Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Chanakya Niti About Good And Bad Things

चाणक्य नीती : कोणत्या पुरुषासाठी सुंदर स्त्री विषसमान ठरते

रिलिजन डेस्क | Update - Jun 14, 2018, 05:14 PM IST

आचार्य चाणक्य एक महान नीतिकार होते. त्यांनी विविध नीती सांगितल्या असून, या सर्व नीती मनुष्यासाठी खूप उपयोगी ठरतात.

 • Chanakya Niti About Good And Bad Things

  आचार्य चाणक्य एक महान नीतिकार होते. त्यांनी विविध नीती सांगितल्या असून, या सर्व नीती मनुष्यासाठी खूप उपयोगी ठरतात. आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांच्या अशाच नितीविषयी सांगत आहोत. चाणक्यांनी आपल्या एका श्लोकामध्ये सांगितले आहे की, कोणती गोष्टी कोणत्या अवस्थेमध्ये विषाप्रमाणे बनते.


  चाणक्य सांगतात की...
  अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषम्।
  दरिद्रस्य विषं गोष्ठी वृद्धस्य तरुणी विषम्।।


  वृद्धस्य तरुणी विषम्
  या श्लोकामध्ये चाणक्य सांगतात की, वृद्धस्य तरुणी विषम् म्हणजे एखाद्या वृद्ध पुरुषासाठी नवयौवना विष समान आहे. जर एखादा वृद्ध किंवा शारीरिक कमजोरी असलेल्या पुरुषाने एखाद्या सुंदर आणि तरुण मुलीशी विवाह केला तर तो तिला संतुष्ट करण्यात असमर्थ असतो. अधिकांश परिस्थितीमध्ये वैवाहिक जीवन तेव्हाच चांगले राहते, जेव्हा पती-पत्नी दोघे एकमेकांना शारीरिक रुपात संतुष्ट ठेवतात.


  जर एखादा वृद्ध पुरुष आपल्या तरुण पत्नीला संतुष्ट करू शकत नसेल तर त्याची पत्नी पथ भ्रष्ट होऊ शकते. पत्नी पथ भ्रष्ट झाल्यास पतीला समाजात अपमानाला सामोरे जावे लागते. अशा अवस्थेमध्ये कोणत्याही वृद्ध आणि कमजोर पुरुषासाठी नवयौवना विष समान असते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा संपूर्ण अर्थ...

 • Chanakya Niti About Good And Bad Things

  अनभ्यासे विषं शास्त्रम्
  आचार्य या श्लोकामध्ये सांगतात की, अनभ्यासे विषं शास्त्रम् म्हणजे कोणत्याही व्यक्तीसाठी अभ्यासाशिवाय शास्त्राचे ज्ञान विष समान आहे. शास्त्राच्या ज्ञानाचा निरंतर अभ्यास करत राहणे आवश्यक आहे. जर एखादा व्यक्ती अभ्यास न करता स्वतःला शास्त्राचा ज्ञाता सांगत असेल तर त्याला भविष्यात संपूर्ण लोकांसमोर अपमानाचा सामना करावा लागेल. अशा व्यक्तीला तो अपमान विष समान असतो. यामुळे म्हटले जाते की, अर्धवट ज्ञान धोकादायक असते.

 • Chanakya Niti About Good And Bad Things

  अजीर्णे भोजनं विषम्
  आचार्य सांगतात की, अजीर्णे भोजनं विषम् म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे पोट खराब असेल तर त्या अवस्थेमध्ये भोजन विष समान असते. पोट स्वस्थ असेल तरच मनुष्याला चविष्ट भोजन करण्याची इच्छा होते. परंतु पोट खराब असेल तर चविष्ट भोजन विष समान प्रतीत होते. अशा स्थितीमध्ये योग्य उपचार केल्याशिवाय जेवणापासून दूर राहणे योग्य ठरेल.

 • Chanakya Niti About Good And Bad Things

  एखाद्या गरीब व्यक्तीसाठी कोणत्याही शुभ प्रसंग, कार्यक्रम विष समान असतो. कोणत्याही समारंभात प्रत्येक व्यक्ती स्वच्छ कपडे परिधान करून जातो आणि अशावेळी गरीब व्यक्तीला त्याच्याजवळ जाणे अपमानास्पद वाटते. यामुळे स्वाभिमानी गरीब व्यक्तीसाठी समारंभात जाणे विषसमान ठरते.

Trending