Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | We Should Remember These Chanakya Niti For Happy Life,

चाणक्यांच्या 6 नीती : केव्हा होते मित्र आणि जोडीदाराची पारख

रिलिजन डेस्क | Update - May 17, 2018, 10:34 AM IST

आचार्य चाणक्य रचित चाणक्य नीती ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या नीतीचे पालन केल्यास आपण अडचणींपासून दूर राहू शकतो.

 • We Should Remember These Chanakya Niti For Happy Life,

  आचार्य चाणक्य रचित चाणक्य नीती ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या नीतीचे पालन केल्यास आपण अडचणींपासून दूर राहू शकतो. जीवनात प्रत्येक वळणावर यशस्वी होण्याची इच्छा असल्यास चाणक्याच्या या नीती अत्यंत उपयोगी ठरतील. येथे जाणून घ्या, चाणक्य नीती ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेल्या 6 नीती, ज्यामध्ये सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र दडलेले आहेत...


  पहिली नीती
  बुद्धिहीन शिष्याला शिकवल्याने, वाईट स्वभावाच्या स्त्रीचे पालन केल्याने, अकारण दुःखी राहणाऱ्या व्यक्तीसोबत राहिल्याने जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात.


  दुसरी नीती
  वाईट स्वभावाची स्त्री, मूर्ख मित्र, उत्तर देणारा नोकर आणि ज्या घरामध्ये साप राहतात हे तिघेही साक्षात मृत्युसमान असतात.


  तिसरी नीती
  अडचणी दूर करण्यासाठी धनाची बचत करावी. धनापेक्षा जास्त स्त्रीचे रक्षण करावे. पुरुषाने धन आणि स्त्रीपेक्षा जास्त स्वतःचे रक्षण करावे. व्यक्ती स्वतः सुरक्षित राहिला तरच सर्वांचे रक्षण करू शकतो.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन नीती...

 • We Should Remember These Chanakya Niti For Happy Life,

  चौथी नीती 
  ज्या घरांमध्ये मान-सन्मान नसेल, पैसे कमावण्याचे साधन नसेल, नातेवाईक मित्र नसेल, जेथे ज्ञान वाढवण्याचे स्रोत नसतील तेथे निवास करू नये.


  पाचवी नीती 
  काम दिल्यानंतर सेवकाची, दुःख आल्यानंतर नातेवाईकाची, संकट काळात मित्राची पारख होते. एखाद्या पुरुषाचे सर्वकाही वाईट झाल्यानंतरही पत्नी सोबत असल्यास ती श्रेष्ठ जोडीदार असते.


  सहावी नीती
  जो व्यक्ती निश्चित वस्तू सोडून अनिश्चित वस्तूंकडे पळतो, त्याच्याकडे असलेल्या निश्चित वस्तूंचाही नाश होतो.

Trending