Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | We Should Do These Good Work Daily To Get Good Luck

मान्यता : स्त्री असो वा पुरुष, हे 12 शुभ काम करू शकतात भाग्योदय

रिलिजन डेस्क | Update - May 28, 2018, 12:01 AM IST

घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी विविध प्रथा प्रचलित आहेत. प्राचीन मान्यतांमध्ये सांगण्यात आलेले शुभ काम

 • We Should Do These Good Work Daily To Get Good Luck

  घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी विविध प्रथा प्रचलित आहेत. प्राचीन मान्यतांमध्ये सांगण्यात आलेले शुभ काम नियमितपणे करत राहिल्या कोणत्याही स्त्री-पुरुषाचे भाग्य बदलू शकते. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार वास्तू आणि ज्योतिषचे असे 12 काम ज्यामुळे शुभफळ प्राप्त होऊ शकतात...


  1. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घरामध्ये दररोज धूप-दीप द्यावी. धूप विविध औषधी वनस्पतींपासून तयार केली जाते. यामधून निघणाऱ्या धुरामुळे नकारात्मकता आणि वातावरणातील हानिकारक किटाणू नष्ट होतात.


  2. घरामध्ये विंड चाइम्स लावाव्यात. याच्या आवाजाने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि वास्तुदोष दूर होतात.


  3. तुम्हाला कुबेरदेवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असल्यास घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा आणि रोज याची पूजा करावी. या ठिकाणी कधीही अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, असेच इतर काही खास उपाय...

 • We Should Do These Good Work Daily To Get Good Luck

  4. घरामध्ये मनीप्लँट लावावा. रोज याची निगा राखावी. या झाडाची पाने पिवळे पडले किंवा सुकून गेले तर ते लगेच काढून टाकावेत.


  5. नियमितपणे उगवत्या सूर्याला तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे. जल अर्पण करताना सूर्य मंत्र 'ऊँ आद‌ित्याय नमः' मंत्राचा जप करावा.


  6. रोज घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेचे पूजन करावे. वेळ कमी असल्यास धूप-दीप दाखवून नमस्कार करावा आणि कृपा प्राप्तीसाठी प्रार्थना करावी.

 • We Should Do These Good Work Daily To Get Good Luck

  7. रोज सकाळी लवकर उठावे आणि काहीकाळ मेडिटेशन करावे. यामुळे मन शांत होते. शांत मनाने केलेल्या कामामुळे यश वाढण्याची शक्यता वाढते.


  8. देवी-देवतांवर अर्पण केलेले फुल आणि हार सुकून गेल्यानंतर घरात ठेवू नयेत. सुकलेले हार-फुल कुंडीमध्ये किंवा इतर झाडांच्या मुळाशी टाकावेत.


  9. जेवण नेहमी किचनमध्ये बसूनच करावे, यामुळे राहूचे अशुभ प्रभाव कमी होतात. बेडरूम आणि अंथरुणावर बसून जेवण करणे अशुभ मानले जाते.

 • We Should Do These Good Work Daily To Get Good Luck

  10. रोज स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटची श्वानासाठी काढून ठेवावी. यामुळे ग्रहांचे अशुभ प्रभाव नष्ट होतात.


  11. नियमितपणे तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. यामुळे घरावर नेहमी लक्ष्मीची कृपा कायम राहते.


  12. पूजा करताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे आणि पूजा झाल्यानंतर हे पाणी सर्व घरामध्ये तुळस किंवा अशोकाच्या झाडाच्या पानांनी शिंपडावे. यामुळे नकारात्मकता नष्ट होते.

Trending