Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | shukra niti for happy life in marathi

हे चार काम सुरु करताच सुरु होतो वाईट काळ, वाचा शास्त्रातील सर्वात मोठे रहस्य

रिलिजन डेस्क | Update - Jun 25, 2018, 03:26 PM IST

अनेक लोकांना काही गोष्टींची सवय असते, याच सवयी हळूहळू अंगवळणी पडतात. मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा

 • shukra niti for happy life in marathi

  अनेक लोकांना काही गोष्टींची सवय असते, याच सवयी हळूहळू अंगवळणी पडतात. मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा तुमच्या कुळाचा नाश करू शकतात. शुक्रनीतीमध्ये 4 अशाच सवयींविषयी सांगितले आहे, ज्यापासून प्रत्येकाने दूर राहावे.


  श्लोक-
  अनृतात् पारदार्याच्च तथाभक्ष्यस्य भक्षणात्।
  अगोत्रधर्माचरणात् क्षिप्रं नश्यति वै कुलम्।।


  परस्त्री सोबत संबंध ठेवणे
  /> परस्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणे किंवा तिच्याशी संबंध प्रस्थापित करणे महापाप मानले जाते. जो व्यक्ती इतर कोणत्याही स्त्रीसोबत संबंध ठेवतो किंवा तिचा विचार करतो तो राक्षस प्रवृत्तीचा मानला जातो आणि त्याला नरकात विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. हे पाप कर्म कोणत्याही कुटुंबाला नष्ट करू शकते.


  पुढे जाणून घ्या, इतर तीन गोष्टींविषयी...

 • shukra niti for happy life in marathi

  खोटं बोलणे 
  अनेक लोकांना खोट बोलण्याची सवय असते. त्यांना त्यांची ही सवय फार सामान्य वाटते, परंतु हीच सवय त्यांना नष्ट करू शकते. खोट बोलल्याने न केवळ स्वतःला तर कुटुंबातील सदस्यांनाही दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागते. या सवयीपासून जेवढे दूर राहाल तेवढेच चांगले राहील.

 • shukra niti for happy life in marathi

  कुटुंबाच्या परंपराविरुद्ध काम करणे 
  अनेक लोक घरातील वडीलधारी मंडळींचा मान-सन्मान ठेवत नाहीत, तसेच त्यांनी सांगितलेल्या घराच्या परंपरांचे पालन करत नाहीत. असे लोक आपल्या कुलाच्या विनाशाचे कारण ठरतात. जो मनुष्य घराच्या नियम आणि परंपरांचा सन्मान करत नाही, त्याला विविध प्रकारच्या दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागते.

 • shukra niti for happy life in marathi

  मांसाहार
  शास्त्रांमध्ये जीवांची हत्या करणे किंवा त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे. असे करणाऱ्या व्यक्तीला देवतांची कृपा प्राप्त होत नाही. शुक्र नीतीनुसार ही सवय कोणत्याही व्यक्तीच्या कुटुंबाचा नाश करू शकते.

Trending