Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | If You Have Money Problem Rise Early In Morning

घरामध्ये नसेल पैशांची बरकत तर सकाळी उठण्याची वेळ बदला

रिलीजन डेस्क | Update - Apr 20, 2018, 12:02 AM IST

खूप प्रयत्न करूनही तुमच्या खिशात पैसा टिकत नसेल आणि कितीही सेव्हिंग केली तरी खर्च होत असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी

 • If You Have Money Problem Rise Early In Morning

  खूप प्रयत्न करूनही तुमच्या खिशात पैसा टिकत नसेल आणि कितीही सेव्हिंग केली तरी खर्च होत असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ज्योतिषीय उपाय किंवा पूजापाठ करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या सवयीमध्ये अवश्य बदल करावा. फक्त तुम्ही तुमचा सकाळचा उठण्याचा वेळ बदलल्यास तुमचे नशीब बदलू शकते. तुम्ही सकाळी 4 ते 5 या वेळेत उठण्याची सवय लावून घ्या.


  यामागे केवळ ज्योतिषीय कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. तुम्ही सकाळी 4 ते 5 या वेळेत उठल्यास हे केवळ शरीरासाठी चांगले नाही तर पैशाशी संबंधित फायदाही होऊ शकतो. ज्योतिषाचार्य पं. संतोष व्यास यांच्यानुसार सकाळी लवकर उठल्याने आपल्या कुंडलीतील दुसरे स्थान ठीक होते. सकाळी 4 ते 5 या वेळेत सूर्य कुंडलीतील धन स्थानात असतो. हा ग्रहांचा राजा आहे.


  ब्रह्म मुहूर्तावर (सकाळी 4 ते 5) उठणारा व्यक्ती यशस्वी, सुखी, समृद्ध होतो. कारण लवकर झोपेतून उठल्याने दिवसभरात कोणकोणती कामे करावयाची आहेत, याची मांडणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यामुळे जीवन केवळ यशस्वी होत नाही तर शारीरिक आणि मानसिक स्वरुपात स्वस्थ राहणारा व्यक्ती सुखी आणि समृद्ध होऊ शकतो.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, आरोग्य लाभ...

 • If You Have Money Problem Rise Early In Morning

  निरोगी आरोग्याचे रहस्य
  धर्म ग्रंथांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा सर्वात मोठा लाभ निरोगी शरीर सांगण्यात आला आहे. सकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत वायुमंडळामध्ये म्हणजे आपल्या  चारही बाजूने ऑक्सिजन अधिक प्रमाणात असतो. वैज्ञानिक संशोधनानुसार या काळामध्ये ऑक्सिजन ४१ टक्के, जवळपास ५५ टक्के नायट्रोजन आणि ४ टक्के कार्बनडायऑक्साइड वायू राहतो. सूर्योदयानंतर वायुमंडळामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी तर कार्बनडायऑक्साइडचे वाढते. ऑक्सिजन आपल्या जीवनाचा आधार आहे. शास्त्रामध्ये याला प्राणवायू म्हटले जाते. जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यास आपले शरीर स्वस्थ राहते.

Trending