Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Mahabharata 7 Success Factors In Life

या 7 गोष्टी लक्षात ठेवल्यास कॉमन मॅनही होऊ शकतो सक्सेसफुल

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 09, 2018, 08:00 AM IST

महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुराने महाराज धृतराष्टाला या 7 कामांविषयी सांगतिले

 • Mahabharata 7 Success Factors In Life

  महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुराने महाराज धृतराष्टाला या 7 कामांविषयी सांगतिले, जे केल्याने साधारण व्यक्तिला यश मिळते. ही 7 कामे पुढील प्रमाणे आहे.


  श्लोक
  उत्थानं संयमो दाक्ष्यमप्रमादो धृति: स्मृति:।
  समीक्ष्य च समारम्भो विद्धि मूलं भवस्य तु।।


  अर्थ-1. उद्योग, 2. संयम, 3. दक्षता, 4. सावधानी, 5. धैर्य, 6. स्मृति आणि 7 विचार-विनिमय करुन कार्य करणे यांना यशाचा मूल मंत्र समजले पाहिजे


  या 7 कामांमध्ये यश कसे मिळते, हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • Mahabharata 7 Success Factors In Life

  1. उद्योग म्हणजेच कष्ट आणि प्रयत्न
  कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करत राहणे खुप आवश्यक आहे. परिश्रम केले नाही तर यश मिळत नाही. काही लोक यश मिळवण्यासाठी शॉर्ट कट वापरतात. अशा लोकांना भविष्यात पाश्चाताप होतो परंतु  तेव्हा वेळ निघून गेलेली असते. खरोखर यश मिळवण्यासाठी संकल्प, काम आणि परिश्रम करा, हे केल्याशिवाय यश मिळणे अवघड आहे.

 • Mahabharata 7 Success Factors In Life

  2. संयम
  महात्मा विदुरनुसार, यश मिळवण्यासाठी संयम खुप आवश्यक आहेत. अनेक वेळा लहान-लहान यश मिळवल्यावरच लोक मनावर संयम ठेवत नाही आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करु लागतात. या उतावळ्यापणामुळे त्यांचे नुकसान होते. यामुळे यश मिळवायचे असेल तर संयम ठेवणे खुप आवश्यक असते.

 • Mahabharata 7 Success Factors In Life

  3. दक्षता
  यशस्वी होण्यासाठी दक्षता म्हणजेच कोणत्याही कामात कुशल राहणे खुप आवश्यक असते. काही लोक लवकर यश मिळवण्यासाठी कोणतीही दक्षता न बाळगता प्रयत्न करणे सुरु करतात. याचा परिणाम म्हणजे त्यांना यश तर मिळतच नाही ते लक्ष्यापर्यंतसुध्दा पोहोचत नाही. यश मिळवण्यासाठी कोणत्याही काम किंवा कलेत निपुन असणे खुप आवश्यक असते.

 • Mahabharata 7 Success Factors In Life

  4. सावधगिरी बाळगणे
  यश मिळवण्याच्या जिद्दीत आपण अनेक गोष्टींवर दुर्लक्ष करतो. या गोष्टींपासुन सावध राहणे महत्त्वाचे असते. जर आपण यश मिळवताना सावधगिरी बाळगली नाही तर याच चुका पुढील रस्त्यात काटा बनू शकता. यामुळेच यशाच्या मार्गावर चालताना सावधगिरी बाळगणे खुप महत्त्वाचे असते.

 • Mahabharata 7 Success Factors In Life

  5. धैर्य
  महात्मा विदुर प्रमाणे यश मिळवण्यासाठी मनात धैर्य असावे. घाईने केलेली तुमची लहानशी चुक तुमचे स्पप्न तोडू शकते. अनेक प्रयत्न करुनसुध्दा मनाप्रमाणे यश मिळाले नाही तर लक्ष्यापासून भटकू नका आणि ते सोडूण्याचा विचार करु नका. तुम्ही संकल्प अजूनच मजबूत करा आणि दुप्पट मेहनतीने काम करा.

 • Mahabharata 7 Success Factors In Life

  6. स्मृति
  स्मृति म्हणजे स्मरणशक्ती. यश मिळवण्यासाठी स्मृति चांगली असणे खुप आवश्यक असते. हा गुण सर्व लोकांमध्ये नसतो. मेंदू जेवढा चानाक्ष असेल स्मरणशक्ती तेवढीच चांगली असेल.

 • Mahabharata 7 Success Factors In Life

  7. विचार-विनिमय करुन काम करणे
  कोणत्याही कामाची सुरुवात करण्याअगोदर विचार-विनिमय करणे गरजेचे असते. विचार न करता सुरु केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता कमी असते. यामुळे पुढे चालून अडचणी येऊ शकता. म्हणूनच कोणत्याही कामाची सुरुवात विचार करुन करावी.

Trending