आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्युपूर्वी पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितल्या स्त्रियांच्या 5 गोष्टी, महिलांना का नाराज केले जाऊ नये!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलि़जन डेस्क - महिलांच्या बाबतीत अनेक ग्रंथांमध्ये विविध बाबी लिहिण्यात आलेले आहे. काही ग्रंथांमध्ये स्त्रियांच्या कर्तव्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. तर काहींमध्ये त्यांच्या व्यवहाराबाबत. याच प्रकारे महाभारतातही स्त्रियांच्या बाबतीत काही विशेष गोष्टींचे वर्णन करण्यात आलेले आहे. या गोष्टी महाभारताच्या अनुशासन पर्वात बाणांच्या शय्येवर झोपलेल्या पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितल्या होत्या. यातील काही बाबी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. 

 

1. पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितले होते की, ज्या घरात स्त्रियांचा अनादर होतो, तेथे सर्व कामे अयशस्वी होतात. ज्या कुळातील सुना- मुलींना दु:ख वाट्याला येते, त्या कुळाचा नाश होतो. प्रसन्नता ठेवल्याने घरातील स्त्री लक्ष्मीचे रूप बनून जाते.

 

2. पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितले की, स्त्रिया नाराज होऊन ज्या घराला श्राप देतात, ते नष्ट होऊन जाते. त्या घराची शोभा, समृद्धी आणि संपत्तीचा नाश होतो.

 

3. संतानाची उत्पत्ति, त्याचे पालन-पोषण आणि लोकयात्रेचे प्रसन्नतापूर्वक निर्वहनही त्यांच्यावरच अवलंबून आहे. जर पुरुषांनी स्त्रियांचा सन्मान केला, त्यांचे सर्व कार्य सिद्ध होतील.

 

4. पितामह भीष्म अनुसार, जर स्त्रीची मनोकामना पूर्ण केली नाही, तर पुरुषाला ती प्रसन्न ठेवू शकत नाही. यामुळे सदैव स्त्रियांचा सत्कार आणि आदर केला पाहिजे.

 

5. जेथे स्त्रियांचा आदर होतो, तेथे देवता प्रसन्न होऊन निवास करतात. स्त्रियांच घरातील लक्ष्मी आहेत. पुरुषांनी त्यांचा सदैव सन्मान केला पाहिजे. 

 

बातम्या आणखी आहेत...