Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Mahabharata Life Management Of Vidur Niti

तुम्हीही या 10 लोकांसोबत राहत असाल तर लगेच व्हा सावध

रिलिजन डेस्क | Update - Apr 25, 2018, 01:48 PM IST

महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथ खूप विस्तृत आहे. यामधील कथा जेवढा मोठ्या तेवढ्याच रोचक आहेत.

 • Mahabharata Life Management Of Vidur Niti

  महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथ खूप विस्तृत आहे. यामधील कथा जेवढा मोठ्या तेवढ्याच रोचक आहेत. शास्त्रामध्ये महाभारताला पाचवा वेद मानण्यात आले आहे. या ग्रंथामध्ये एकूण एक लाख श्लोक आहेत, यामुळेच याला शतसाहस्त्री असेही म्हणतात. महाभारतच्या उद्योगपर्वात युद्धापूर्वी महात्मा विदुर राजा धृतराष्ट्र यांना लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित अनेक गोष्टी सांगतात. यालाच विदुर नीती असेही म्हटले जाते. विदुर नीतीनुसार काही लोकांना चांगल्या-वाईट गोष्टींचे ज्ञान नसते, यामुळे यांच्यापासून दूर राहण्यातच फायदा आहे. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांपासून आपण दूर राहावे...


  नशा केलेला व्यक्ती
  ज्या व्यक्तीने नशा केला असेल, त्यापासून दूर राहण्यातच शहाणपण आहे. नशेतील व्यक्तीला चांगल्या-वाईट गोष्टींचे भान राहत नाही आणि अनेकवेळा तो असे न करण्यायोग्य काम करून जातो. विदुर नीतीनुसार, नशेमध्ये एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीच्या कामाची शिक्षा त्याच्यासोबतच इतरांनाही भोगावी लागते. त्यामुळे अशा व्यक्तीपासून दूर राहावे.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणकोणत्या नऊ लोकांपासून दूर राहावे...

 • Mahabharata Life Management Of Vidur Niti

  बेसावध व्यक्ती
  विदुर नीतीनुसार बेसावध व्यक्तीलासुद्धा चांगल्या-वाईट गोष्टीचे स्मरण राहत नाही. त्याच्या हलगर्जीपणामुळे आपलेही नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा जुना वाद चालू असूनही तो बेसावध राहत असेल तर या संधीचा लाभ घेऊन शत्रू त्यावर हल्ला करू शकतो. बेसावध राहिल्यामुळे त्याला तर नुकसान सहन करावेच लागते, त्याचबरोबर आपण त्याच्यासोबत असलो तर आपल्यालाही शारीरिक इजा होण्याचा धोका राहतो. वाहन चालवताना व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे त्याचा आणि त्याच्यासोबतच्या व्यक्तीचाही जीव जाऊ शकतो. यामुळे जो व्यक्ती बेसावध म्हणजेच हलगर्जीपणा करणारा असेल तर त्याचापासून दूर राहावे.

 • Mahabharata Life Management Of Vidur Niti

  पागल व्यक्ती - ज्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले असेल त्यालाही चांगल्या-वाईट गोष्टीची समज नसते. हे लोक विनाकारण काहीही करत राहतात. अशा स्थितीमध्ये अनेकवेळा ते करू नये ते काम करून बसतात. पागल व्यक्ती विनाकारण एखाद्यावर हल्ला करू शकतो किंवा सन्मान करण्यायोग व्यक्तीचा अपमानही करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये त्याला लोकांचा क्रोधाला सामोरे जावे लागते. अशावेळी त्याचसोबतच्या व्यक्तीलाही लोकांच्या या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते. यामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांपासून दूर राहवे.

 • Mahabharata Life Management Of Vidur Niti

  कामुक व्यक्ती
  विदुर नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीवर वासनेचा प्रभाव जास्त असेल तर त्याला चांगल्या-वाईट गोष्टींचे भान राहत नाही. कामुक व्यक्ती स्वतःच्या तृप्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशा लोकांसोबत राहणार्‍या व्यक्तीलाही अनेकवेळा अपमानाला सामोरे जावे लागू शकते. नियमित अशा लोकांसोबत राहणार्‍या व्यक्तीला नेहमी संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.

 • Mahabharata Life Management Of Vidur Niti

  थकलेला व्यक्ती - ज्या व्यक्तीने रात्रभर कष्ट केले असतील आणि तो खूप थकला असेल तर अशा व्यक्तीलाही चांगल्या-वाईट गोष्टीचे स्मरण राहत नाही. थकलेला व्यक्ती कोणासोबतही वाद करत नाही, त्याला फक्त आराम हवा असतो. जर त्याच्या आरामामध्ये कोणी अडथळा आणला तर तो चांगया-वाईट गोष्टीचा विचार न करता असे काही काम करून जातो, जे करण्यायोग्य नसते. अशा स्थितीमध्ये तो जवळपास असणार्‍या व्यक्तीसाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.

 • Mahabharata Life Management Of Vidur Niti

  रागीट व्यक्ती - ज्या व्यक्तीला छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग येतो, त्यालाही धर्म-अधर्माचे भान राहत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे. रागीट स्वभावाच्या व्यक्ती छोट्या गोष्टीवरूनही एखाद्यावर हल्ला करू शकतो किंवा असे काही करू शकतो ज्यामुळे भविष्यात पश्चाताप करावा लागेल.

 • Mahabharata Life Management Of Vidur Niti

  उपाशी व्यक्ती - विदुर नीतीनुसार भुकेने व्याकूळ झालेल्या व्यक्तीलाही चांगल्या-वाईट गोष्टीचे भान राहत नाही. तो स्वतःची भूक शांत करण्यासाठी चांगल्या-वाईट गोष्टींचा निर्णय घेऊ शकत नाही आणि करू नये असे काम करून बसतो. भुकेला व्यक्ती चोरी, लुट यासारख्या गोष्टी करू शकतो. भलेही त्याचा स्वभाव चांगला असेल, परंतु भुकेमुळे तो वाईट काम करू शकतो. यामुळे अशा व्यक्तीपासून दूर राहावे.

 • Mahabharata Life Management Of Vidur Niti

  घाईगडबडीत काम करणारा व्यक्ती - जो व्यक्ती प्रत्येक काम घाईगडबडीत करतो तो कधी न कधी अवश्य चूक करून बसतो. घाईगडबडीत त्याला चांगल्या-वाईट गोष्टीची समज राहत नाही. त्याला फक्त लवकरातल्या लवकर काम पूर्ण करण्याचे पडलेले असते. काम लवकर पूर्ण करण्यासाठी हे लोक शॉर्टकटचा मार्ग निवडतात, ज्यामुळे नंतर यांना पश्चाताप करावा लागतो. अनेकवेळा अशा लोकांच्या घाईगडबडीत एखाद्याचे नुकसान होते. हे लोक स्वभावाने वाईट नसतात परंतु घाईमुळे यांना लोकांचा क्रोधाला सामोरे जावे लागते. यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.

 • Mahabharata Life Management Of Vidur Niti

  लोभी व्यक्ती - लोभी म्हणजे लालची व्यक्ती. आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की, लोभ मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. लोभी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी कोणालाही धोका देऊ शकतो. असे लोक धर्म-अधर्माचा विचार करत नाहीत. हे लोक कुटुंब, नातेवाईक, मित्र किंवा कोणत्याही व्यक्तीचे वाईट करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.

Trending