Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Chanakya Niti And Its Tips For Happy Life, How To Be Happy In Life

चाणक्य नीती : अशा लोकांचा त्याग करते देवी लक्ष्मी, जे करतात हे 5 काम

जीवनमंत्र डेस्क | Update - Feb 12, 2018, 05:34 PM IST

आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये सांगितले आहे की, कोणत्या कामांमुळे महालक्ष्मी नाराज होते.

 • Chanakya Niti And Its Tips For Happy Life, How To Be Happy In Life

  आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये सांगितले आहे की, कोणत्या कामांमुळे महालक्ष्मी नाराज होते. ज्या व्यक्तीला महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याची आणि धनवान होण्याची इच्छा आहे त्याने या कामांपासून दूर राहावे..


  श्लोक
  कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्।
  सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्।।

  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, ही पाच कामे करणाऱ्यांचा देवी लक्ष्मी का त्याग करते....

 • Chanakya Niti And Its Tips For Happy Life, How To Be Happy In Life

  मळालेले वस्त्र परिधान करणारा
  गरुड पुराणानुसार मळालेले म्हणजे अस्वच्छ कपडे परिधान करणाऱ्या व्यक्तीला देवी लक्ष्मी त्याग करते. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे, तुम्ही स्वच्छ कपडे परिधान केल्यास लोक तुम्हाला भेटताना संकोच बाळगणार नाहीत. जर तुम्ही व्यापार करत असाल आणि ओळखी वाढल्यामुळे तुमचा व्यापार वाढेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची स्वच्छता पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. याउलट तुम्ही अस्वच्छ राहिल्यास लोक तुमच्यापासून दूर राहतील.

 • Chanakya Niti And Its Tips For Happy Life, How To Be Happy In Life

  दात अस्वच्छ ठेवणारा
  ज्या लोकांचे दात अस्वच्छ असतात अशा लोकांचा देवी लक्ष्मी त्याग करते. येथे दात अस्वच्छ ठेवण्याचा थेट अर्थ तुमच्या स्वभाव आणि आरोग्याशी संबंधित आहे. जे लोक दात स्वच्छ ठेंगवत नाहीत, ते कोणतेही काम पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणे करू शकत नाहीत. यामुळे त्यांचा आळशी स्वभाव दिसून येतो. आळसामुळे हे लोक दिलेली जबाबदारी पार पाडू शकत नाहीत. यामुळे देवी लक्ष्मी अशा लोकांचा त्याग करते.

 • Chanakya Niti And Its Tips For Happy Life, How To Be Happy In Life

  जास्त खाणारा
  जे लोक गरजेपेक्षा जास्त जेवण करतात ते निश्चितच लठ्ठ होतात. लठ्ठ शरीरामुळे त्यांना काम करणे अवघड जाते आणि विविध आजार उत्पन्न होतात. असे लोक कष्टापेक्षा जास्त भाग्यावर विश्वास ठेवावा आणि देवी लक्ष्मी अशा लोकांजवळ राहणे पसंत करते जे कष्ट करून यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. लठ्ठ शरीर व्यक्तीला जास्त आळशी बनवते. यामुळे अशा लोकांचा देवी त्याग करते.

 • Chanakya Niti And Its Tips For Happy Life, How To Be Happy In Life

  कटू बोलणे
  काही लोकांना नेहमी इतरांबद्दल वाईट बोलण्याची सवय असते. त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा नसतो. हे लोक कोणत्याही व्यक्तीला काहीही बोलतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीला यांचे बोलणे ऐकून वाईट वाटते. याच कारणामुळे लक्ष्मी अशा लोकांवर प्रसन्न होत नाही.

 • Chanakya Niti And Its Tips For Happy Life, How To Be Happy In Life

  या दोन वेळेला झोपू नये
  सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळा हिंदू धर्मामध्ये शुभ, मंगलकारी आणि दैवीय कृपा प्राप्त करून देणाऱ्या मानल्या गेल्या आहेत. सुर्योदयामध्ये लक्ष्मीपती विष्णूचा वास मानण्यात आला असून संध्याकाळची वेळ देवी लक्ष्मीची भ्रमण वेळ मानण्यात आली आहे. यामुळे या दोन्ही वेळेला झोपल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही आणि घरातिक सुख-समृद्धी कमी होऊ लागते.

Trending