Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Family Management Tips In marathi

पती-पत्नी एकांतात असल्यानंतर लक्षात ठेवावी ही गोष्ट, नेहमी सुखी राहाल

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 12, 2018, 11:43 AM IST

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतांश लोकांच्या वैवाहिक जीवनातील शांतता नष्ट झाली असून काळासोबत पती-पत्नीमधील प्रेमही कम

 • Family Management Tips In marathi

  सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतांश लोकांच्या वैवाहिक जीवनातील शांतता नष्ट झाली असून काळासोबत पती-पत्नीमधील प्रेमही कमी होत आहे. येथे जाणून घ्या, काही अशा गोष्टी ज्यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम आणि शांती कायम राहील...


  बेडरूममध्ये करू नका एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची चर्चा
  पती-पत्नीने बेडरूममध्ये या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, एकांतामध्ये फक्त एकमेकांविषयीच चर्चा करावी. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीशी संबंधित चर्चा करू नये. एकांतामध्ये पती-पत्नीने स्वतःविषयी चर्चा केल्यास वादाची स्थिती निर्माण होत नाही आणि जवळीकता, प्रेम वाढते.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पती-पत्नीमधील प्रेम वाढवणाऱ्या काही खास गोष्टी...

 • Family Management Tips In marathi

  जुन्या चुकांवर चर्चा करू नका
  आपल्या जोडीदाराकडून भूतकाळात एखादी चूक झाली असेल तर त्या चुकीची वारंवार जाणीव करून देऊ नका. जे होऊन गेले आहे, त्या वाईट गोष्टीचा पुन्हा विचार केल्यास किंवा त्यावर चर्चा केल्यामुळे वाद आणि दुःखच पदरी पडते. यामुळे जुन्या चुकांवर जास्त चर्चा करत न बसता, भविष्याची योग्य मांडणी करावी.

 • Family Management Tips In marathi

  पती-पत्नी, दोघांनीही एकाच वेळी क्रोध करू नये
  सुखी वैवाहिक जीवनासाठी ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपला जोडीदार रागात असेल तर त्यावेळी दुसऱ्याने शांत राहणे आवश्यक आहे. जर पती-पत्नी दोघेही एकाच वेळी राग व्यक्त करत असेतील तर परिस्थिती बिघडत जाते. रागामध्ये मनुष्याची विचार करण्याची क्षमता नष्ट होते आणि व्यक्ती योग्य-अयोग्य गोष्टीची निवड करू शकत नाही. यामुळे सर्वात पहिले रागात आलेल्या जोडीदाराला शांत करण्याचा प्रयत्न करावा.

 • Family Management Tips In marathi

  प्रेमाने मांडा आपला तर्क
  वैवाहिक जीवनात अनेकवेळा तर्क-वितर्काची स्थिती निर्माण होते. पती-पत्नी एखाद्या विषयावर वेगवेगळा तर्क मांडतात आणि वाद निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावीत ती म्हणजे, आपली बाजू मांडा परंतु प्रेमाने. आपला तर्क प्रस्तुत करताना आपली भाषा, हावभाव, क्रोध यामध्ये अहंकार असू नये. शांततेत आणि प्रेमाने आपली गोष्ट जोडीदारासमोर ठेवल्यास वादाची स्थितीच निर्माण होणार नाही.

 • Family Management Tips In marathi

  दररोज जोडीदाराचे एखाद्या कामाविषयी कौतुक करा
  सर्वांनाच माहिती आहे की स्वतःचे कौतुक ऐकणे प्रत्येकला आवडते, विशेषतः कौतुक जोडीदार करत असेल तर जास्त आनंद प्राप्त होतो. पती-पत्नी दोघांनीही दररोज दिवसातून कमीत कमी एक चांगली गोष्ट एकमेकांबद्दल बोलावी. थोड्याच दिवसांमध्ये याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल आणि प्रेम वाढेल.

 • Family Management Tips In marathi

  तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा
  अनेकदा काही लोक ऑफिसचा तणाव घरात घेऊन येतात. ऑफिसमध्ये बॉस किंवा इतर कर्मचारीसोबत झालेला वाद किंवा कामातील अपयश. अशा परिस्थितीमध्ये पत्नीने पतीचा तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा. तणावाचे कारण लक्षात घेऊन, तो दूर करण्याचा मार्ग दाखवावा. ही गोष्ट वैवाहिक जीवनात सुख-शांती तसेच प्रेम वाढवेल.

Trending