बाथरूमधील ही 1 वाईट सवय कोणालाही बनवू शकते कंगाल, आजच सोडून द्या
यूटिलिटी डेस्क | Update - Mar 30, 2018, 07:00 AM IST
प्रत्येक व्यक्तीच्या सवयी वेगवेगळ्या असतात. ज्योतिष शास्त्र आणि गरुड पुराणामध्ये शुभ-अशुभ सवयींविषयी सांगण्यात आले आहे.
-
प्रत्येक व्यक्तीच्या सवयी वेगवेगळ्या असतात. ज्योतिष शास्त्र आणि गरुड पुराणामध्ये शुभ-अशुभ सवयींविषयी सांगण्यात आले आहे. शुभ सवयींमुळे आपल्याला भाग्याची मदत मिळत नाही आणि अशुभ सवयींमुळे जीवनातील अडचणी वाढतात. येथे जाणून घ्या, अशाच एक सवयीविषयी ज्यामुळे चंद्र, राहू-केतूचे दोष तसेच गरिबी वाढू शकते.
बाथरूम अस्वच्छ सोडण्याची सवय..
अनेक लोक स्नान केल्यानंतर बाथरूम अस्वच्छ ठेवतात किंवा कारण नसताना पाणी वाया घालतात. ही सवय ज्योतिषीय दृष्टिकोनातून दुर्भाग्य वाढवणारी आहे. यामुळे चंद्र आणि राहू-केतुचे दोष वाढतात. पाण्याचा कारक ग्रह चंद्र आहे आणि बाथरूम जल तत्वाशी संबंधित आहे. बाथरूममध्ये पाण्याचा अपव्यय केल्यास कुंडलीतील चंद्र कमजोर होतो. -
-