Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Hindu Morning rituals for happy and successful life

सुखी आणि यशस्वी आयुष्यासाठी सकाळी उठल्यानंतर ही कामे आवश्यक

रिलिजन डेस्क | Update - Jul 22, 2018, 12:01 AM IST

दररोज सकाळी येथे सांगण्यात आलेले 6 काम करत राहिल्यास देवी-देवतांच्या कृपेने प्रत्येक कार्यात यश प्राप्त होऊ शकते

 • Hindu Morning rituals for happy and successful life

  दररोज सकाळी येथे सांगण्यात आलेले 6 काम करत राहिल्यास देवी-देवतांच्या कृपेने प्रत्येक कार्यात यश प्राप्त होऊ शकते. जाणून घ्या, ही कामे कोणकोणती आहेत...


  1. ब्रह्म मुहूर्तावर किंवा सकळी लवकर उठावे
  जे लोक दररोज सकाळी लवकर उठतात त्याच्यामध्ये दिवसभर उत्साह कायम राहतो. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी अंथरून सोडावे. असे केल्याने देवी-देवतांची कृपा प्राप्त होती तसेच आरोग्य लाभ होतो. सकाळचे वातावरण आरोग्यासाठी वरदान असते. उशिरा उठल्याने दिवसभर शरीरात आळस राहतो. सकाळी लवकर उठल्यास रात्रीसुद्धा लवकर झोप लागेल. यामुळे तुम्ही दिनचर्या व्यवस्थित राहील.


  2. सकाळी स्वतःच्या हातांचे दर्शन घ्यावे
  दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर दोन्ही हात पुस्तकाप्रमाणे उघडावेत आणि खालील श्लोकाचा उच्चार करत हातांचे दर्शन घ्यावे...
  कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।
  कर मूले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम्॥


  अर्थ - (माझ्या) हाताच्या अग्रभागामध्ये लक्ष्मीचा, मध्यभागामध्ये सरस्वतीचा आणि मूळभागामध्ये ब्रह्माचा निवास आहे.


  3. योगा आणि ध्यान करा
  दीर्घ काळापर्यंत निरोगी आणि तरुण राहण्यासाठी योग-ध्यान सर्वश्रेष्ठ उपाय आहे. योगाने शरीरातील सर्व प्रकारचे आजार नष्ट होण्यास मदत होते आणि ध्यानाने मानसिक शक्ती वाढते. ध्यानाने क्रोधावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते तसेच मानसिक तणाव नष्ट होतो. योगाने शरीर ताकदवान बनते. रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. सकाळी केलेले योग-ध्यान सर्वोत्तम राहते.


  4. दररोज पूजा करावी
  दररोज घरातील देवी-देवतांची पूजा करावी. दिवा आणि उदबत्ती लावावी. दिवा आणि उदबत्तीच्या धुरामुळे घरातील वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते. वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये दररोज दिवा लावल्यास विविध प्रकारचे वास्तू दोष नष्ट होतात.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणती 2 कामे सकाळी उठल्यानंतर करावीत...

 • Hindu Morning rituals for happy and successful life

  5. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा
  ज्या लोकांचे आई-वडील नेहमी प्रसन्न राहतात आणि जे लोक आई-वडिलांना मान-सन्मान देतात ते नेहमी आनंदी-सुखी राहतात. धार्मिक मान्यतेनुसार जेथे वडीलधारी मंडळीचा योग्य मान-सन्मान होतो त्या कुटुंबावर देवी-देवतांची कृपा राहते. आई-वडिलांच्या आशीर्वादाने वाईट काळ नष्ट होतो.

 • Hindu Morning rituals for happy and successful life

  6. घरातून निघण्यापूर्वी दही खावे
  दररोज सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही आणि साखर अवश्य खावी. हा शुभ शकुन मानला जातो. या उपायाने कामामध्ये यश प्राप्त होते तसेच नकारात्मकता नष्ट होते.

Trending