आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्राचीन काळापासून दैनंदिन कामाशी संबंधित काही खास प्रथा चालत आल्या आहेत. या प्रथांचे पालन केल्यास गरिबीतून मुक्ती मिळू शकते आणि अडचणी दूर होतात. गीताप्रेस गोरखपूरद्वारे प्रकाशित संक्षिप्त गरुड पुराण अंकाच्या आचारकांडमध्ये शुभ-अशुभ कामांविषयी सांगण्यात आले आहे. आचारकांडमधील नीतीसार अध्यायाच्या वेगवेगळ्या नीतीनुसार येथे जाणून घ्या, दैनंदिन जीवनात कोणत्या कामांपासून दूर राहावे. अन्यथा ग्रिनिच सामना करावा लागू शकतो.
पहिले काम
काही लोक दिवसा वेळ न मिळाल्यामुळे रात्री नखं कापतात, हा अपशकून मानला जातो. या संबंधी अशी मान्यता आहे की, रात्री नखं कापल्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्र्याचे आगमन होते. प्राचीन काळात रात्रीच्या वेळी प्रकाशाचा अभाव होता, यामुळे रात्री नखं कापणे वर्ज्य होते. हळू-हळू काळाच्या ओघात ही एक प्रथा बनली.
दुसरे काम
ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवार भाग्य कारक ग्रह बृहस्पती म्हणजेच देवतांच्या गुरूचा दिवस आहे. मान्यतेनुसार, जे लोक या दिवशी शेविंग करतात त्यांना भाग्याची साथ मिळत नाही. शेविंग करण्यासाठी रविवार, सोमवार,बुधवारम शुक्रवार निर्धारित करण्यात आले आहेत. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी हे काम वर्ज्य सांगण्यात आले आहेत.
तिसरे काम
दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. असे केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. तुळशीला जल अर्पण करण्यासाठी सकाळची वेळ श्रेष्ठ आहे. संध्याकाळी तुळशीला जलही अर्पण करू नये तसेच स्पर्शही करू नये. संध्याकाळी तुळशीची पानेसुद्धा तोडू नयेत.
चौथे काम
लक्षात ठेवा की, संध्याकाळी चुकूनही झाडून काढू नये. असे केल्यास घरातील सकारात्मक उर्जा घराबाहेर निघून जाते आणि घरात दारिद्र्य येते. सूर्यास्त होण्यापूर्वीच घर झाडून घ्यावे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.