Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Mahabharata, The Interesting Fact Of Mahabharata, Life Management Of The Mahabharata

6 कारणं, ज्‍यामुळे मनुष्‍याचे वय होत आहे कमी

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jun 18, 2018, 11:59 AM IST

महाभारतामध्‍ये सर्व मनुष्‍यांचे आयुष्‍यमान 100 वर्षांचे असल्‍याचे सांगितले आहे.

 • Mahabharata, The Interesting Fact Of Mahabharata, Life Management Of The Mahabharata

  रिलिजन डेस्‍क- महाभारतामध्‍ये सर्व मनुष्‍यांचे आयुष्‍यमान 100 वर्षांचे असल्‍याचे सांगितले आहे. मात्र तरीही बहुतांश त्‍यापेक्षा कमी वयातच मरतात. यामागील कारण महात्‍मा विदूरने धृतराष्‍ट्राला सांगितले आहे. विदूरने सांगितलेल्‍या या श्‍लोकद्वारे या गोष्‍टीला अत्‍यंत चांगल्‍या पद्धतीने समजून घेता येते.

  श्लोक-

  अतिमानोअतिवादश्च तथात्यागो नराधिप।
  क्रोधश्चात्मविधित्सा च मित्रद्रोहश्च तानि षट्।।
  एत एवासयस्तीक्ष्णा: कृन्तन्यायूंषि देहिनाम्।
  एतानि मानवान् घ्नन्ति न मृत्युर्भद्रमस्तु ते।।

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, या श्‍लोकात सांगितलेली ती 6 कारणं ज्‍यामुळे मनुष्‍याचे आयुष्‍यमान होते कमी...

 • Mahabharata, The Interesting Fact Of Mahabharata, Life Management Of The Mahabharata

  1. अत्‍याधिक अभिमान 
  नेहमी स्‍वत:ची स्‍तूती करणारा, स्‍वत:ला इतरांपेक्षा जास्‍त समजते असे म्‍हणणारा व्‍यक्‍ती अभिमानी असतो. स्‍वत:ला श्रेष्‍ठ आणि इतरांना तुच्‍छ समजणा-या व्‍यक्‍तींचे आयुष्‍यमान त्‍यांच्‍या या अहंगंडामुळे कमी होते. 

 • Mahabharata, The Interesting Fact Of Mahabharata, Life Management Of The Mahabharata

  2. अत्‍याधिक बोलणे 
  जास्‍त व व्‍यर्थ बोलणारे व्‍यक्‍ती अनेकदा अशा गोष्‍टी बोलून जातात ज्‍यामुळे पुढे ते अडचणीत येऊ शकतात. या सवयीचा वाईट परिणाम मनुष्‍याच्‍या जीवनावरही पडतो. 

 • Mahabharata, The Interesting Fact Of Mahabharata, Life Management Of The Mahabharata

  3. क्रोध 
  क्रोध हा मनुष्‍याचा सर्वात मोठा शत्रु असल्‍याचे मानले गेले आहे. रागाच्‍या भरात व्‍यक्‍ती असे काही काम करतो ज्‍यामुळे त्‍याला दु:ख आणि नुकसान दोन्‍हीही सहन करावे लागू शकतात. यामुळे या सवयीनेही मनुष्‍याचे आयुष्‍यमान कमी होते. 

 • Mahabharata, The Interesting Fact Of Mahabharata, Life Management Of The Mahabharata

  4. त्‍यागाची कमतरता 
  समाजात सुखशांतीने राहण्‍यासाठी मनुष्‍यामध्‍ये त्‍याग आणि समर्पणाची भावना असणे आवश्‍यक आहे. त्‍याग तसेच आपलेपणाच्‍या भावनेच्‍या कमतरतेमुळेही मनुष्‍याचे आयुष्‍य कमी होते.

 • Mahabharata, The Interesting Fact Of Mahabharata, Life Management Of The Mahabharata

  5. मित्राचा विश्‍वासघात करणे 
  शास्‍त्रांनूसार, मित्राचा विश्‍वासघात करणे महापाप आहे. यामुळेही मनुष्‍याचे वय कमी होते.  

 • Mahabharata, The Interesting Fact Of Mahabharata, Life Management Of The Mahabharata

  6. लालसा 
  लालसेला मनुष्‍याचा शत्रु म्‍हटले गेले आहे. लालसेमुळे मनुष्‍य स्‍वत:च्‍या भावनांवर नियत्रंण ठेवू शकत नाही. यामुळे त्‍याच्‍या हातून पाप होण्‍याची शक्‍यता असते. हे देखील वय कमी होण्‍याचे एक कारण आहे. 

Trending