Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Motivational tips How To Get Success

4 गोष्टी, ज्या तुम्हाला आयुष्यात कधीही यशस्वी होऊ देत नाहीत

रिलिजन डेस्क | Update - May 16, 2018, 11:11 AM IST

जेव्हाही आपण एखादे नवीन काम सुरु करतो तेव्हा त्यामध्ये अडचणी आणि समस्या निर्माण होतात.

 • Motivational tips How To Get Success

  जेव्हाही आपण एखादे नवीन काम सुरु करतो तेव्हा त्यामध्ये अडचणी आणि समस्या निर्माण होतात. काही लोक या अडचणींना कंटाळून काम अर्धवट सोडून देतात तर काही लोक समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत काम चालू ठेवतात. परंतु काहीवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, समस्या खूपच वाढतात. या समस्या काही काळाने आपल्या विचार आणि वागणुकीवर हावी होतात. आपण जसे-जसे कमजोर होऊ लागतो, या समस्या आपली शांती आणि तर्कशक्ती नष्ट करतात. त्यानंतर आपण अशा गोष्टींची निवड करतो, ज्या आपल्यासाठी ठीक नसतात.


  एका रिसर्चनुसार, समस्या आपल्या स्वभावानुसारच त्यांचा रंग दाखवतात. जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर हे रस्त्यावरील स्पीड ब्रेकरसारखे आहे, जे काही वेळापूर्तीच आपली गती कमी करू शकते. यापेक्षा जास्त काहीही नाही. आपण याच्या जवळ आल्यानंतर हलकेसे ब्रेक दाबतो आणि पुन्हा आपली गती प्राप्त करून मार्गस्थ होतो. महान साहित्यकार जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात की, अडथळे आपल्या यश आणि ताकदीचे कारण बनू शकतात. आपण जेवढ्या बाधा, अडचणी आणि संकटाना पार करतो तेवढेच जास्त मजबूत होऊ शकतो.


  या गोष्टी यशस्वी होऊ देत नाहीत...
  1. कारणे देणे

  अनेकवेळा आपण आपली चूक मान्य करण्याएवजी वेगवेगळी कारणे देत बसतो.


  2. समस्यांपासून पळणे
  काहीवेळा आपण समस्यांवर मार्ग काढत नाहीत तर त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो.


  पुढील स्लाईडवर वाचा, इतर दोन गोष्टी...

 • Motivational tips How To Get Success

  3. काहीही न करणे
  संकट येताच काही लोक घाबरतात आणि हातावर हात धरून तसेच बसून राहतात.


  4. अपयशातून काहीही न शिकणे 
  काही लोक वारंवार अपयशी होऊनसुद्धा त्यामधून काहीही शिकवण घेत नाहीत.

Trending