Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Chanakya Niti In marathi For Good Life

आपण कोणत्या गोष्टींमध्ये नेहमी संतुष्ट राहावे आणि कशामध्ये संतुष्ट राहू नये

यूटीलिटी डेस्क | Update - Feb 17, 2018, 01:01 PM IST

आचार्य चाणक्य एक महान नीतिकार होते. त्यांनी सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी विविध नीती सांगितल्या आहेत.

 • Chanakya Niti In marathi For Good Life

  आचार्य चाणक्य एक महान नीतिकार होते. त्यांनी सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी विविध नीती सांगितल्या आहेत. आजच्या काळातही या नीतींचे पालन केल्यास व्यक्ती अडचणींपासून दूर राहू शकतो. चाणक्याच्या या दोह्यामधून समजू शकते की, व्यक्तीने कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहावे आणि कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहू नये.


  तीन ठौर संतोष कर, तिय भोजन धन माहिं।
  दानन में अध्ययन में, जप में कीजै नाहिं।।


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या दोह्याचा सविस्तर अर्थ...

 • Chanakya Niti In marathi For Good Life

  1. अध्ययन
  अध्ययन केल्याने ज्ञान प्राप्ती होते. मनुष्याने कितीही ज्ञान प्राप्त केले तरी ते कधीही संपूर्ण होत नाही. प्रत्येक व्यक्तीने नेहमी नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी तयार राहावे. जेवढे जास्त ज्ञान आपण प्राप्त करून तेवढेच उत्तम आपले चरित्र बनते. योग्य ज्ञानामुळे जीवनातील प्रत्येक अडचणीतून मार्ग काढणे शक्य होते. यामुळे व्यक्तीने कितीही अध्ययन केले तरी त्यामध्ये कधीही संतुष्ट राहू नये.

 • Chanakya Niti In marathi For Good Life

  2. जप
  देव-देवतांच्या पूजेमध्ये मंत्रांचा जप करण्याचे विशेष महत्त्व आहे. मंत्र आणि देवी-देवतांच्या नावाचा जप केल्याने आपल्याला सर्व अडचणींमधून मुक्ती मिळते आणि जीवनात शांती राहते. देवाचे स्मरण करण्याला कोणतीच सीमा नाही. आपण कितीही स्मरण, ध्यान, जप केला तरी ते सर्वकाही कमीच असते. आपण कधीही जपामुळे संतुष्ट होऊ नये, नेहमी जप करत राहावे.

 • Chanakya Niti In marathi For Good Life

  3. दान 
  शास्त्रामध्ये काही काम प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य सांगण्यात आले आहेत. दानसुद्धा यामधीलच एक काम आहे. प्रत्येक व्यक्तीने दान अवश्य करावे. आपण कितीही दान केले तरी त्याचा हिशोब ठेवू नये. आपण कधीही केलेल्या दानामुळे संतुष्ट होऊ नये. दान करण्याची संधी मिळताच पवित्र मनाने दान करत राहावे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, व्यक्तीने कोणत्या तीन गोष्टींमध्ये नेहमी संतुष्ट राहावे...

 • Chanakya Niti In marathi For Good Life

  1. स्वतःची पत्नी 
  प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या पत्नीवर संतुष्ट राहावे. इतर स्त्रियांबद्दल वाईट विचार मनात आणू नयेत. इतर स्त्रियांकडे लक्ष देण्याऱ्या व्यक्तीवर पत्नी नाराज राहते. अशा परिस्थितीमध्ये पती-पत्नीचे नाते तुटू शकते. यामुळे प्रत्येकाने सवतःचया वैवाहिक जीवनात सुखी राहण्यासाठी आपल्या पत्नीवर संतुष्ट राहावे.

 • Chanakya Niti In marathi For Good Life

  2. जेवण
  आपल्याला जे अन्न घरातून मिळते त्यामध्येच आपण संतुष्ट राहावे. घरातील जेवण सोडून बाहेरच्या अन्नाचे सेवन करणारा व्यक्ती लवकर आजरांना बळी पडतो. ती नेहमी स्वतःचे नुकसान करून घेतो. अशावेळी मनुष्य चवीच्या नादामध्ये स्वतःचे आरोग्य खराब करून घेतो . यामुळे मनुष्याने घरी मिळालेल्या भोजनताच संतुष्ट राहावे.

 • Chanakya Niti In marathi For Good Life

  3. धन 
  व्यक्तीने त्याचे जेवढे उत्पन्न असेल त्यामध्येच संतुष्ट राहावे. जास्त धन किंवा इतरांचे धन मिळवण्याच्या लोभामध्ये पडू नये. असा व्यक्ती चुकीचे काम करण्यास मागेपुढे पाहत नाही. यामुळे भविष्यात त्याला अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या कष्टातून मिळलेल्या धनामध्ये संतुष्ट राहावे.

Trending