Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | gudi padwa 2018 and kadulimb importance in marathi

या कारणांमुळे गुढीपाडव्याला कडुलिंबाचे आहे खास महत्त्व, तुम्हीही जाणून घ्या

जीवनमंत्र डेस्क | Update - Mar 17, 2018, 02:11 PM IST

हिंदू नववर्ष चैत्र मासातील शुक्ल प्रतिपदेपासून (18 मार्च, रविवार) सुरु होते. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत

 • gudi padwa 2018 and kadulimb importance in marathi

  हिंदू नववर्ष चैत्र मासातील शुक्ल प्रतिपदेपासून (18 मार्च, रविवार) सुरु होते. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. या नववर्षात शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी लिंबाच्या पानांचा रस घेतला जातो. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. जे लोक या दिवसांमध्ये लिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन करतात, ते निरोगी राहतात तसेच त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.


  शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...
  निम्ब शीतों लघुग्राही कटुकोडग्रि वातनुत।
  अध्यः श्रमतुट्कास ज्वरारुचिकृमि प्रणतु॥


  या श्लोकामध्ये लिंबामुळे होणारे स्वास्थ्य लाभ सांगण्यात आले आहेत. लिंब आपल्या शरीराला शीतलता देतो. हृदयासाठी लाभदायक आहे. यामुळे पोटातील जळजळ, गॅस, ज्वर (ताप), कफ, त्वचेशी संबंधित रोग नष्ट होतात. लिंबाच्या काडीचा उपयोग दात घासण्यासाठीही केला जातो. आयुर्वेदामध्ये लिंबाचा उपयोग विविध आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या परंपरेशी संबंधित काही खास गोष्टी आणि लिंबाचे खास फायदे...

 • gudi padwa 2018 and kadulimb importance in marathi

  चैत्र नवरात्रीमध्ये का केले जाते लिंबाचे सेवन ?
  चैत्र नवरात्रीमध्ये वातावरणातील तापमान (उष्णता) वाढण्यास सुरुवात होते. या उष्णतेपासून दूर राहण्यासाठी ऋषीमुनींनी चैत्र नवरात्रीमध्ये लिंबाचे सेवन करण्याची प्रथा सुरु केली. या नवरात्रीमध्ये आरोग्याशी संबधित नियमांचे पालन केल्यास उन्हाळ्यात तसेच शिल्लक वर्षातही आपले आरोग्य चांगले राहते. चैत्र नवरात्रीला स्वास्थ्य नवरात्रीसुद्धा म्हटले जाते.
   

  पुढे जाणून घ्या, कसे करावे लिंबाच्या रसाचे सेवन...

 • gudi padwa 2018 and kadulimb importance in marathi

  कसे करावे लिंबाच्या रसाचे सेवन -
  लिंबाचा रस तयार करण्यासाठी लिंबाची कोवळी पाने बारीक कुटून घ्या. यासाठी मिक्सरचा उपयोग करू शकता. बारीक केलेल्या पानांमध्ये स्वच्छ पाणी मिसळून सुती कपड्याने गाळून घ्या. त्यानंतर या पाण्यामध्ये चवीनुसार काळे मीठ टाकू शकता. अशाप्रकारे दररोज सकाळी लिंबाचा रस तयार करून चैत्र नवरात्रीमध्ये याचे सेवन करावे. हा रस एक अँटीसेप्टिकचे काम करतो. रस करणे शक्य नसल्यास दररोज सकाळी लिंबाची चार-पाच कोवळी पाने खाऊ शकता.

 • gudi padwa 2018 and kadulimb importance in marathi

  अंघोळीसाठी लिंबाचा वापर -
  दोन लिटर पाण्यात लिंबाची पन्नास पाने टाकावी. पानांचा रंग बदलून पाणी हिरवट होईपर्यंत त्यांना उकळा. हे पाणी गाळून एका बाटलीत भरून ठेवावे. रोज अंघोळ करताना यातील 100 मिली पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळावे. यातील एंटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण त्वचेला होणारे संसर्ग, व्हाइट हेडची समस्या दूर करतात.

Trending