Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Measures Of Astrology, Good Luck Measures, 8 Measures Of Astrology

सकाळचे हे 8 काम, तुमचे दुर्भाग्य बदलू शकतात सौभाग्यात

रिलिजन डेस्क | Update - May 10, 2018, 12:01 AM IST

प्रत्येक व्यक्तीच्या आयुषयात अडचणी येत-जात राहतात. परंतु काही लोकांना आयुषयात नेहमीच अडचणींना

 • Measures Of Astrology, Good Luck Measures, 8 Measures Of Astrology

  प्रत्येक व्यक्तीच्या आयुषयात अडचणी येत-जात राहतात. परंतु काही लोकांना आयुषयात नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागते. तुमच्या आयुष्यातही वारंवार अडचणी निर्माण होत असतील तर सकाळी-सकाळी काही सोपे उपाय करून तुम्ही या अडचणीतून मुक्त होऊ शकता. हे काम खूप सोपे असून कोणताही व्यक्ती सहजपणे करू शकतो.

  तळहातांचे दर्शन
  सकाळी झोपेतून उठताच दोन्ही हात जोडून खालील मंत्राचा उच्चार करावा. या उपायाने देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते.
  कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।
  कलमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम्।।

  देवाची पूजा करावी
  सकाळी स्नान केल्यानंतर अक्षता, कुंकू, फुल, फळ अर्पण करून देवाची पूजा करावी. दिवा लावावा. यामुळे सर्व देवता प्रसन्न होतात. फुलं ताजीच असावीत, भगवान श्रीकृष्णाला तुळस अवश्य अर्पण करावी.

  सूर्याला अर्घ्य द्यावे
  शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, जे लोक नियमितपणे सूर्याला जल अर्पण करतात त्यांना घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. उत्तम आरोग्यासोबतच दीर्घायुष्य प्राप्त होते. या उपायाने त्वचेही चमक वाढते तेसेच आरोग्याशी संबंधित विविध लाभ प्राप्त होतात.

  गायत्री मंत्राचा जप
  रोज सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा. यामुळे तुमच्यामध्ये काम करण्याच्या क्षमतेचा विकास होईल.
  ऊं भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।

  तुळशीजवळ दिवा लावावा
  सकाळी पूजा केल्यानंतनार तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.

  मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा
  रोज सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी कुटुंबातील मोठ्या व्यक्तींच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होण्यास मदत मिळेल आणि कामातील अडथळे दूर होतील.

  गाईला पोळी खाऊ घालावी
  दररोज सकाळी स्वयंपाक करताना पहिली पोळी किंवा भाकरी गाईसाठी काढून ठेवावी. दररोज गाईला पोळी खाऊ घातल्याने घरामध्ये बरकत कायम राहते. धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

  माशांना पिठाच्या गोळ्या टाकाव्यात
  सकाळी स्नान केल्यानंतर घराजवळील नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या खाण्यासाठी टाकाव्यात. यामुळे देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील आणि गरिबी दूर होईल.

  पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

Trending