Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Every People must do this eight work in life

घरामध्ये सुख-शांतीसाठी प्रत्येक व्यक्तीने या 8 गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात

रिलिजन डेस्क | Update - May 09, 2018, 12:19 PM IST

प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींशी जुळण्याचा भाव कुठे न कुठे तरी असतो.

 • Every People must do this eight work in life

  प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींशी जुळण्याचा भाव कुठे न कुठे तरी असतो. शास्त्रामध्ये मन, वचन आणि कर्माशी संबंधित विविध पाप-पुण्य सांगण्यात आले आहेत. याची माहिती प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल असे नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या 8 गोष्टींचा अवलंब केल्यास जीवन आनंदी राहते. तसेच सहा कामे ज्यामुळे जीवन सुखी होऊ शकते.


  हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...
  प्राणाघातान्निवृति: परधनहणे संयम: सत्यवाक्यं
  काले शक्तया प्रदानं युवतिजनकथामूकभाव: परेषाम्।
  तृष्णास्त्रोतोविभंगो गुरुषु च विनय: सर्वभूतानुकम्पा
  सामान्य: सर्वशास्त्रेष्वनुपहतविधि: श्रेयसामेष पन्था:।।


  सोप्या शब्दांत सांगायचे तर मानवाने मन, वचन आणि व्यवहारात पुढील आठ गोष्टी आचरणात आणाव्यात...

 • Every People must do this eight work in life

  - सत्य बोलणे.
  - यथाशक्ती दान करणे.
  - गुरूप्रती सन्मान आणि नम्रता. गुण, वय किंवा अन्य बाबतीत आपल्यापेक्षा मोठा असलेल्याचा मान राखणे.
  - सर्वांप्रती दयाभाव.
  - मनात निर्माण होणा-या इच्छांवर संयम ठेवणे.
  - परस्त्रीबद्दल बोलणे किंवा ऐकणे टाळावे.
  - दुस-यांची धनसंपत्ती हडपण्याचा विचार न करणे.
  - प्राण्यांच्या प्रती अहिंसा भाव.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गृहस्थी आणि व्यावहारिक जीवनाशी संबंधित आणखी काही अनमोल गोष्टी...

 • Every People must do this eight work in life

  अर्थागमो नित्यमरोगिता च
  प्रिया च भार्या प्रियवादिनी च।
  वश्यश्च पुत्रोर्थकरी च विद्या
  षड् जीवलोकेषु सुखानि राजन्।।

   

  अर्थ- या संसारात दररोज पैसा मिळवणे, निरोगी शरीर ठेवणे, खूप जास्त प्रेम करणारी आणि गोड बोलणारी स्त्री मिळणे, आज्ञाधारक पुत्र होणे आणि धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ देणारी विद्या प्राप्त करणे हे सहा सुख आहेत. यांना प्राप्त करण्याची कोणतीही संधी चुकवू नका.

 • Every People must do this eight work in life

  न दैवमपि सचिन्त्य त्यजेदुद्योगमात्मनः।
  अनुद्योगेन तैलानि तिलेभ्यो नाप्तुमर्हति।।


  सोप्या शब्दात या श्लोकाचा अर्थ आहे की, नशिबावर पूर्ण विश्वास असला तरी कोणत्याही व्यक्तीने कर्म आणि परिश्रम सोडू नयेत. ठीक त्याचप्रमाणे जसे की, प्रयत्न केल्याशिवाय तीळामधून तेल काढणे शक्य होत नाही.

   

  द्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी-दैवेन देयमिति कापुरुषा वदन्ति।
  दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कोत्र दोषः।।

  अर्थ- संसारिक जीवनात कष्ट करणाऱ्या व्यक्तीवरच लक्ष्मी प्रसन्न होते. 'नशिबाने सर्वकाही मिळते' हे व्याक्य फक्त कमजोर आणि भित्रा व्यक्तीच उच्चारात राहतो यामुळे नशिबावर अवलंबून न राहता आपल्या क्षमतेनुसार कष्ट करणे आवश्यक आहे. खूप कष्ट प्रयत्न करूनदेखील यश मिळत नसेल तर प्रयत्नांमध्ये काहीतरी उणीव राहते असे समजून अधिक प्रयत्न करावेत.

Trending