Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Life Management Of Mahabharata

स्त्रियांनाच नाही तर या लोकांनाही सांगू नयेत स्वतःच्या गुप्त गोष्टी

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 04, 2018, 05:26 PM IST

महाभारतातील तीर्थ पर्वामध्ये कोणत्या सहा लोकांसमोर गुप्त गोष्टींची चर्चा करू नये याविषयी सांगण्यात आले आहे.

 • Life Management Of Mahabharata

  महाभारतातील तीर्थ पर्वामध्ये कोणत्या सहा लोकांसमोर गुप्त गोष्टींची चर्चा करू नये याविषयी सांगण्यात आले आहे. या लोकांसमोर उघड झालेल्या गुप्त गोष्टींमुळे होऊ शकतो व्यक्तीचा सर्वनाश.


  श्लोक
  स्त्रियां मूढेन बालेन लुब्धेन लघुनापि वा।
  न मंत्रयीत गुह्यानि येषु चोन्मादलक्षणम्।।


  अर्थ-1. स्त्री, 2. मूर्ख, 3.लहान मुलं , 4. लोभी 5. नीच पुरुष 6.ज्यामध्ये उन्मादाचे लक्षण दिसत असेल अशा लोकांसमोर गुप्त गोष्टीची चर्चा करू नये.


  या 6 लोकांसमोर गुप्त गोष्टींची चर्चा का करू नये, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Life Management Of Mahabharata

  1. स्त्री
  स्त्रियांचा स्वभाव चंचल असतो. अनेकवेळा स्त्री एखादी अशी गोष्ट सर्वांसमोर बोलून जाते, ज्यामुळे कुटुंबाचा मान-सन्मान कमी होतो. स्त्रियांच्या बाबतीत असेही सांगितले जाते की, यांच्या पोटात कोणतीही गुप्त गोष्ट राहू शकत नाही. कधी न कधी कोणासमोर तरी गुप्त गोष्ट सांगूनच टाकतात. यामुळे स्त्रियांसमोर कधीही गुप्त गोष्टीची चर्चा करू नये.

 • Life Management Of Mahabharata

  2. मूर्ख
  मूर्ख म्हणजे असा व्यक्ती ज्याला चांगले-वाईट, मित्र-शत्रू यामधील फरक कळत नाही. अशा लोकांसमोर जर आपण एखाद्या गुप्त गोष्टीची चर्चा केली तर कळत-नकळतपणे हे लोक इतरांसमोर आप्ळू गुप्त गोष्ट उघड करू शकतात. आपली एखादी गोष्ट आपल्या शत्रूला समजली तर आपण मोठ्या संकटात सापडू शकतो. यामुळे मूर्ख व्यक्तीससमोर कोणतीही गुप्त गोष्ट कार्य नये.

 • Life Management Of Mahabharata

  3. लहान मुले
  कोणत्याही लहान मुलासमोर चुकूनही आपल्या गुप्त गोष्टींचा उल्लेख करू नये, कारण कोणासमोर काय बोलावे याची समाज लहान मुलांना नसते. अशा परिस्थितीमध्ये मुलांसमोर सांगण्यात आलेल्या गुप्त गोष्टी इतरांसमोर उघड होऊ शकतात. यामुळे आपल्या जवळपास लहान मुले असताना गुप्त गोष्टींची चर्चा करू नये.

 • Life Management Of Mahabharata

  4. लोभी
  जो व्यक्ती नेहमी धनाचा हव्यास करतो, तो स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणाचेही नुकसान करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तो कोणाचीही गुष्ट गोष्ट, इतर कोणत्याही व्यक्तीला धनाच्या हव्यासापोटी सांगू शकतो. मग तो तुमचा शत्रू का असेना. यामुळे लोभी व्यक्तीला कधीही स्वतःच्या गुप्त गोष्टी सांगू नयेत.

 • Life Management Of Mahabharata

  5. नीच पुरुष (वाईट काम करणारा)
  जो पुरुष चोरी, लूट, चुकीचे काम, इतरांचे नुकसान करतात ते नीच पातळीचे असतात. हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात. यामुळे अशा लोकांसोबत काही राहू नये आणि यांच्यासमोर आपली कोणतीही गुप्त गोष्ट उघड करू नये.

 • Life Management Of Mahabharata

  6. उन्मादाचे लक्षण
  काही लोक असे असतात, ज्यांच्यामध्ये उन्माद (वेडेपणा)चे लक्षण दिसून येतात, वास्तवामध्ये हे वेडे नसतात. परंतु कधीकधी हे करू नये ते काम करून बसतात. काही हे खूप उत्साही असतात तर काही खूप निराश. हे विनाकारण काहीही करून बसतात. अशा लोकांसामोरही आपल्या गुप्त गोष्टी उघड करू नयेत.

Trending