Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Goddess Parvati Pooja For Happiness In Married Life

पती-पत्नीमध्ये रोज भांडण होत असल्यास, हा एक उपाय नष्ट करेल सर्व कलह

रिलिजन डेस्क | Update - May 05, 2018, 02:55 PM IST

गृहस्थीमध्ये सुख-शांती नसल्यास कुटुंब सुखी राहू शकत नाही. सध्याच्या वर्किंग कपल काळात पती-पत्नीमध्ये मतभेद आणि वाद होणे

 • Goddess Parvati Pooja For Happiness In Married Life

  गृहस्थीमध्ये सुख-शांती नसल्यास कुटुंब सुखी राहू शकत नाही. सध्याच्या वर्किंग कपल काळात पती-पत्नीमध्ये मतभेद आणि वाद होणे सामान्य गोष्ट झाली आहे. याचा थेट प्रभाव घरातील लहान मुलांवर पडतो. कुटुंब सुखी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. घरातील सर्व कलह आणि समस्यांचे एक समाधान असू शकते ते म्हणजे देवी पार्वतीची पूजा. देवी पार्वती पूजेने विविध समस्या दूर होऊ शकतात विशेष म्हणजे दाम्पत्य जीवनातील समस्या दूर करण्यासाठी हा श्रेष्ठ उपाय आहे.


  शास्त्रानुसार, कुटुंबाशी संबंधित सर्व अडचणी दूर करण्यासाठी देवी पार्वतीची पूजा आवश्यक आहे. देवी पार्वतीच्या प्रसन्नतेसोबतच महादेव, श्रीगणेश यांच्यासहित इतर सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. यामुळे सर्व प्रकारचे ग्रह दोषही नष्ट होऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील काही विशेष ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे कुटुंबात कलहाची स्थिती निर्माण होते. या ग्रहांचे योग्य उपाय करण्यासोबतच देवी पार्वतीला दररोज कुंकू अर्पण करावे. कुंकूला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. जो व्यक्ती नियमितपणे देवी पार्वतीची पूजा करतो, त्याच्या जीवनात कधीही कौटुंबिक वाद, मानसिक तणाव निर्माण होत नाहीत.

 • Goddess Parvati Pooja For Happiness In Married Life

  अशाप्रकारे करावी पूजा
  1 -
  सोमवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून महादेवाच्या मंदिरात जावे.
  2 - मंदिरात देवी पार्वतीसोबतच श्रीगणेश आणि कार्तिकेयची पूजा करावी.
  3 - पूजा करताना देवी पार्वतीला सौभाग्य सामग्री अर्पण करावी.
  4 - सौभाग्य सामग्रीमध्ये कुंकू अवश्य असावे.
  5 - यासोबतच देवीला नियमितपणे कुंकू अर्पण करत राहावे.
  6 - सलग 41 दिवस कुंकू अर्पण करावे. यामुळे घरातील कलह कमी होईल आणि सुख-शांती वाढेल.

Trending