Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Bad Habits About Money Problems

शास्त्रामधून : 7 सवयी, ज्यामुळे घरात कायम राहते गरिबी

रिलिजन डेस्क | Update - May 12, 2018, 12:03 AM IST

सवयींचा संबंध आपल्याला भविष्यात प्राप्त होणार्‍या सुख-दुःखाशी असतो. आपल्या सवयी सांगतात की आपला स्वभाव

 • Bad Habits About Money Problems

  सवयींचा संबंध आपल्याला भविष्यात प्राप्त होणार्‍या सुख-दुःखाशी असतो. आपल्या सवयी सांगतात की आपला स्वभाव आणि विचार कशाप्रकारचे आहेत. यामुळे सवयींना व्यक्तित्वाचा आरसा म्हटले जाते. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार ग्रंथांमध्ये काही सामान्य सवयी शुभ मानण्यात आल्या आहेत तर काही अशुभ. आपल्या अशुभ सवयींमुळे जीवनात अडचणी वाढतात, व्यक्तीला खूप कष्ट करूनही धन प्राप्त होत नाही. येथे जाणून घ्या, अशाच अशुभ सवयींविषयी...


  1. जर एखादा व्यक्ती स्नान केल्यानंतर बाथरूममध्ये कपडे इकडे-तकडे फेकून देत असेल तर ही सवय चांगली नाही. तसेच एखादा व्यक्ती बाथरूमची स्वच्छता करत नेसेल तर चंद्र ग्रहामुळे अशुभ फळ प्राप्त होऊ शकतात. यामुळे स्नान केल्यानंतर बाथरूम अस्वच्छ ठेवू नका, फरशीवर पडलेले पाणी पुसून टाका. शास्त्रानुसार असे केल्यास शरीराचे तेज वाढते आणि शुभ फळ प्राप्त होतात.


  2. जर एखादा व्यक्ती पाय फरफटत चालत असेल तर ही चांगली सवय नाही. शास्त्रानुसार या सवयीमुळे राहू ग्रहाकडून अशुभ फळ प्राप्त होतात.


  3. जेवण केल्यानंतर जेवलेले ताट किंवा प्लेट तसेच टाकून जात असेल तर ही चांगली सवय नाही. असे काम करणार्‍या व्यक्तीला स्थायी यश प्राप्त होत नाही. हे लोक खूप कष्ट करतात परंतु यांना मनासारखे फळ प्राप्त होत नाही. जेवण झाल्यानंतर ताट किंव प्लेट योग्य स्थानावर ठेवल्यास शनि आणि चंद्राचे दोष दूर होतात. तसेच लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.


  4. देवघराची रोज स्वच्छता करत नसाल तर ही अशुभ सवय आहे. जर तुम्ही घरातील देवघर एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवत असाल तर ही चांगली सवय आहे. असे केल्यास सर्व देवतांसोबत नऊ ग्रहांचा शुभ प्रभाव तुमच्यावर राहील.


  5. एखाद्या व्यक्ती कारण नसताना रात्रभर जागा राहत असेल तर त्याला चंद्र ग्रहापासून अशुभ फळ प्राप्त होते. अशा लोकांना मानसील तणावाचा सामना करावा लागतो.


  6. एखादा व्यक्ती बाहेरून घरी आल्यानंतर चप्पल-बूट अस्ताव्यस्त पद्धतीने फेकत असेल तर यामुळे शत्रू भय वाढतो. शास्त्रानुसार घरामध्ये चप्पल-बूट अस्ताव्यस्त पद्धतीने ठेवल्यास शत्रू बलवान होतात. अशा सवयीमुळे तुमच्या मान-सन्मानात कमतरता येऊ शकते.


  7. एखाद्या घरातील स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर मंगळ ग्रहदोषामध्ये वृद्धी होते. जर तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा दोष असेल तर स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे.


  पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

 • Bad Habits About Money Problems
 • Bad Habits About Money Problems
 • Bad Habits About Money Problems
 • Bad Habits About Money Problems
 • Bad Habits About Money Problems

Trending