Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | hug day special, benefits of hug

'हग डे' स्पेशल : आलिंगन दिल्याने रक्तप्रवाह राहतो सुरळित, वाचा 9 फायदे...

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 12, 2018, 06:03 PM IST

व्हेलेंटाइन वीकमधील 13 फेब्रुवारीला हग डे साजरा केला जातो. 'हग' करणे म्हणजेच आलिंगण देणे. आलिंगण दिल्याने प्रेमासोबत जवळ

 • hug day special, benefits of hug

  व्हेलेंटाइन वीकमधील 13 फेब्रुवारीला हग डे साजरा केला जातो. 'हग' करणे म्हणजेच आलिंगण देणे. आलिंगण दिल्याने प्रेमासोबत जवळीक वाढते. व्हेलेंटाइन डे दोन दिवसांवर आला आहे आणि तुम्ही तुमच्या व्हेलेंटाइनसोबत हा दिवस सेलिब्रेट करण्याची तयार करत असाल. व्हेलेंटाइन वीकच्या पहिल्या दिवसापासुनच प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात होते. हग हे प्रेम वाढवण्याचे आणि आपलेपणा निर्माण करण्याचे एक माध्यम आहे. कोणी कितीही चिंतेत असले तरी एखाद्याला आलिंगन दिल्याने चांगले वाटते. कारण आलिंगन दिल्याने एका व्यक्तिची आत्मिक ऊर्जा दूस-याच्या मनामध्ये प्रवेश करते. असे केल्याने चिंतेत असणा-या माणसाला चांगले वाटते. चिंतेत असणा-या व्यक्तिला तर चांगले वाटतेच त्यासोबतच दुसरा व्यक्तीसुध्दा ऊर्जावान होतो. एका संशोधनानुसार आलिंगन देण्याचे काही आरोग्य फायदे देखील आहेत. यामुळे स्मरणशक्ति वाढते आणि तणाव कमी होतो. जर ते आलिंगन आपल्या सोबतीचे असेल तर मग त्याचे फायदे अनेक आहेत. चला तर मग पाहुया आलिंगन देण्याचे फायदे...


  पुढील स्लाईडवर वाचा... आलिंगन देण्याचे खास फायदे...

 • hug day special, benefits of hug

  एकमेकांना जास्त समजुन घेणे
  आपल्या पार्टनरला आलिंगन दिल्याने रक्तामध्ये ऑक्सीटोसिन आणि कोर्टिसोल नावाच्या दोन हार्मोंनचा स्राव होतो. हे हार्मोन्स तनाव आणि कपलला एकमेकांना समजण्यात मदत करतात. जर तुम्हीसुध्दा दिर्घकाळ सोबत आणि स्वस्थ राहु इच्छिता तर, आपल्या पार्टनरला नियमित आलिंगन देत रहा.

 • hug day special, benefits of hug

  वाईट सवयी दूर होतात
  संशोधनात सिध्द झाले आहे की, पार्टनरला आलिंगन देणे त्याच्या वाईट सवयी दूर करण्यास मदत करते. जर तुमच्या पार्टनरला धूम्रपान किंवा एखादी दुसरी सवय असेल, तर त्याला आलिंगन देऊन झोपल्याने सुरक्षेची जाणिव होते. ज्यामुळे ते घरी आल्यानंतर आपल्या वाईट सवयी सोडून तुम्हाला आलिंगन देतील.

   

 • hug day special, benefits of hug

  शांत झोप
  जे कपल एकमेकांना आलिंगन देऊन झोपतात ते आलिंगन देऊन न झोपणा-या कपल पेक्षा शांत झोपतात. जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनरच्या सुरक्षित कुशीत झोपता, तेव्हा जगातील कोणतीच गोष्ट तुम्हाला दुखी करु शकत नाही. तनाव तर कधीच येणार नाही. अशी शांततापुर्ण झोप तुमच्या पुर्ण दिवसामध्ये आनंद निर्माण करते.

   

 • hug day special, benefits of hug

  व्यस्त दिनचर्येसाठी आलिंगन सर्वात उत्‍तम
  आधुनिक कपलची दिनचर्या खुप व्यस्त असते. धावपळीच्या जीवनात कधी-कधी पार्टनर आणि बिजनेस दोन्हींला वेळ देणे खुप अवघड असते. अशात आलिंगन देणे तुमच्यासाठी खुप फायदेशीर ठरते. आपल्या पार्टनरला कुशीत घेऊन आपल्या पुर्ण दिवसात काय झाले ते सांगा आणि त्यांचेही ऐका. मग पहा ही जादूची झप्पी कसा आनंद देते.

   

 • hug day special, benefits of hug

  रक्तप्रवाह नियंत्रित राहतो
  वास्तवमध्ये आलिंगन आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. ते स्वस्थ जीवनशैली ठेवण्यास मदत करते. रक्तदाब सुरळीत ठेवण्यास मदत करते. रक्तदाब स्थिर राहिल्याने डोकेदुखी आणि अन्य आजार होत नाही. सर्व समस्यांपासुन दूर राहण्याासाठी आपल्या पार्टनरला आलिंगन द्या.

 • hug day special, benefits of hug

  सुरक्षिततेची जाणिव
  आलिंगन दिल्यावर आपल्या पार्टनरला फक्त येवढेच म्हणा की, तुम्ही प्रत्येक अडचणीत आणि जगातील कोणत्याही संकटापासुन त्याला वाचवण्यासाठी सोबत आहात. जेव्हा तुम्ही त्यांना मीठी मारुन हे बोलता तेव्हा त्यांना खुप चांगला अनुभव यतो, जो ते कधीच विसरु शकणार नाही.

   

 • hug day special, benefits of hug

  आनंदी दिवस
  जेव्हा तुम्ही रात्रभर पार्टनरच्या कुशित झोपता. त्याच्या पुढच्या दिवसाची सुरुवात आनंद आणि पॉझिटिव्ह एनर्जीने करता. दिवसभर एनर्जीची जाणिव तुम्हाला काम करण्यात चांगल्या प्रकारे मदत करते.

 • hug day special, benefits of hug

  एकमेकांचा संपर्क वाढतो
  आलिंगन फक्त अंतरंगासाठी नसते, तर त्या पेक्षा खुप जास्त असते. जे कपल एकमेकांना जास्त आलिंगन देतात त्यांचा आलिंगन न देणा-या कपलच्या तुलनेत जास्त संपर्क असतो. जेव्हा तुम्ही पार्टनरला आलिंगन देता, तेव्हा तुम्हालाच कळणार नाही की, तुम्ही किती गोष्टी शेयर करत आहात. अनेक वेळा काही न बोलता आलिंगन देऊन तुम्ही एकमेकांच्या गोष्टींना समजुन घ्याल.

   

 • hug day special, benefits of hug

  विचार महत्त्वाचे
  आलिंगन हे नाते मजबूत आणि जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वपुर्ण कारणांपैकी एक आहे. संशोधनातसुध्दा ही गोष्ट सिध्द झाली आहे की, जे कपल एकमेकांना जास्त मीठी मारता, ते दिर्घकाळ सोबत राहता. त्यांच्या नात्यात गंभीरता येते.

   

Trending