सकाळी अंथरुणावर बसूनच करावा या मंत्राचा उच्चार, सर्व देवतांची प्राप्त होईल कृपा
रोज सकाळी लवकर उठून शुभ कार्य करण्याचे महत्त्व आपल्या सर्व धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे.
-
रोज सकाळी लवकर उठून शुभ कार्य करण्याचे महत्त्व आपल्या सर्व धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. दिवसाची सुरुवात शुभ कामाने केल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. कामामध्ये मनासारखे यश प्राप्त होते आणि मनुष्याच्या भाग्योदय होऊ शकतो.
वामन पुराणाच्या चतुर्दशोध्याय: 21 ते 25 श्लोकामध्ये स्वतः महादेवाने एका स्तुतीचे वर्णन केले आहे. ही स्तुती शुभफळ प्रदान करणारी, वाईट काळ नष्ट करून भाग्योदय करणारी मानली जाते. जो मनुष्य सकाळी उठून या स्तुतीचा पाठ करतो त्याचा सर्व वाईट काळ नष्ट होऊ शकतो.
स्तुती -
ब्रह्मा मुरारिरित्रपुरान्कारी भानु: शशी भूमिसुतो बुधश्र्च।
गुरुश्र्च शुक्र: सह भानुजेन कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्।।
भृगुर्वसिष्ठ: क्रतुरडिराश्र्च मनु: पुलस्त्य: पुलद्ध: सगौतम: ।
रैभ्यो मरीचिश्चयवनो ऋभुश्र्च कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्।।
सनत्कुमार: सनक: सनन्दन: सनातनोप्यासुरिपिडलौ च।
सप्त स्वरा: सप्त रसातलाश्र्च कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्।।
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या स्तुतीचा अर्थ.... -
अर्थ-
ब्रह्मा, विष्णु, शंकर हे देवता तसेच सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र आणि शनैश्चय हे ग्रह- सर्वांनी माझी सकाळ आणि दिवस मंगलमय करावा. भृगु, वशिष्ठ, क्रतू, अडिग्रा, मनु, पुलस्त्य, पुलह, गौतम, रैभ्य, मरीच, च्यवन आणि ऋभु - या सर्व ऋषींनी माझा दिवस मंगलमय करावा. सनत्कुमार, सनक, सन्नदन, सनातन, आसुरि, पिडग्ल या सर्वांनी माझी सकाळी शुभफलदायक बनवावी.