आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
26 एप्रिलला करू नयेत हे 11 काम, एकही केल्यास घडू शकते काही वाईट
या वर्षी 26 एप्रिल, गुरुवारी वैशाख मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या तिथीला मोहिनी एकादशी म्हणतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, या दिवशी काही विशेष कामांपासून दूर राहावे. या दिवशी वर्ज्य सांगण्यात आलेली कामे केल्यास व्यक्तीचे अर्जित पुण्यही पापामध्ये बदलते आणि तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडू शकते. येथे जाणून घ्या, एकादशीच्या दिवशी कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे...
1. पान खाणे
एकादशी तिथीला पान खाऊ नये. पान खाणे राजसी प्रवृत्तीचे प्रतिक आहे. एकादशीच्या दिवशी मनामध्ये सात्विक भाव असणे आवश्यक आहे. यामुळे एकादशीच्या दिवशी पान न खाता व्यक्तीने सात्विक आचार-विचार ठेवून प्रभू भक्तीमध्ये मन लावावे.
2. जुगार खेळणे
जुगार खेळणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. जो व्यक्ती जुगार खेळतो, त्याचे कुटुंब नष्ट होते. ज्या ठिकाणी जुगार खेळला जातो, तेथे अधर्माच्या राज्य असते. अशा ठिकाणी अनेक वाईट गोष्टी उत्पन्न होतात. यामुळे केवळ एकादशीच नाही तर इतर कोणत्याही दिवशी या वाईट गोष्टीपासून दूर राहावे.
3. रात्री झोपणे
एकादशीच्या रात्री झोपू नये. रात्रभर जागरण करून भगवान विष्णुंची भक्ती करावी. भगवान विष्णूच्या मूर्ती किंवा फोटोजवळ बसून भजन करत जागरण करावे. यामुळे भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते.
4. परनिंदा
परनिंदा म्हणजे इतरांबद्दल वाईट बोलणे. असे केल्याने मनामध्ये इतरांबद्दल कटू भाव निर्माण होतात. यामुळे एकादशीच्या दिवशी इतरांबद्दल वाईट न बोलता, भगवान विष्णूंचे ध्यान करावे.
5. चोरी करणे
चोरी करणे पाप कर्म मानण्यात आले आहे. चोरी करणाऱ्या व्यक्तीला समाजात आणि कुटुंबात कोणतेही स्थान नसते. यामुळे केवळ एकादशीच्याच दिवशी नाही तर इतर कोणत्याही दिवशी हे पाप कर्म करू नये.
6. चाहाडी करणे
चाहाडी केल्याने मान-सन्मानामध्ये कमतरता येऊ शकते. अनेकवेळा अपमानालासुद्धा सामोरे जावे लागू शकते. यामुळे केवळ एकादशीच्याच दिवशी नाही तर इतर कोणत्याही दिवशी कोणाचीही चाहाडी करू नये.
7. हिंसा करणे
एकादशीच्या दिवशी हिंसा करणे वर्ज्य आहे. हिंसा केवळ शरीरानेच नाही तर मनानेही होते. यामुळे मनामध्ये विकार निर्माण होतो. यामुळे शरीर किंवा मन कोणत्याही प्रकारची हिंसा या दिवशी करू नये.
एकादशीच्या दिवशी इतर कोणती कामे करू नयेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.