच्छता असते तेथे लक्ष्मी निवास करत नाही. आपल्या आरोग्यासाठीही अस्वच्छता चांगली नसते. जेथे अस्वच्छता असते तेथे दरिद्रता राहते.

Trending