Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | wife best qualities according to garud puraan

पत्नीमधील या 4 गोष्टींमुळे पती ठरतो भाग्यवान, तुमच्या पत्नीमध्ये आहेत का?

जीवनमंत्र डेस्क | Update - Feb 17, 2018, 05:13 PM IST

गरुड पुराणामध्ये पत्नीच्या गुणांसंदर्भात सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार, ज्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये सर्

 • wife best qualities according to garud puraan

  गरुड पुराणामध्ये पत्नीच्या गुणांसंदर्भात सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार, ज्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये सर्व गुण असतील, त्याने स्वतःला देवराज इंद्रसमान समजावे कारण सर्वगुण संपन्न पत्नी मिळाल्यास जीवनातील अर्ध्या समस्या स्वतःहून समाप्त होतात. आज आम्ही तुम्हाला गरुड पुराणात स्त्रियांशी संबंधित सांगण्यात आलेल्या काही गुणांची माहिती देत आहोत.


  सा भार्या या गृहे दक्षा सा भार्या या प्रियंवदा।
  सा भार्या या पतिप्राणा सा भार्या या पतिव्रता।। (108/18)


  या श्लोकामध्ये पत्नीमधील सांगण्यात आलेल्या गुणांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...


  नोट : प्राचीन काळातील ग्रंथांमध्ये सुखी जीवनासाठी विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टी अशाही आहेत, ज्या सध्याच्या काळाशी प्रासंगिक नसून या गोष्टींचे पालन करणेही प्रत्येकाला शक्य नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचे आम्ही समर्थन करत नाहीत. ही स्टोरी फक्त वाचकांचे शास्त्राशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी आहे.

 • wife best qualities according to garud puraan

  गृह कार्यामध्ये दक्ष -
  गृह कार्य म्हणजे घरातील कामे. जी पत्नी घरातील सर्व कामे उदा. स्वयंपाक, साफ-सफाई, घर सजावट करणे, भांडे-कपडे धुणे, मुलांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे, घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, कमी साधनांमध्ये गृहस्थी चालवणे इत्यादी कामांमध्ये निपुण असते तिला ग्रह कार्यात दक्ष मानले जाते. हे गुण ज्या पत्नीमध्ये असतात ती आपल्या पतीला प्रिय असते.

 • wife best qualities according to garud puraan

  प्रियवादिनी -
  पत्नीने नेहमी पतीसोबत संयमी भाषेमध्ये चर्चा करावी. संयमी भाषा म्हणजे हळू-हळू, स्पष्ट आणि प्रेमाने बोलणे. पत्नीने अशाप्रकारे चर्चा केल्यानंतर पतीसुद्धा तिचे म्हणणे मन लावून ऐकतो आणि तिच्या इच्छा पूर्ण करतो. पती व्यतिरिक्त घरातील इतर सदस्य उदा. सासू-सासरे, नणंद, जाऊ, दीर यांच्याशी शांततेने प्रेमाने बोलावे.

 • wife best qualities according to garud puraan

  पतिपरायणा -
  जी पत्नी पतीला सर्वस्व मानते तसेच नेहमी त्याच्या आदेशाचे पालन करते, तिलाच धर्म ग्रंथांमध्ये पतिव्रता मानले गेले आहे. पतिव्रता स्त्री नेहमी पतीच्या सेवेमध्ये असते, चुकूनही पतीला दुःखी करणारे शब्द बोलत नाही. पतीला एखादी न पटणारी गोष्ट सांगावयाची असल्यास ती संयमाने शांततेने सांगते. अशा स्त्रीला योग्य पत्नी मानले जाते.

 • wife best qualities according to garud puraan

  धर्माचे आचरण -
  गरुड पुराणानुसार जी पत्नी स्नान करून पतीसाठी श्रुंगार करते, कमी खाते, कमी बोलते तसेच सर्वगुण संपन्न आहे. जी निरंतर धर्माचे आचरण करते तसेच पतीला प्रसन्न ठेवते तीच खर्‍या अर्थाने पत्नी आहे. ज्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये हे सर्व गुण असतील त्याने स्वतःला भाग्यवान समजावे.

Trending