Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Life Management tips About Anger And Peace Of Mind

रावण आणि दुर्योधनामध्ये होत्या 2 समान वाईट गोष्टी, ज्यामुळे दोघांचाही वंश नष्ट झाला

रिलिजन डेस्क | Update - Jul 29, 2018, 12:02 AM IST

जीवनात सुख-शांती राहावी आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपण वाईट सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे

 • Life Management tips About Anger And Peace Of Mind

  जीवनात सुख-शांती राहावी आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपण वाईट सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये एकही वाईट गोष्ट असल्यास अडचणी येत राहतात. जीवन प्रबंधन गुरु पं. विजय शंकर मेहता यांच्यानुसार रावण आणि दुर्योधन या दोघांमध्ये दोन सर्वात मोठ्या वाईट सवयी होत्या. पहिली अहंकार आणि दुसरी क्रोध. इतिहासातील या दोन्ही पात्रांनी आपल्या या 2 वाईट गोष्टीमुळे न केवळ स्वतःचे प्राण गमावले तर संपूर्ण कुळाचा नाश केला. येथे जाणून घ्या, या दोघांमधील एकसारख्या असलेल्या दोन वाईट गोष्टी...


  # रावणाचा अहंकार आणि क्रोध
  > रावणाला सर्व देवतांना पराभूत आणि महादेवाला प्रसन्न केल्याचा अहंकार झाला होता. हा अहंकार एवढा वाढला की, त्याच्याविरुद्ध तो काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. यामुळे त्याचा क्रोधही वाढला.


  > सत्य बोलणारे, चांगला सल्ला देणारे लोक त्याला स्वतःचे शत्रू वाटू लागले. विभीषण असो वा माल्यवंतम, ज्या-ज्या व्यक्तीने त्याला श्रीरामाशी संधी करून देवी सीतेला परत करण्याचा सल्ला दिला त्या सर्वांना त्याने लंकेतून हाकलून दिले. कारण त्याच्या अहंकार आणि क्रोधाने त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर अधिकार मिळवला होता. याच कारणामुळे श्रीरामाच्या हातून रावणाच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला.


  # दुर्योधनाचा क्रोध आणि अहंकार
  > दुर्योधनाच्या स्वभावातही याच दोन वाईट गोष्टी होत्या. त्यालाही आपले वडील राजा असल्याचा आणि त्यानंतर हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार असल्याचा अहंकार होता.


  > युधिष्ठिर आपल्या भावंडांसोबत वनवास पूर्ण करून राजमहालात आल्यानंतर दुर्योधनाला आपल्या हातामधून सिंहासन जाणार असे संकट दिसू लागले.


  > युधिष्ठिर वयाने आणि गुणांनी दुर्योधनापेक्षा श्रेष्ठ होता. यामुळे दुर्योधनाच्या स्वभावात क्रोधाने जागा घेतली. या क्रोधाने त्याला कधीही शांत मनाने विचार करू दिला नाही.


  > क्रोध आणि अहंकारामुळे अधर्म करत गेला आणि यामुळे संपूर्ण कौरव वंश नष्ट झाले.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, सुख-शांती आणि यश प्राप्तीसाठी कोणत्या गोष्टी आहेत आवश्यक...

 • Life Management tips About Anger And Peace Of Mind

  सुख-शांती आणि यश प्राप्तीसाठी या गोष्टी आहेत आवश्यक...
  > मीच श्रेष्ठ असल्याची भावना क्रोध निर्माण करते आणि क्रोध स्वतःसोबत अशांती घेऊन येतो. आपणही कधीकधी मिळालेल्या यशामुळे गर्विष्ठ होऊन क्रोधाला बळी पडतो आणि येथूनच अशांती सुरु होते.

 • Life Management tips About Anger And Peace Of Mind

  > सर्वप्रकाराच्या सुख-सुविधा असूनही मन एका अनभिज्ञ भीतीने घाबरलेले राहते. मानसिक शांती हवी असल्यास अहंकार आणि क्रोध दोन्ही स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

Trending