Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | How To Be Happy In Life Garud Puran

​या गोष्टी घडू लागल्यास समजावे, आयुष्यात वाढणार आहेत अडचणी

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 22, 2018, 04:16 PM IST

जीवनात कधी-काही अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे अडचणी वाढू लागतात.

 • How To Be Happy In Life Garud Puran
  जीवनात कधी-काही अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे अडचणी वाढू लागतात. अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लगेच आपण सावध झाल्यास दुःखापासून दूर जाऊ शकतो. येथे जाणून घ्या, गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित संक्षिप्त गरुड पुराणातील आचारकांडमध्ये सांगण्यात आलेल्या 3 गोष्टी, ज्यामुळे अडचणी वाढू शकतात...

 • How To Be Happy In Life Garud Puran

  1. जेव्हा जोडीदार विश्वास ठेवत नाही
  सुखी वैवाहिक जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती-पत्नीचा एकमेकांवरील विश्वास. जेव्हाही या विश्वासाला तडा जातो तेव्हा कुटुंब तुटते. यामुळे दोघांनीही एकमेकांचा विश्वास तुटणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. एखाद्या गैरसमजामुळे असे घडले असेल तर त्यावर शांततेत चर्चा करून मार्ग काढावा. जोडीदाराला सत्य काय आहे ते समजावून सांगावे.

 • How To Be Happy In Life Garud Puran

  2. जोडीदार आजारी पडणे
  पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची तब्येत बिघडल्यास सर्वात पहिले त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये जोडीदाराची योग्य काळजी घेतल्यास दोघांमधील प्रेम अधिक वाढते. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नी दोघांनीही निरोगी राहणे आवश्यक आहे.

 • How To Be Happy In Life Garud Puran

  3. छोट्या व्यक्तीकडून अपमान
  घर-कुटुंब किंवा कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला मान-सन्मान मिळावा अशी इच्छा असते.  आपल्यापेक्षा वयाने किंवा पदाने मोठ्या असलेल्या व्यक्तीने आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली तर ती सहन केली जाऊ शकते परंतु आपल्यापेक्षा वयाने आणि पदाने कमी असलेल्या व्यक्तीने अपमान केल्यास ही अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे. अशावेळी राग येणे साहजिक आहे, परंतु संयम ठेवावा. क्रोधाच्या आवेशात कोणताही निर्णय घेऊ नये. अन्यथा अडचणी आणखी वाढू शकतात.

Trending