गरुड पुराण : / गरुड पुराण : असे खाल्लेले अन्न पचत नाही आणि आजार होण्याची शक्यता वाढते

Aug 01,2018 12:01:00 AM IST

खाल्लेले अन्न पचले तरच शरीराला ऊर्जा मिळते. परंतु पचनक्रियेत गडबड असल्यास आजार होण्याची शक्यता वाढते. पचनतंत्र योग्य पद्धतीने काम करावे यासाठी योगासन आणि शारीरिक परिश्रम करणे आवश्यक आहे. यासोबतच जेवण करताना मन प्रसन्न असावे. गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित संक्षिप्त गरुड पुराण अंकाच्या आचार कांडनुसार जाणून घ्या, अशा काही परिस्थिती ज्यामध्ये जेवण केल्यास ते व्यवस्थित पचत नाही...


# क्रोधामध्ये जेवण करणे
कधीही रागामध्ये जेवण करू नये. क्रोधामुळे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह प्रभावित होतो आणि अशा स्थितीमध्ये जेवण केल्याने पचनतंत्र योग्यपद्धतीने काम करत नाही.


# भीतीमध्ये जेवण करणे
एखाद्या व्यक्ती घाबरलेला असेल आणि अशा स्थितीमध्ये तो जेवण करत असेल तर असे अन्न पचत नाही. व्यक्तीने भीती दूर झाल्यानंतर शांत मनाने जेवण करावे. अन्यथा पचन संबंधित आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

# जेवण करताना मनामध्ये ईर्ष्या असणे एखादा व्यक्ती जेवण करत असताना त्याच्या मनामध्ये इतर दुसऱ्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या नसावी. ही एक वाईट सवय असून यापासून दूर राहावे. जेवण करण्यापूर्वी मनातून हा भाव काढून टाकून शांत मनाने जेवण केल्यास त्याचा लाभ होतो.# इतरांच्या संपत्तीचा हव्यास मनात ठेवून इतरांची संपत्ती चुकीच्या पद्धतीने बळकावण्याची योजना बनवणे आणि हव्यास ठेवणे चुकीचे आहे. जेवताना मनामध्ये असे विचार असल्यास अन्न पचत नाही. जेवताना इतरांचे कल्याण करण्याचा विचार करावा.
X