Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | holi 2018 color celebration news marathi

पत्नीला लाल आणि प्रेयसीला लावा केशरी रंग, वाढेल दोघांमधील प्रेम

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 01, 2018, 04:21 PM IST

निसर्गाने मनुष्याला रंगाची अनमोल अशी एक भेट दिली आहे. निसर्गाचा प्रत्येक रंग वेगवेगळ्या भावना व्यक्त करतो.

 • holi 2018 color celebration news marathi

  निसर्गाने मनुष्याला रंगाची अनमोल अशी एक भेट दिली आहे. निसर्गाचा प्रत्येक रंग वेगवेगळ्या भावना व्यक्त करतो. होळी रंगांचा आणि नात्यांचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या वर्षी 1 मार्चला होळी साजरी होईल आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळाला जाईल. या होळीला तुम्ही तुमच्या लोकांना रंग लावण्यासाठी गेल्यानंतर, फक्त रंगाच्या निवडीवर थोडेसे लक्ष द्या. एक रंग तुमच्या सर्व इच्छा तुमच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहचवेल. येथे जाणून घ्या, कोणाला कोणता रंग लावावा.


  पुढे जाणून घ्या, पती किंवा प्रियकराला, आपल्यापेक्षा लहान असणार्‍यांना, मित्रांन कोणता रंग लावावा...

 • holi 2018 color celebration news marathi

  पती किंवा प्रियकराला - पती, प्रियकराला तुम्ही लाल किंवा फिकट निळा रंग लावा. लाल रंग प्रेम आणि आक्रमकता दोघांचे प्रतिक आहे. हा रंग सांगेल, की तुमच्या नात्यामध्ये पूर्वीप्रमाणेच आजही प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास कायम आहे.

 • holi 2018 color celebration news marathi

  पत्नी किंवा प्रेयसी- पती-पत्नी आणि प्रियकर-प्रेयसीसाठी होळीचा उत्सव खूप खास असतो. कारण या उत्सवामध्ये प्रेमासोबत थोडीशी मजामस्ती दडलेली असते. यामुळे हा उत्सव पती-पत्नी आणि प्रियकर-प्रेयसीला भुरळ पाडणारा आहे. पत्नी किंवा प्रेयसीच्या या प्रेमाच्या नात्याला तुम्ही होळीच्या दिवशी लाल किंवा केशरी रंगाने रंगवून टाका. हे रंग तुमच्या जीवनात प्रेम, उत्साह, सुख आणि विश्वास घेऊन येतील.

 • holi 2018 color celebration news marathi

  आपल्यापेक्षा लहान असणार्‍यांना,मुलांना - लहान बहिण-भाऊ किंवा वयाने आपल्यापेक्षा लहान असणार्‍या नातेवाईकांना हिरवा रंग लावा. हिरवा रंग संपन्नता प्रतिक आहे. हा रंग तुमचा आशीर्वाद आणि प्रेमाला, भावनांना व्यक्त करेल.

 • holi 2018 color celebration news marathi

  मोठ्यांना रंगवायचे असेल तर -आजी-आजोबा, आई-वडील, मोठे बहिण-भाऊ किंवा आपल्या वयापेक्षा मोठे नातेवाईक यांना पिवळा रंग लावा. पिवळा रंग, आस्था, त्याग आणि विश्वासाचे प्रतिक आहे. हा रंग मोठ्यांना लावल्याने तुम्ही त्यांना मान-सन्मान देत आहात. त्यांच्याबदल तुमच्या मनात आस्था आणि विश्वास असल्याचे प्रतीत होईल.

 • holi 2018 color celebration news marathi

  मित्रांसाठी - मित्रांसाठी हिरवा, पांढरा आणि निळा रंग सर्वात उत्तम आहे. हिरवा संपन्नतेचा, पांढरा शांतीचा आणि गडद निळा रंग सकारात्मक उर्जेचा प्रतिक आहे. चांगल्या मित्राची ओळख हीच आहे की, तो आपल्या मित्रांसाठी नेहमी संपन्नता, शांती आणि सकारात्मक उर्जेची इच्छा बाळगतो. या भावना तुमच्या मैत्रीला आणखी बळ देतील.

Trending