मंगळवार आणि अमावस्येच्या / मंगळवार आणि अमावस्येच्या योगात 5 अशुभ काम केल्यास घरात येते गरिबी

रिलिजन डेस्क

May 14,2018 09:22:00 AM IST

मंगळवार 15 मे, रोजी अमावस्या तिथी असून याच दिवशी शनी जयंती आहे. मंगळवार, अमावस्या आणि शनी जयंतीच्या योगामध्ये अशुभ काम केल्यास घरातील गरिबी दूर होत नाही. मान्यतेनुसार अमावस्येला देवी-देवतांसोबतच पितर देवतांची पूजा केल्याने दुर्भाग्य दूर होऊ शकते आणि अशुभ काम केल्याने देवतांच्या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अमावस्येला कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे...


पहिले काम
शनी जयंती आणि अमावास्येच्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करावे. त्यानंतर घरातील देवी-देवतांची तसेच शनिदेवाची पूजा करावी.


दूसरा काम
अमावास्येला नकारत्मक शक्तींचा प्रभाव जास्त सक्रिय राहतो. यामुळे हानी होण्याची शक्यता वाढते. ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहण योग असेल ते नकारत्मक शक्तीच्या प्रभावात लवकर येतात. यामुळे या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये.


तिसरे काम
अमावास्येला पती-पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावे. गरुड पुराणानुसार अमावास्येला स्थापित केलेल्या संबंधामुळे जन्माला आलेले अपत्य सुखी राहत नाही.


चौथे काम
शनी जयंती आणि अमावास्येच्या दिवशी घरामध्ये क्लेश करू नये, यामुळे पितर देवतांची कृपा मिळत नाही. अमावास्येला पितरांसाठी धूप द्यावी ध्यान करावे.


पाचवे काम
शनिदेव गरिबांचे प्रतिनिधित्व करतात यामुळे शनी जयंतीच्या दिवशी कोणत्याही गरीबाचा अपमान करू नये. गरिबांच्या अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू-केतूचा अशुभ प्रभाव पडतो.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

X
COMMENT