आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 संकेत : जे सांगू शकतात तुमच्याशी कोण बोलत आहे खोटं आणि खरं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्यासोबत कोणता व्यक्ती खरं बोलतोय आणि कोणता खोटं, हे माहीत करणे अशक्य आहे. कोणाच्या मनात काय चालु आहे आणि कोण आपल्यापासुन एखादी गोष्ट लपवत आहे, हे आपल्याला माहीती करुन घ्यायचे असते परंतु कळु शकत नाही. गरुड पुराणानुसार कोणता व्यक्ती खरे बोलतो आणि कोण खोटे किंवा एखाद्याच्या मनात काय चालु आहे. हे जाणुन घेण्यासाठी शरीराशी संबंधीत काही गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक असते. त्यानुसार 7 संकेत लक्षात घेऊन व्यक्तिच्या मनातील गोष्टी समजता येऊ शकतात. तो श्लोक या प्रमाणे आहे.


अकारैरिंगितैर्गत्या चेष्टया भाषितेन च।
नेत्रवक्त्रविकाराभ्यां लक्ष्यतेर्न्गतं मनः।।


याचा अर्थ म्हणजे 1. शरीराचा आकार, 2. संकेत, 3. गति, 4. चेष्टा, 5. वाणी, 6. नेत्र आणि 7 चेह-यावरील हावभावांनी कोणत्याही प्रकारची मनातली गोष्ट ओळखता येऊ शकते.


1. शरीराचा आकार- बांधा
जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्री अथवा पुरुषासोबत  एखाद्या खास विषयावर बोलत आसता, तेव्हा त्यांच्या शरीराचा बांधा कसा आहे, त्यावरुन तुम्ही त्यांच्या मनातील गोष्ट ओळखु शकता. जर तो आपल्या गोष्टीच्या बाबतीत गंभीर नाही किंवा खोटे बोलत आहे तेव्हा त्याचे खांदे वाकलेले असु शकता. जर तो खुर्चीवर बसलेला असेल तर, तो अगदी आरामात बसलेला असेल. यामुळे त्याच्या बांध्यात तुम्हाला थोडा फरक जाणवेल. हा फरक लक्षात घेऊन तुम्ही अंदाज लावु शकता की, समोरचा व्यक्ती तुमच्या विषयी काय विचार करत आहे.


2. संकेत- शरीराच्या बदलणा-या मुद्रा
अनेक लोकांना सवय असते की, ते जेव्हा दुस-याची गोष्ट ऐकता तेव्हा ते दोन्ही किंवा एक हात हलवतात. पायावर पाय ठेवतात. असे होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु तोच व्यक्ती जेव्हा खोटे बोलतो किंवा एखादी गोष्ट लपवतो तेव्हा या संकेतांमध्ये बदल होतात. या बदलांचे निरिक्षण करुन माहीत होऊ शकते की, तो व्यक्ती खोटे बोलतोय का खरे.


पुढील स्लाईडवर वाचा... इतर 5 संकेतांविषयी...

बातम्या आणखी आहेत...